पंकजा मुंडेंचे दौरे रद्द; PA च्या पत्नीची आत्महत्या, नातलगांचा हत्येचा आरोप

मुंबई : वरळीत प्रमोद महाजन यांची त्यांच्याच भावाने प्रवीणने हत्या केली. काही महिन्यांनतर प्रवीण महाजन ब्रेन हॅमरेजमुळे कोमात गेला. कोमातच काही दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. यानंतर काही वर्षांनी प्रमोद महाजन यांचे मित्र आणि नातलग असलेले गोपीनाथ मुंडे यांचा दिल्लीत कार अपघातात मृत्यू झाला. या घटनेला काही वर्षे होत नाहीत तोच गोपीनाथ मुंडे यांची कन्या आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीने आत्महत्या केली.


भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीने शनिवारी संध्याकाळी आत्महत्या केली. गर्जे यांचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. लग्नाला वर्ष पण झाले नव्हते तोच पत्नीने आत्महत्या केल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. आत्महत्येनंतर मुलीच्या घरच्यांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे. मुलीच्या घरच्यांनी वरळी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून कारवाईची मागणी केली आहे.


अनंत गर्जे आणि डॉक्टर गौरी पालवे यांचा विवाह ७ फेब्रुवारी २०२५ रोजी झाला. लग्नानंतर काही दिवसांतच पती - पत्नी यांच्यात वाद होऊ लागले. वादाचे प्रमाण वाढत गेले. अखेर गौरीने शनिवारी टोकाचे पाऊल उचलले. वरळी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवला आहे.


लग्नाआधी गौरी या वरळीच्याच बीडीडी चाळीत वास्तव्यास होत्या आणि केईएममध्ये डेंटिस्ट विभागात कार्यरत होत्या. लग्नानंतर अनंत गर्जे आणि गौरी यांच्यातील संबंध अवघ्या काही महिन्यांत बिघडले आणि गौरीने शनिवारी आयुष्य संपवले. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. पंकजा मुंडे यांनी त्यांचे सर्व दौरे रद्द केले आहेत. सध्या पंकजा मुंडे मुंबईतच वास्तव्यास आहेत. पण त्यांनी या प्रकरणावर काहीही बोलणे टाळले आहे. पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर तपासाला मदत होईल, एवढीच मोघम प्रतिक्रिया दिली आहे.


आत्महत्येचे नेमके कारण काय ?


अनंत गर्जे आणि डॉक्टर गौरी पालवे यांचा विवाह 7 फेब्रुवारी रोजी मोठ्या थाटामाटात झाला होता. या लग्नाला पंकजा मुंडे आणि माजी खासदार प्रीतम मुंडे देखील उपस्थित होत्या. लग्नाला दहा महिने होत नाहीत तोच गौरी यांनी आत्महत्या केली. अनंत गर्जे यांचे विवाहबाह्य संबंध असल्याने गौरी अस्वस्थ होत्या आणि त्यातून आलेल्या नैराश्यापोटी त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे. अद्याप पोलिसांनी या संदर्भात भाष्य केलेले नाही. तपास सुरू आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Rashmi Sukhla : माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट!

प्रदीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीनंतर घेतली निवृत्ती मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी

एआयमुळे आयटीसह बँकिंग क्षेत्रात घालमेल? २०३० पर्यंत युरोपात २ लाख बँकेच्या कर्मचाऱ्यांना नारळ याचे लोण भारतात का पसरणार? वाचा..

मोहित सोमण: जगभरात एआय (Artificial Intelligence AI) पासून जगभरातील रोजगार निर्मितीला धोका आहे का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' तारखेला शहरात पाणीपुरवठा राहणार बंद

नाशिक: पाण्यासंदर्भात नाशिककरांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पुढील काही दिवस नाशिककरांनी पाण्याचा जपून

प्रशासनाचा भोंगळ कारभार! मृत शिक्षकाला लावली निवडणूक ड्युटी

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. शैक्षणिक क्षेत्रातील दोन मृत

भारतात वर्षभरात १६६ वाघांचा मृत्यू

३१ बछड्यांचा समावेश नागपूर : राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या

अयोध्येत रामभक्तांची गर्दी

४ लाख भाविकांनी घेतले रामललाचे दर्शन लखनऊ : अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन अतिशय उत्साहात