राज्यभर ईएसआयसी रुग्णालयांसाठी सरकारी जमिनी 'विनामूल्य'!

मुंबई : राज्यात उभारल्या जाणाऱ्या कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ESIC) रुग्णालयांसाठी सरकारी जमीन 'महसूल मुक्त' आणि 'सारा माफी'ने मोफत दिली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला महसूल विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला. यामुळे राज्यात आरोग्य सुविधांचे जाळे अधिक बळकट होईल आणि सामान्य कामगाराला मोठा दिलासा मिळणार आहे.


संभाजीनगर जिल्ह्यातील करोडी येथील १५ एकर गायरान जमीन २०० खाटांच्या कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) रुग्णालयासाठी मोफत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने जून २०२५ मध्ये घेतला होता. त्याच धर्तीवर आता राज्यात जिथे जिथे ईएसआयसी रुग्णालये प्रस्तावित आहेत, तिथे हाच नियम लागू करून सरकारी जमीन उपलब्ध असल्यास विनामूल्य दिली जाईल, असे स्पष्ट केले आहे.


निर्णयाचे स्वरूप आणि जमिनीचे निकष


* एक कोटींपर्यंतचे मूल्य : मागणी केलेल्या जमिनीचे बाजारमूल्य १ कोटी रुपयांपर्यंत असल्यास विभागाच्या स्तरावर निर्णय घेतला जाईल.
* एक कोटींपेक्षा जास्त मूल्य : जमिनीचे मूल्य १ कोटींपेक्षा जास्त असल्यास वित्त विभागाच्या सहमतीने जमीन मोफत दिली जाईल.
* तथापि, या जमिनीचा ताबा हा 'भोगवटादार वर्ग-२' म्हणून राहील.


रुग्णालयांसाठी किती जमीन मिळणार ?


रुग्णालयाच्या खाटांच्या क्षमतेनुसार जमिनीचे क्षेत्रफळ निश्चित करण्यात आले आहे. एफ.एस.आय १.५ किंवा २.० च्या उपलब्धतेनुसार हे प्रमाण असेल.
* ५०० खाटांचे रुग्णालय : ८ ते १२ एकर जमीन.
* ३०० खाटांचे रुग्णालय : ६ ते ९ एकर जमीन.
* २०० खाटांचे रुग्णालय : ५ ते ७ एकर जमीन.
* १०० खाटांचे रुग्णालय : ३ ते ५ एकर जमीन.

Comments
Add Comment

मुंबईतील गोरेगावात ४५ मजली इमारतीला भीषण आग

मुंबई: मुंबईतील गोरेगाव परिसरात असलेल्या ४५ मजली इमारतीला भीषण आग लागली आहे. या इमारतीच्या नवव्या मजल्यावर

पहिल्या महापालिका सभेत मुख्यमंत्र्यांच्या समक्ष भाजप नगरसेवकांचे घडले असे दर्शन

मुंबई :  मुंबई महापालिकेत मागील पाच वर्ष केवळ पहारेकरी म्हणून काम करणाऱ्या भाजपने खऱ्या अर्थाने विरोधी पक्षाची

जे जे उड्डाणपूलाखाली परिसरातील वर्षानुवर्षांच्या कचऱ्यांसह अतिक्रमणांची जळमटेही केली दूर

मुंबई : दक्षिण मुंबईतील जे जे उड्डाणपूलाखालील भागात मागील काही वर्षांपासून अतिक्रमण होऊन मोठ्याप्रमाणात

मंत्रालयात लाच घेताना लिपिकाला अटक

मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपिकाला लाच घेताना मंत्रालयात सापळा रचून मोठी कारवाई केली. राजेंद्र ढेरंगे

रेस्टॉरंट्सकडून 'सर्व्हिस चार्ज' आकारणी; मुंबई ग्राहक पंचायतीची कारवाईची मागणी

मुंबई  : 'सर्व्हिस चार्ज देणे हे सक्तीचे नसून तो देणे हा ग्राहकांच्या पूर्णपणे स्वेच्छेवर अवलंबून असताना

विजय मल्ल्या भारतात परतणारच नसतील, तर आम्ही याचिका का ऐकावी?

मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल मुंबई  : फरार आर्थिक गुन्हेगार विजय मल्ल्याने आधी भारतात परत यावे. आम्ही तातडीने