मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना आणि पलाश यांच्या विवाहसोहळ्याची धामधूम सध्या जोरात सुरू आहे. नुकताच भारतीय महिला संघाने वनडे विश्वचषक जिंकल्यानंतर हा उत्साह आणखी वाढला असून सांगलीत तिच्या माहेरी क्रिकेटपटूंचा मेळा जमला आहे.
लग्नापूर्वी हळदीच्या विधीचा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडत असून त्यातील आनंदाचे क्षण चाहत्यांसाठी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. स्मृतीच्या सहकाऱ्यांनी हळदीत दिलेल्या डान्स परफॉर्मन्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओंवर नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा अक्षरशः वर्षाव होत आहे.
स्मृती मंधानाच्या घरी जमीन रॉड्रिग्स, रेणुका सिंह, अरुंधती रेड्डी, शफाली वर्मा, राधा यादव यांसह यांच्यासह स्टार वऱ्हाडी मंडळींनी हजेरी लावली आहे. संपूर्ण टीमने लग्नसोहळा अविस्मरणीय बनवण्यासाठी कोणतीही कसर न ठेवता धमालमस्ती करत आहेत . स्मृती आणि पलाशचा विवाह २३ नोव्हेंबर रोजी पार पडणार असून चाहते या सोहळ्यातील पुढील क्षण पाहण्यासाठी चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यांच्या नात्याबाबत चर्चाही रंगल्या होत्या. पण त्यांनी त्यावळेस कोणालाही काहीही माहिती दिली नव्हती . पण २ नोव्हेंबरला भारतीय महिला संघाने वनडे वर्ल्डकप स्पर्धेवर नाव कोरलं, मैदानात स्मृती आणि पालाश ने केलेल्या सेलिब्रेशनवरून त्यांच्या डेट च्या चर्चांना आणखी उधाण आले. आणि त्यांच्या लग्नाच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालं. आणि याच दिवसाचं औचित्य साधत पलाशने डीवाय पाटील स्टेडियममध्ये स्मृतीच्या बोटात अंगठी घालून लग्नाची मागणी घातली. त्याला स्मृतीनेही होकार दिला.