शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी एसटीची हेल्पलाईन

धाराशिव (प्रतिनिधी) - शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी - विद्यार्थिनींना घरातून शाळेला जाताना अथवा शाळेतून घरी येताना एसटी प्रवासात काही अडचण आल्यास अथवा एसटी बसेस वेळेवर न आल्यास, अचानक रद्द करण्यात आल्यास त्यांना योग्य ती मदत मिळावी यासाठी लवकरच एसटी महामंडळाची ‘हेल्पलाइन’ सुरू करण्यात येत आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.


राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाकडून मानव विकास निधी अंतर्गत राजाच्या दुर्गम व आदिवासीबहुल भागामध्ये शालेय विद्यार्थिनींना प्रवासी सेवा देण्यासाठी ‘मानव विकास बसेस’ उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्या बसेस विशेषत: शालेय विद्यार्थिनींची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात याव्यात. अशा सक्त सूचना देण्यात आलेले असतात. परंतु अनेक आगारात या नियमाची पायमल्ली केलेली दिसून येते. धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मंत्री सरनाईक यांनी धाराशिव मध्यवर्ती बसस्थानकाला भेट दिली असता, तेथे उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांनी अनेक समस्या व तक्रारी सरनाईक यांच्यासमोर मांडल्या.


अनेक शालेय बसेस वेळेवर न सुटणे, गर्दी असल्यामुळे थांब्यावर न थांबणे, बसेस उशिरा येणे अथवा अचानक रद्द होणे यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार त्यातील काही विद्यार्थ्यांनी केल्या. संध्याकाळच्या वेळी शाळा -महाविद्यालय सुटल्यानंतर किमान एक तासात मुले आपल्या घरी जाणे अपेक्षित असते. याबाबत एसटीच्या स्थानिक प्रशासनाने अतिशय गांभीर्याने या गोष्टी घेणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले.
शालेय विद्यार्थी -विद्यार्थिनींना आपल्या घरातून शाळेत जात असताना अथवा शाळेतून घरी येत असताना बसेस उशिरा सुटणे, त्या अचानक रद्द होणे ,तांत्रिक बिघाडामुळे बस नादूरूस्त झाल्याने घरी पोहोचण्यास अडचण निर्माण झाल्यास त्यांनी तातडीने एसटीच्या हेल्पलाइन क्रमांक वर संपर्क करून मदत घ्यावी या हेतूने लवकरच एक हेल्पलाइन क्रमांक प्रदर्शित करण्यात येईल.


विद्यार्थ्यांच्या शालेय नुकसानीची जबाबदारी आगार व्यवस्थापकावर


एसटी बसेस उशिरा सुटणे, अचानक रद्द होणे अथवा अन्य कारणामुळे शालेय विद्यार्थी- विद्यार्थिनींचे तास चुकतात किंवा परीक्षेला ते वेळेवर पोहोचू शकत नाहीत, काही वेळेला त्यांची परीक्षा बुडते . विद्यार्थ्यांच्या नुकसानीला संबंधित क्षेत्रातील आगार व्यवस्थापक व त्यांचे पर्यवेक्षक यांना जबाबदार धरण्यात येईल. शालेय बस फेऱ्यांच्या गैरव्यवस्थापनामूळे विद्यार्थ्यांचे जितक्या दिवसाचे शालेय नुकसान होईल, तितके दिवस यास जबाबदार असणारे पर्यवेक्षक अथवा अधिकाऱ्यांना निलंबित अथवा सक्तीचे रजेवर पाठवण्यात यावे, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या महाव्यवस्थापक (वाहतूक) यांना दिले आहेत.

Comments
Add Comment

Dharashiv Accident : सोलापूर-हैदराबाद महामार्गावर क्रुझरचा भीषण अपघात; धाराशिवमध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू

धाराशिव : सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर धाराशिव जिल्ह्यात आज शनिवारी (२२ नोव्हेंबर २०२५) सकाळी एक भीषण

Nashik Ring Road : नाशिककरांना 'ट्रॅफिक जॅम' मधून मुक्ती! ६६ किमी लांबीचा रिंग रोड कसा असेल? ८,००० कोटींचा प्रोजेक्ट पूर्ण आराखडा!

नाशिक : नाशिक शहराचा जसजसा विकास झाला, तसतशी शहरात वाहतूककोंडीची समस्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या

Dondaicha Nagar parishad Election : ७३ वर्षांचा इतिहास मोडला! दोंडाईचा नगर परिषद पहिल्यांदाच बिनविरोध; रावल यांनी कोणते 'गुप्त राजकारण' केले?

धुळे : राज्याचे पणन व राज शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांनी धुळे (Dhule News) जिल्ह्यातील राजकारणात एक नवा

छापेमारी करत वणीमध्ये मिश्रित कोळसा बनवणाऱ्या माफियांवर मोठी कारवाई

यवतमाळ : वणी परिसरातील लालपुलिया भागात निकृष्ट आणि प्रदूषणकारक कोळशाची खुलेआम विक्री करणाऱ्या कोळसा

परळीमध्ये महायुतीचा गुलाल! शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारांची बिनविरोध निवड

परळी: राज्यभरात नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. उमेदवारांनी निवडणूकीसाठी

निवडणुकीपूर्वीच भाजपने उधळला विजयाचा गुलाल! २४६ नगरपरिषदांपैकी १०० जागांवर बिनविरोध कमळ फुलले

मुंबई: राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी पहायला मिळत आहे. निवडणूकीच्या पहिल्या