एचएसबीसी पीएमआय आकडेवारी जाहीर, उत्पादन व सेवा निर्देशांकात किरकोळ घसरण तरीही अर्थव्यवस्था 'अशाप्रकारे' टॉप गियरवरच

प्रतिनिधी: एचएसबीसीने आपला पीएमआय (Purchasing Manager Index PMI) खरेदी व्यवस्थापन निर्देशांकातील आकडेवारी आज जाहीर केली आहे. नोव्हेंबरच्या आलेल्या प्राथमिक आकडेवारी उत्पादन निर्देशांकात किरकोळ घसरण झाली आहे. युएसकडून लादलेल्या अतिरिक्त टॅरिफचा फटका, बदलेली अनिश्चित भूराजकीय परिस्थिती, जागतिक किरकोळ आर्थिक मंदी या कारणामुळे या निर्देशांकात घसरण झाल्याचे सर्व्हेत अधोरेखित करण्यात आले आहे. ऑक्टोबर महिन्यातील ५९.२ वरून ५७.४ पातळीवर हा निर्देशांक घसरला आहे. तर ऑक्टोबर महिन्यातील सेवा क्षेत्रातील (Service Sector) निर्देशांकात गेल्या महिन्यातील ५९.५ वरून या महिन्यात ५८.९ पातळीवर घसरण झाली आहे. ही आकडेवारी प्रोविजनल आकडेवारी आहे. दृष्टीत असलेल्या आकडेवारीआधारे हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. अद्याप अंतिम अहवालाला मुहूर्त स्वरूप मिळालेले नाही. पुढील महिन्यात यावरील सेवा व उत्पादन क्षेत्रातील अंतिम आकडेवारी स्पष्ट होणार आहे.


तत्पूर्वी सध्याच्या अहवालातील माहितीनुसार, या दोन्ही घसरणीमुळे कंपोझिट इंडेक्स (एकत्रित सेवा+उत्पादन निर्मिती) निर्देशांकात घसरण झाली आहे. गेल्या महिन्यातील ६०.४ तुलनेत तो नोव्हेंबर महिन्यात ५९.९ पातळीवर किरकोळ घसरला आहे. गेल्या संपूर्ण वर्षातील हा सुरू असलेला वेगवान आलेख यंदा मात्र स्थिरावला आहे. मे महिन्यापासून विचार केल्यास तर उत्पादन व सेवा क्षेत्रातील ही सर्वाधिक स्थिर आकडेवारी आहे.


भारताकडून युएसकडून जात असलेल्या निर्मातीत नव्या निर्बंधांमुळे मोठी घसरण झाली. थेट ८.६% घसरण झाल्याने बाजारात आर्थिक घडामोडी स्थिरावल्या. त्यामुळे अनिश्चिततेत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष व्यापारावर परिणाम झाला आहे. आकडेवारीबाबत बोलताना, सप्टेंबरमध्ये वस्तू आणि सेवा करात कपात केल्याने बहुतेक घरगुती वस्तूंच्या किमती कमी झाल्या आणि देशांतर्गत मागणी वाढून शुल्काचा काही परिणाम कमी करण्यास मदत झाली. तथापि, उत्पादन क्षेत्रातील एकूण नवीन ऑर्डर 'मंद' आल्या, ज्यावरून असे दिसून येते की जीएसटी-नेतृत्वाखालील वाढ शिगेला पोहोचली असेल, असे एचएसबीसीचे मुख्य भारतीय अर्थशास्त्रज्ञ प्रांजुल भंडारी यांनी शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे.


एचएसबीसीने आपला निवेदनात म्हटले आहे की, नवीन ऑर्डर आणि व्यावसायिक घटनांमध्ये वाढ मे महिन्यापासून सर्वात कमी होती. या घडामोडींमुळे, ऑपरेटिंग क्षमतेवर दबाव नसल्यामुळे, रोजगार निर्मितीत घट झाली.' असे यावेळी अधोरेखित केले आहे. तसेच टॅरिफ आणि व्यापक जागतिक व्यापार अनिश्चिततेमुळे ऑक्टोबरमध्ये भारताची व्यापार तूट विक्रमी उच्चांकावर पोहोचली होती. पीएमआय निर्देशांकात अर्थव्यवस्थेवरील व्यवसायाचा विश्वास दर्शवला जातो. प्राथमिक सर्वेक्षणांवर ही आकडेवारी आधारित असते. पुढील महिन्यात अंतिम पीएमआय आकडे जाहीर झाल्यावर डेटा सुधारित केला जाऊ शकतो. ५० पेक्षा जास्त आकडेवारी असल्यास आर्थिक विस्तार दर्शवला जातो तर त्याहून खाली असलेली अर्थव्यवस्था अधोगती दर्शवते.

Comments
Add Comment

IPL 2026 तब्बल ६७ दिवस चालणार, २६ मार्च ते ३१ मे दरम्यान क्रिकेट सामने होणार

मुंबई : आयपीएल २०२६ तब्बल ६७ दिवस चालणार आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या तारखांनुसार आयपीएल २०२६ ची सुरुवात २६

धुक्यात हरवली लखनऊची टी ट्वेंटी

लखनऊ : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील आजचा लखनऊ येथे

Cabinet decisions : गड-किल्ल्यांप्रमाणेच राज्य संरक्षित स्मारक परिसरातील अतिक्रमणे रोखण्यासाठी समिती

मुंबई : राज्यातील गड-किल्ल्यांप्रमाणेच राज्य संरक्षित स्मारकांच्या ठिकाणांवरील अतिक्रमणे रोखण्यासाठी

पाचगणीत लाखोंचे कोकेन जप्त, १० जणांना अटक

पाचगणी : सातारा जिल्ह्यातील पाचगणी हे महाराष्ट्रातले थंड हवेचे लोकप्रिय पर्यटनाचे ठिकाण आहे. याच पाचगणीत लाखो

ब्रेक फेल झाल्यामुळे एक्सप्रेस वेवर अपघात, ट्रकचा झाला चेंदामेदा

रायगड : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बुधवारी मोठा अपघात झाला. सिमेंट ब्लॉक घेऊन जात असलेला ट्रक थेट रस्त्याच्या

फडणवीसांच्या भाषणाआधी भाजप उमेदवाराच्या ऑफिसवर गोळीबार

अंबरनाथ : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमधील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पवन वाळेकर पॅनल क्रमांक चार यांच्या