परभणीत राजकीय राडा; पाथरीत दगडफेक आणि तलवारीने हल्ले

परभणी : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. स्थानिक स्तरावर प्रचाराला जोरदार रंग चढला असून अनेक नेते आणि उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत. काही ठिकाणी बिनविरोध निवडणुका व्हाव्यात यासाठी हालचाली सुरू असताना, काही भागांत मात्र संघर्षाची शक्यता वाढत आहे. अशातच परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात प्रचारादरम्यान झालेल्या हिंसक घटनेने खळबळ उडाली आहे.


दगडफेक, तलवारी आणि चाकूंसह हल्ले


पाथरी तालुक्यात २१ नोव्हेंबर २०२५ रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रचारादरम्यान शिंदे गट आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत वाद चिघळला. अल्पावधीतच परिस्थिती ताणली गेली आणि वाद थेट हिंसक स्वरुपात बदलला. घटनेदरम्यान तलवारी आणि चाकूंसह हल्ले झाल्याची माहिती मिळाली असून दोन्ही गटातील काही जण जखमी झाले आहेत. दगडफेक आणि धारदार शस्त्रांच्या हल्ल्यांमुळे काहींना डोक्यावर टाके घालावे लागले आहेत. जखमींना तातडीने परभणी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. दोन्ही पक्षांनी एकमेकांवर हल्ल्याचे आरोप करत वातावरण आणखी तापवले आहे.


हर्षवर्धन सपकाळ यांना काळे झेंडे


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पाथरीत प्रचारासाठी आले असताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. त्यांच्या भाषणानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत सपकाळ यांना काळे झेंडे दाखवले. नंतर सेलू शहरातही सपकाळ यांच्या आगमनावेळी भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत देवेंद्र फडणवीस झिंदाबादच्या घोषणा दिल्या.

Comments
Add Comment

मुंबईत महायुतीचाच महापौर

मुंबईरांनी ठाकरेंना नाकारले, भाजप आणि शिवसेनेला स्वीकारले मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेवर कुणाचा

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणूक महायुती एकत्र लढणार

भाजपच्या ‘विजय मेळाव्या’त खासदार नारायण राणे यांची घोषणा कणकवली (प्रतिनिधी): राज्यात नुकत्याच पार पडलेल्या

मुंबई मनपातील विजयी उमेदवार

प्रभाग १ रेखा राम यादव शिवसेना प्रभाग २ तेजस्वी अभिषेक घोसाळकर भाजप प्रभाग ३ प्रकाश यशवंत दरेकर भाजप प्रभाग ४

महाराष्ट्र भाजपचा! २९ पैकी २५ महापालिकांवर भाजप महायुतीचा झेंडा

मतदारांचा विकासाला कौल; ठाकरे बंधूंसह पवार काका-पुतण्याला दणका मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील २९ महापालिकांच्या

कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक २०२६, विजयी उमेदवारांची यादी

कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक २०२६, विजयी उमेदवारांची यादी पॅनल क्र. 1 : बीजेपी - वरुण पाटील ( विजयी ) शिवसेना -

“महायुतीचा धडाका: मुंबईत महापौर आमचाच!

विकासाच्या अजेंड्यावर जनतेची मोहोर मुंबईकरांनी अन्य ब्रँडला नाकारले - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे” ठाणे