डिसेंबरअखेर 'महामेट्रो' मीरा-भाईंदरकरांच्या सेवेत

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती


मुंबई (प्रतिनिधी) : या वर्षीच्या डिसेंबरअखेर दहिसर ते काशिमिरा मार्गावर मेट्रो सुरू करण्याचे नियोजन आहे. तब्बल १४ वर्षांच्या पाठपुराव्याला यश येत असून मिरा- भाईंदरवासियांचे स्वप्न पूर्णत्वास येत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.


मंत्री सरनाईक यांनी दहिसर ते काशीमिरा या मेट्रो मार्गाचा पाहणी दौरा केला, त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्या सोबत 'महामेट्रो'चे अधीक्षक अभियंता आणि त्यांची तंत्रज्ञ सल्लागार कंत्राटदार टीम उपस्थित होती. या नव्या मार्गाला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे (सीएमआरएस) प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे. ते मिळाल्यानंतरच डिसेंबरअखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या मार्गाचे लोकार्पण होईल, असेही ते म्हणाले.


मंत्री सरनाईक म्हणाले की, ''सन २००९ मध्ये जेव्हा या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलो, त्यावेळी येथील नागरिकांना मेट्रोचे स्वप्न दाखवले होते. २०१४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नगर विकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यामुळे दहिसर ते काशीमिरा या मेट्रो प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली.


लवकरच हा मार्ग सुरू झाल्यानंतर मीरा-भाईंदरवासीय मेट्रोने अंधेरीपर्यंत जाऊ शकतील. तसेच एअरपोर्ट टी-१ वरून मेट्रो-३ चा वापर करून थेट कुलाब्यापर्यंत देखील जाऊ शकतील. त्याचबरोबर, नवीन वर्षात मिरा-भाईंदरवासीयांसाठी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक मंत्रालय, विधान भवन येथे जाण्यासाठी मेट्रोची नेटवर्कद्वारे सुविधा उपलब्ध असणार आहे. दहिसर- काशीमिरा मेट्रो डिसेंबर-२०२६ पर्यंत नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत विस्तारित होणार आहे. त्याबरोबरच वसई- विरार मेट्रो लाईनचे कामदेखील लवकरच सुरू करण्यात येईल. त्यामुळे वसई- विरारपासून अंधेरी आणि तिथून विमानतळ स्थानक इंटरचेंजने थेट कुलाब्यापर्यंत मेट्रोची सेवा पुढील काही वर्षांमध्ये सुरू होऊ शकते, अशी आशा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी व्यक्त केली.

Comments
Add Comment

म्हाडासह इतर शौचालयांच्या देखभालीसाठी आता संस्थांची नेमणूक, मुंबईतील इतर शौचालयेही होणार आता चकाचक आणि दुर्गंधीमुक्त

मुंबई (सचिन धानजी): मुंबईतील म्हाडासह इतर ४३०९ शौचालयांची डागडुजी तसेच सुधारणा केल्यानंतर आता याची देखभाल

दादरमधील प्रभाग १९२ कुणाकडे? उबाठा आणि मनसेमध्येच चढाओढ

मुंबई (सचिन धानजी) : उबाठा आणि मनसेची युती होणार असल्याचे बोलले जात असून त्यादृष्टीकोनातून पावले टाकली जात असली

पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्ग ठरतो मुंबई महापालिकेसाठी पांढरा हत्ती, पुन्हा सुमारे दीडशे कोटींची निविदा मागवला

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या ताब्यात पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग आल्यानंतर या

महापालिका निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द, उबाठा आणि मनसेने खरेदी केल्या याद्या, येत्या २७ नोव्हेंबरपर्यंत नोंदवता येणार हरकती

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आता प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली

शौचालयांच्या देखभालीसाठी आता संस्थांची नेमणूक

मुंबईतील स्वच्छतागृह होणार चकाचक आणि दुर्गंधीमुक्त सचिन धानजी मुंबई : मुंबईतील म्हाडासह इतर ४३०९ शौचालयांची

४५ आयटीआयमध्ये सुसज्ज प्रयोगशाळांची उभारणी

८ हजार विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी मुंबई : राज्यातल्या तरुणांना दर्जेदार रोजगाराभिमुख औद्योगिक प्रशिक्षण