अदानी समुह अदानी विल्मर लिमिटेडमधून संपूर्णपणे 'Exit' ब्लॉक डील मार्फत आपली ७% हिस्सेदारी विकली

मोहित सोमण: एक्सचेंज फायलिंगमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, अदानी विल्मर लिमिटेडमधील उर्वरित ७% हिस्साही (Stake) अदानी समुहाने ब्लॉक डील मार्फत विकला आहे. यापूर्वी समुहाने आपला राहिलेल्या भागभांडवलापैकी १३% हिस्सा विकला तर आज उर्वरित ७% हिस्सा विकल्याने अदानी समुहाचा हिस्सा कंपनीतून जवळपास संपुष्टात आला आहे. Charles Schwab, ICICI Prudential, SBI Mutual Fund, Bandhan Mutual Fund, Tata Mutual Fund या म्युच्युअल फंड कंपन्यानी हा उर्वरित हिस्सा खरेदी केला आहे अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. त्याउलट जीआयसी आपले भागभांडवल आगामी काळात आपले भागभांडवल विल्मर कंपनीतील वाढवत आपले कंपनीतील स्थान बळकट करु शकते असे प्रसारमाध्यमांना सुत्रांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे. ब्लॉक डीलमध्ये कंपनीच्या जवळपास ६.६% इक्विटीचे हस्तांतरण झाल्याने AWL स्टॉक ३.७% ने घसरून २६६.४५ रूपये प्रति शेअरवर आला.


आता भारतीय म्युच्युअल फंड हाऊसेस व्यतिरिक्त परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारही या भागभांडवलात आपला नवा हिस्सा खरेदी करत आहेत. एकट्या अदानी एंटरप्राईजेसचे वास्तव्य (Total Realisation) १५५०७ कोटी रूपये आहे. यापूर्वी कंपनीने विल्मर कंपनीतील ४४% हिस्सा राखला होता मात्र त्यातील हिस्सेदारी सातत्याने विकल्याने आता तो रद्दबादल झाला आहे. त्यामुळे मूळची सिंगापूर कंपनी विल्मरच सगळ्यात मोठी कंपनीतील हिस्सेदार असणार आहे. कंपनीची 'फॉर्च्यून' सारखी प्रसिद्ध खाद्यतेल उत्पादन आहे. रेडी टू कूकसाठी लागणारी विविध खाद्यतेल उत्पादनात कंपनी कार्यरत आहे. दरम्यान असे असले तरी कंपनीचे फंडांमेटल मजबूत स्थितीत असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. गेल्या एका वर्षात AWL Agri चा शेअर १५% ने घसरला आहे, परंतु सहा महिन्यांत ३.५%, तीन महिन्यांत ३.७% आणि गेल्या महिन्यात ३% ने वाढला आहे. डिसेंबर २०२४ मध्ये हा शेअर ५२ आठवड्यांचा उच्चांक ३३७ आणि फेब्रुवारी २०२५ मध्ये ५२ आठवड्यांचा नीचांक २३१.५५ वर पोहोचला आहे.

Comments
Add Comment

काँग्रेसचे माजी नगरसेवक धर्मेश व्यासही भाजपात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : काँग्रेसचे माजी नगरसेवक धर्मेश व्यास यांनीही अखेर भाजपच्या झेंडा हाती घेतला. धर्मेश

मीरा भाईंदरच्या मच्छीमारांच्या सर्व समस्या सोडवणार, मंत्री नितेश राणेंचे आश्वासन

भाईंदर : मीरा भाईंदर शहरातील उत्तन परिसरातील मच्छीमारांवर होत असलेला अन्याय दूर करून त्यांच्या सर्व समस्या

चिंता करू नका, नाशिक - पुणे रेल्वे देवठाण मार्गेच

अकोले (प्रतिनिधी) : चिंता करू नका, नाशिक-पुणे रेल्वे देवठाण मार्गेच नेण्यासाठी पालकमंत्री म्हणून तुम्हाला शब्द

बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘आरोग्य आपल्या दारी’ उपक्रम राबवणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवक व नगराध्यक्षांचा सत्कार मुंबई : “मुख्यमंत्रीपदी

शिरोडा-वेळाघरमध्ये होणार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले पंचतारांकीत हॉटेल

पालकमंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश; ताज समूहासोबत लवकरच सामंजस्य करार मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील

खरीप हंगाम २०२४–२५;मका,ज्वारी सह भरड धान्य खरेदीसाठी शेतकरी नोंदणीला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

मुंबई : खरीप हंगाम २०२४–२५ अंतर्गत शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान व मका, ज्वारी, रागीसह भरड धान्य