गोदरेज प्रॉपर्टीजडून नागपूरात ७५ एकर जागेचे अधिग्रहण

मुंबई: गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड (Godrej Properties Limited) कंपनीकडून नागपूरात मोठी गुंतवणूक होणार आहे. कंपनीने नागपूरमध्ये ७५ एकर जमीनीचे अधिग्रहण केल्याचे एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीत म्हटले आहे. आर्थिक वर्ष १०२६ मध्ये एकूण २०००० कोटींचा व्यवसायिक टप्पा पार केल्याचे कंपनीने यावेळी स्पष्ट केले आहे.


१.७ दशलक्ष स्क्वेअर फूटांचा हा विक्रीयोग्य भूखंड असून कंपनीने नागपूरमध्ये गेल्या चार वर्षांत हा तिसरा भूखंड खरेदी केला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या क्षेत्रात गृहनिर्माण होणार आहे. मिहान सेझ व समृद्धी महामार्गाला कनेक्ट होणारा हा भूखंड असणार आहे असे कंपनीने म्हणत कनेक्टिव्हिटीमध्ये महत्वाच्या मोक्याच्या जागी हा भूखंड विकसित केले जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.


या विषयी बोलताना, गोदरेज प्रॉपर्टीजचे कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव पांडे म्हणाले आहेत की,'नागपूर पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकासाचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून आपले स्थान मजबूत करत आहे, ज्याला कनेक्टिव्हिटी सुधारणे आणि वाढत्या निवासी मागणीमुळे पाठिंबा मिळत आहे. भारतातील उदयोन्मुख रिअल इस्टेट बाजारपेठांमध्ये आमची उपस्थिती मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न असल्याने, हे अधिग्रहण आमच्या विस्ताराच्या प्रवासात आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे.
आम्ही आमच्या विकसित होत असलेल्या आकांक्षांशी सुसंगत, त्याच्या रहिवाशांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करणारी दर्जेदार प्लॉटेड टाउनशिप विकसित करण्यास उत्सुक आहोत.'

Comments
Add Comment

समृद्धी महामार्गावरील स्वच्छतागृहांची दुरवस्था दूर करून ‘गूगल लोकेशन’ एका महिन्यात उपलब्ध करा; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे शासनाला निर्देश

नागपूर : विधान परिषदेत आ.मिलिंद नार्वेकर यांनी समृद्धी महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातात नागरिकांच्या

शेत रस्त्याच्या वादात मिळणार 'मोफत' पोलीस संरक्षण

उपविभागीय अधिकाऱ्यांनाही अधिकार सोपविण्याची तरतूद विलंब टाळण्यासाठी इमेल द्वारे पाठविण्यात येणार नोटीस •

मुद्रांक शुल्क वादाबाबत उच्च न्यायालयाऐवजी थेट राज्य शासनाकडे अपील

विधानसभेत सुधारणा विधेयक एकमताने मंजूर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत मांडले

 भोगवटादार वर्ग-२ जमिनींवरील 'गहाण शुल्क' वसुलीला कायदेशीर संरक्षण २००९ पासूनची आकारणी वैध ठरणार

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत मांडलेले विधेयक संमत 'महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (दुसरी

"उद्धव ठाकरे अधिवेशनासाठी नाही, तर सहलीला आलेत"; परिणय फुकेंचा घणाघात

नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपुरात राजकीय वातावरण तापले आहे. उद्धव ठाकरे यांनी विधानसभा

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातून गावांच्या समृद्धीची दिशा मिळेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान शीर्षक गीत लोकार्पण कार्यक्रम नागपूर : राज्यात मागील काही दिवसात झालेल्या