मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रद्धा कपूर तिच्या आगामी "ईठा" चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान जखमी झाली आणि तिचा पाय फ्रॅक्चर झाला. तथापि, अभिनेत्रीच्या टीमने अद्याप अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. असे वृत्त आहे की श्रद्धा कपूरला सेटवर गंभीर दुखापत झाली होती यामुळे निर्मात्यांना शूटिंग थांबवावे लागले.
श्रद्धा कपूर "ईठा" चित्रपटाच्या एका लावणीचे शूट करत होती. यासाठी तिने पारंपरिक नऊवारी साडी, जड दागिने आणि कंबरेचा पट्टा घातला होता. या शूट दरम्यानच तिचा अपघात झाला. या चित्रपटासाठी श्रद्धाने तिचं १५ किलो वजन वाढवले आहे. भारी वजनामुळे नऊवारी साडी आणि लावणी करता करता श्रद्धा कपूरचा तोल गेला आणि ती जोरात पडली. तिच्या पायाला आणि हाताला दुखापत झाली. शिवाय, तिच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचेही वृत्त आहे. 'ईठा' चित्रपटाचे चित्रीकरण मड आयलंडमध्ये सुरू आहे. दुखापतीनंतर, युनिटने ताबडतोब शूटिंग थांबवले. श्रद्धा कपूर बरी होईपर्यंत निर्मात्यांनी चित्रीकरण थांबवले आहे. युनिट आता तिच्या पूर्ण बरे होण्याची वाट पाहणार आहे.






