अभिनेत्री श्रद्धा कपूर शूटिंगदरम्यान जखमी

मुंबई  : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रद्धा कपूर तिच्या आगामी "ईठा" चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान जखमी झाली आणि तिचा पाय फ्रॅक्चर झाला. तथापि, अभिनेत्रीच्या टीमने अद्याप अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. असे वृत्त आहे की श्रद्धा कपूरला सेटवर गंभीर दुखापत झाली होती यामुळे निर्मात्यांना शूटिंग थांबवावे लागले.


श्रद्धा कपूर "ईठा" चित्रपटाच्या एका लावणीचे शूट करत होती. यासाठी तिने पारंपरिक नऊवारी साडी, जड दागिने आणि कंबरेचा पट्टा घातला होता. या शूट दरम्यानच तिचा अपघात झाला. या चित्रपटासाठी श्रद्धाने तिचं १५ किलो वजन वाढवले आहे. भारी वजनामुळे नऊवारी साडी आणि लावणी करता करता श्रद्धा कपूरचा तोल गेला आणि ती जोरात पडली. तिच्या पायाला आणि हाताला दुखापत झाली. शिवाय, तिच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचेही वृत्त आहे. 'ईठा' चित्रपटाचे चित्रीकरण मड आयलंडमध्ये सुरू आहे. दुखापतीनंतर, युनिटने ताबडतोब शूटिंग थांबवले. श्रद्धा कपूर बरी होईपर्यंत निर्मात्यांनी चित्रीकरण थांबवले आहे. युनिट आता तिच्या पूर्ण बरे होण्याची वाट पाहणार आहे.

Comments
Add Comment

रिंकू राजगुरुच्या 'आशा' सिनेमाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : सैराट फेम रिंकू राजगुरू तिच्या नवीन चित्रपटातून 'आशा' च्या माध्यमातून भेटीला येत आहे. याआधीही तिने

निर्माता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना जीवनगौरव पुरस्कार

जागतिक मराठी संमेलन गोव्यात ; ९ जानेवारीला देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन ; महेश मांजरेकर यांना जीवनगौरव

जुन्या चित्रपटांचे वैभव प्रेक्षक पुन्हा अनुभवणार

वंचितांचं जगणं आणि त्यात आत्मजाणिवेनं होणारं परिवर्तन यांची हृदयस्पर्शी आणि तितकीच प्रेरणादायी कहाणी

‘बोल बोल राणी, इता इता आणी’ या शॉर्ट फिल्मचे स्क्रीनिंग

बालदिनाच्या पूर्वसंध्येला ऑल प्ले प्रोडक्शन्सतर्फे त्यांच्या पहिल्या शॉर्ट फिल्मची “बोल बोल राणी, इता इता

पनवेलकरांसाठी २३ नोव्हेंबरला पीव्हीआरमध्ये ‘असंभव'चे प्रदर्शन

मराठीतील चार नावाजलेले, गुणी आणि दमदार कलाकार म्हणजे मुक्ता बर्वे, सचित पाटील, प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी हे

देवीच्या जत्रेत छाया कदमची कोकणात हजेरी

अभिनेत्री छाया कदम यांनी कोकणातील धामापूर गावातील सातेरी देवीच्या जत्रेला हजेरी लावत एक खास व्हिडीओ सोशल