कालच्या रुपयांच्या ८८.६३ निच्चांकी पातळीवरून आज केवळ १ पैशाने वाढ 'या' परिस्थितीजन्य अर्थशास्त्रीय कारणांमुळे

मोहित सोमण: कालच्या डॉलरच्या निर्देशांकात व मागणीत मोठी वाढ झाल्याने रुपयांत निच्चांकी पातळीवर (All time Low) घसरण झाली होती. काल थेट रूपया प्रति डॉलर ८८.६३ रुपयांवर युएस बाजारातील सुरूवातीच्या सत्रात व्यवहार करत होता मात्र सकाळी रूपयाने रिकव्हरी प्राप्त केली आहे. एक पैशांनी रूपयात सुधारणा झाल्याने आज सकाळच्या सत्रात रूपया प्रति डॉलर ८९.६४ पातळीवर व्यवहार करत आहे. प्रामुख्याने जगभरातील अस्थिरतेचा फटका इतर करन्सी बास्केटला बसत आहे व सातत्याने डॉलरच्या मागणीत वाढ होत असल्याने त्याचा आर्थिक फटका व्यापारांसह शेअर बाजारात देखील काल बसला होता. मात्र आज नवीन कुठला ट्रिगर नसला तरी डॉलरच्या मागणीत कुठलीही विशेष कपात झाली नसल्याने रूपया केवळ १ पैशाने वधारला असला तरी निचांकी स्तरावर कायम आहे.


काल डॉलर निर्देशांक (Dollar Index DXY) १०० पेक्षा अधिक पातळीवर व्यवहार करत होता. तर आशियाई बाजारातील चलन ०.१ ते ०.३% घसरून व्यवहार करत होते त्याचा वास्तविक चलनी व्यवहारात मोठा फटका बसल्याने आज बाजारात रूपयात फारशी सुधारणा झालेली नाही. किंबहुना युएस फेडरल रिझर्व्ह बँकेच्या मिनिटमधील माहितीनुसार काही फेड सदस्यांनी विरोध केल्याने अद्याप बाजारातील धोरणाबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे अनिश्चितता अधिक प्रमाणात वाढल्याने डॉलरमध्येही वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील माहितीनुसार, कालपर्यंत मनी मार्केटमध्ये ५०% वरून ३०% व्याजदरातील शक्यता वर्तवली जात आहे. असे असताना रुपया कमकुवत झाल्याने आजही तो 'डाऊन' साईड व्यवहारात कायम आहे. भारतीय सेंट्रल बँकेने डॉलरची विक्री वाढवल्यामुळे गुंतवणूक वाढली होती. अमेरिकेशी व्यापार करार करण्यास विलंब, इराणी तेल खरेदीवरून काही भारतीय कंपन्यांवर निर्बंध आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची शक्यता कमी होत चालल्याने रुपया आणखी कमकुवत झाला.


तज्ञांच्या मते, काल शेवटच्या व्यापारी तासात चलनाने ८९.५/$ चा टप्पा ओलांडला होता. चलनाचे रक्षण करण्यात मध्यवर्ती बँकेची अनुपस्थिती यामुळे 'शॉर्ट स्क्विज' निर्माण झाली होती असेही तज्ञांनी आपल्या निरीक्षणात म्हटले आहे. ज्यामुळे घसरण आणखी वाढली. रुपयाच्या घसरणीनंतर बाँडच्या किमतीही घसरल्या, १० वर्षांच्या बेंचमार्क सरकारी पेपरवरील उत्पन्न मागील बंदपेक्षा ४ बेसिस पूर्णांकाने अधिक बंद झाले.


एका डीलर्सनी सांगितले की, सेंट्रल बँकेने प्रति डॉलर ८८.८० चा टप्पा ओलांडल्यानंतर साईड लाईन्सवर राहण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे स्टॉप लॉस झाला आणि चलन दिवसाच्या नीचांकी पातळीवर घसरले होते. आज मात्र किरकोळ स्थिरतेने रूपया १ पैशाने स्थिरावला असला तरी अद्याप स्थिती बदललेली नाही.

Comments
Add Comment

पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांची कारवाई, उत्तर प्रदेशमधून गुंड सुभाष सिंह ठाकूरला अटक

फतेहगढ : विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणात मिरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे

बुमराह परतणार पण अक्षर पटेल नाही खेळणार, टीम इंडिया चिंतेत

धरमशाला : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली. धरमशाला

महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा, राज्यात कुठे होणार युती आणि कुठे मैत्रीपूर्ण लढती ?

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या

भाजपचा शरद पवार गटाला मोठा धक्का

धुळे : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या

फक्त ९५ चेंडूत १७१ धावा करणारा वैभव आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकणार नाही

मुंबई : भारताच्या वैभव सूर्यवंशीने १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत यूएई विरुद्ध ९५ चेंडूत १७१ धावा केल्या. ही