नवी मुंबईत वर्षभर वाहतुकीत बदल

खारघर-तुर्भे लिंक रोड भूमिगत बोगदा प्रकल्पाचे काम सुरू


नवी मुंबई : सिडकोच्या भूमिगत खारघर-तुर्भे लिंक रोड (केटीएलआर) प्रकल्पाच्या बांधकामास कालपासून (२० नोव्हें) सुरूवात करण्यात आली आहे. १.७६३ किमी लांबीच्या या प्रकल्पाचे तुर्भे वाहतूक विभागाच्या हद्दीत खारघर गुरुद्वारा ते जुईनगर रेल्वे स्थानकापर्यंत या प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. वाहनचालकांची होणारी गैरसोय लक्षात घेता नवी मुंबई वाहतूक पोलीस विभागाने एक वर्षासाठी वाहतूक वळवण्याचा आराखडा तयार केला आहे. कालपासून प्रकल्पाचे काम सुरु झाले असून पुढील वर्षी १६ नोव्हेंबरपर्यंत हे वाहतुकीत बदल लागू असणार आहेत. प्रकल्पाच्या कामादरम्यान, वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग आखण्यात आले आहेत. सध्या तुर्भे आणि खारघर दरम्यान प्रवासास ४० मिनिट लागत असूनलिंक रोडमुळे १० मिनिटांपर्यंत कमी होईल. त्याचबरोबर सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत मिळणार आहे.


डीसीपी (वाहतूक) तिरुपती काकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ''तुर्भे वाहतूक युनिटच्या हद्दीत खारघर गुरुद्वारा ते जुईनगर रेल्वे स्थानकापर्यंत भूमिगत केटीएलआर प्रकल्पाचे बांधकाम २० नोव्हेंबर रोजी सुरू झाले आहे. सायन-पनवेल महामार्गावरील शिरवणे पुलाच्या सुमारे १०० मीटर आधी बांधकाम सुरू केले जाईल.''


एकेरी वाहतूक सेवा :
सायन-पनवेल महामार्गाच्या पुणे कॅरेजवेवरील सावन नॉलेज पार्क कंपनी ते शिरवणे एमआयडीसी ते डेल्टा स्टेलर कंपनीकडे जाणारा सेवा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी 'एकेरी' असेल, ज्यामध्ये पोलिस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि सरकारी वाहने यासारख्या आपत्कालीन आणि अत्यावश्यक सेवा वाहने वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी 'एकेरी' असेल.


वाहतूक बंद आणि पर्यायी मार्ग :
उरण फाट्यावरून येणारी वाहने तुर्भे एमआयडीसी रस्त्यावर वळवली जातील. नेरुळहून अंतर्गत रस्त्यांनी येणारी वाहने सायन-पनवेल महामार्गावर वळवली जातील. तर, शिरवणे गावातून एमआयडीसीकडे येणारी वाहने प्रवेशद्वाराजवळील सुरू असलेल्या भूमिगत बोगद्याच्या कामाकडे जाणारी वाहने प्रकल्पाचे काम पूर्ण होईपर्यंत पूर्णपणे बंद राहतील. शिरवणे गावातून येणारी वाहने जुईनगर रेल्वे स्टेशन सर्व्हिस रोडकडे वळवली जातील. तर, शिरवणे गावातून नेरुळमधील एलपी ब्रिजकडे येणारी वाहने एलपी ब्रिज सर्व्हिस रोडकडे वळवली जातील. तसेच, नेरुळ आणि शिरवणे गावातून जाणारी वाहने सायन-पनवेल महामार्गाच्या मुंबई कॅरेजवेकडे वळवली जातील.

Comments
Add Comment

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर ; म्हणून न्यायालयाने पुढे ढकलली सुनावणी

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

साऊथचे सुपरस्टार 'रजनीकांत' चे काय आहे खरे नाव ?

रजनीकांत म्हणून ओळखले जाणारे दाक्षिणात्य तसेच हिंदी चित्रपटांमद्धे नावाजलेले असे ,'थलायवा' अर्थात रजनीकांत

'तरूणांसाठी' पोकोचा नवा C85 5G स्मार्टफोन बाजारात लॉच

मुंबई: व्हॅल्यू फॉर मनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पोको (POCO) ब्रँड हा तरुणाईला नेहमीच भावतो. अशातच कंपनीने आपल्या

पाकिस्तानच्या इतिहासात आयएसआय प्रमुखाला पहिल्यांदाच शिक्षा

जनरल फैज हमीद यांना १४ वर्षे तुरुंगवास इस्लामाबाद : भारताविरोधात कटकारस्थाने रचणारी पाकिस्तानची गुप्तचर

फ्रान्समध्ये वीज झाली पूर्ण मोफत

युरोप  : फ्रान्स देशात काही विशिष्ट कालावधीसाठी विजेची किंमत अचानक 'शून्य' झाली आहे. मागणीत मोठी घट आणि उत्पादनात

काळा घोडा परिसराचे सुशोभीकरण, महापालिका आयुक्तांनी घेतला आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक वारसा आणि पुरातन वास्तू असलेला परिसर म्हणून काळा घोडा