Stock Market Closing Bell: वित्तीय, ऑटो शेअरमधील तेजीसह सेन्सेक्स निफ्टीने उच्चांकी पातळीवर ! सेन्सेक्स ४३६.२१ अंकाने व निफ्टी १३९.४० अंकाने उसळला 'या' कारणांमुळे

मोहित सोमण:आज अखेरच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात वाढ नोंदवली गेली आहे. आज सेन्सेक्स ४४६.२१ अंकाने उसळत ८५६३२.५८ पातळीवर व निफ्टी १३९.५० अंकाने उसळत २६१९२.१५ पातळी स्थिरावला आहे. मधल्या सत्रात सेन्सेक्सने ८५५९० व निफ्टीने २६२०० पातळी पार पडली असल्याने दोन्ही बेंचमार्क निर्देशांकात उच्चांक वाढ झाल्याचे बाजारात पहायला मिळाले. दुसरीकडे आज प्रामुख्याने आज फायनांशियल सर्विसेस, फायनांशियल सर्विसेस एक्स बँक, तेल व गॅस निर्देशांकात झालेल्या वाढीमुळे बाजारात रॅली झाली आहे. प्रामुख्याने आज शेअर बाजारातील जागतिक तेजी अस्थिरतेला मागे टाकत मजबूत बाजार फंडामेंटलसह झळकल्याने बाजारात वाढ झाली असली तरी आयटी शेअरमधील वाढ अनपेक्षितपणे अखेरच्या सत्रात कमी झाली आहे. बँक निर्देशांकाने वाढ किरकोळ नोंदवली असून मिडकॅपमध्ये वाढ झाली असून स्मॉलकॅप शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे रॅली मर्यादित राहिली. तरी देखील अस्थिरता निर्देशांक २% पातळीच्या (१.४८%) राहिल्याने बाजारात दिलासा मिळाला.


आज दिवसभरात युएस फेड व्याजदरात कपातीची संभावना गडद झाली होती तर भारतासह आशियाई बाजारातील 'बुलिश' वातावरण कायम राहिल्याने बाजारात घसरणीची संभावनाच नष्ट झाली. जागतिक महत्वाच्या घडामोडीनुसार, युएस सरकारने मध्यस्थी करत रशिया युक्रेन समेट घडवण्यासाठी वेगवान प्रयत्न सुरु केले आहेत. नव्या पीस डीलच्या मसुद्यानुसार युक्रेनचा काही भाग व हत्यारे रशियाला मिळू शकतात. तसेच रशियाकडूनही कुठलीही माघार न घेता हा करार होऊ शकतो असे सुत्रांनी आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांना म्हटले आहे. अद्याप हा करार गुलदस्त्यातच असला तरी रशिया नाटोत सहभागी विनाशर्त सहभागी होत असेल व युक्रेनवर युएसकडून प्रस्ताव स्विकारण्यासाठी दबाव टाकला जात असेल तर आशियाई खंडासह भारतावरही या घटनेचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो. तसेच भारतीय शेअर बाजारात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची गुंतवणूक राखण्यात मदत होत असताना ही वाढ घरगुती गुंतवणूकदारांनाही अधिक गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन देत आहे. गेल्या तीन दिवसातील मजबूत तिमाहीतील निकालानुसार बाजारात तेजीचे व औत्सुक्याचे वातावरण कायम आहे. याखेरीज कच्च्या तेलासह काही प्रमाणात सोन्याचांदीच्या दरातही किरकोळ स्थिरता आल्याने बाजारात वेगळे वलय निर्माण झाले. दरम्यान शेअर बाजारातील लार्जकॅप शेअर्सने आज अपेक्षेपेक्षा अधिक चांगली कामगिरी केल्यानंतर आज बाजारात वाढ झाली आहे.


निफ्टी व्यापक निर्देशांकात आज निफ्टी १०० (०.४३%), निफ्टी २०० (०.३६%), निफ्टी ५०० (०.२९%) निर्देशांकात सर्वाधिक वाढ झाली. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक वाढ फायनांशियल सर्विसेस (०.७९%), निफ्टी फायनांशियल सर्विसेस एक्स बँक (०.७०%),ऑटो (०.४०%), खाजगी बँक (०.३१%),तेल व गॅस (०.५५%) निर्देशांकात झाली असून सर्वाधिक घसरण मात्र पीएसयु बँक (०.८९%), कंज्यूमर ड्युरेबल्स (०.५३%), फार्मा (०.१८%), मिडिया (१.५४%) निर्देशांकात झाली आहे. आशियाई बाजारातील अखेरच्या सत्रात जवळपास सगळ्याच निर्देशांकात वाढ झाली. शांघाई कंपोझिट (०.४०%) वगळता गिफ्ट निफ्टी (०.७०%) सह निकेयी २२५ (२.७७%), तैवान वेटेड (३.०९%), सेट कंपोझिट (०.७५%), कोसपी (१.८८%) निर्देशांकात झाली आहे.


आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ जेपी पॉवर वेंचर (६.७६%), एम अँड एम फायनांशियल सर्विसेस (५.०८%), नेटवेब टेक्नॉलॉजी (४.६१%), आयईएक्स (४.३९%), रेडिको खैतान (४.२९%), टीबीओ टेक (४.२१%), हिताची एनर्जी (३.५७%) समभागात झाली आहे.आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण वोडाफोन आयडिया (४.८६%,), सनटिव्ही नेटवर्क (४.०८%), इंटलेक्ट डिझाईन (३.९६%),एबी लाईफस्टाईल (३.७०%), शिंडलर (३.४८%), होंडाई मोटर्स (३.३६%), सिटी युनियन बँक (३.२५%),फाईव्ह स्टार बसेस (२.६६%), युको बँक (२.५१%) समभागात झाली आहे.


आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना अशिका इन्स्टिट्युशनल इक्विटीजने म्हटले आहे की,'भारतीय बाजारांनी गुरुवारीच्या सत्राची सुरुवात सकारात्मक पातळीवर केली, ज्यामुळे आशियाई बाजारातील मजबूत भावनांचे संकेत मिळाले. गुंतवणूकदारांचा सततचा विश्वास आणि व्यापक खरेदीचा रस दिसून येतो, हे बेंचमार्क निफ्टी २६२७७ पातळीच्या त्याच्या सर्वकालीन उच्चांकाच्या जवळ पोहोचला. तेल आणि वायू, पायाभूत सुविधा, वित्तीय सेवा, ऊर्जा आणि ऑटो यासारख्या क्षेत्रांमुळे वाढ झाली, ज्यांनी निर्देशांकाला मजबूत आधार दिला. तथापि, मीडिया, सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि रिअल्टीमध्ये कमकुवतपणा दिसून आला, ज्यामध्ये सौम्य नफा झाला. संभाव्य अमेरिका-भारत व्यापार कराराच्या सभोवतालच्या आशावादामुळे बाजारातील आत्मविश्वास वाढला आहे. डेरिव्हेटिव्ह्जच्या आघाडीवर, पॉवरइंडिया, एमएफएसएल, नौक्री, आयचरमोट आणि कमिन्सइंडमध्ये ओपन इंटरेस्टमध्ये लक्षणीय वाढ दिसून आली, जी बाजारातील खेळाडूंनी सक्रिय सहभाग आणि नवीन स्थिती दर्शवते. दरम्यान, निफ्टीचा मासिक समाप्ती पुट-कॉल रेशो (पीसीआर) १.४९ वर आहे, जो पुट लेखन आणि अंतर्निहित बाजारातील ताकदीकडे पक्षपात दर्शवितो.'


आजच्या बाजारातील बँक निफ्टीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे तांत्रिक विश्लेषक वत्सल भुवा म्हणाले आहेत की,' गुरुवारच्या सत्रात बँक निफ्टीने एक लहान कॅंडलस्टिक तयार केली, दैनिक चार्टवर Relative Strength Index RSI) ७४ पर्यंत वाढला, जो अल्पकालीन सावधगिरी बाळगण्याची गरज दर्शवितो. अनुकूल जोखीम-रिवॉर्ड (Risk to Reward) सेटअपसाठी नवीन दीर्घ पोझिशन्स फक्त ५९५०० पातळीच्या या वर किंवा ५८८०० पातळीच्या दिशेने घसरणीवर विचारात घेतल्या पाहिजेत, जरी अल्पकालीन आणि व्यापक दृष्टिकोन तेजीचा राहिला आहे. डेरिव्हेटिव्ह्जमध्ये, मोठ्या प्रमाणात पुट रायटिंग दिसून आले, ज्यामुळे तात्काळ आधारावर ५९००० आणि स्थितीनुसार ५८८०० पातळीवर आधार मजबूत झाला, तर प्रतिकार पातळी ५९५०० आणि ६०००० पातळीवर ठेवली गेली.'


'भारत-अमेरिका व्यापार चर्चेच्या आशावादामुळे आणि पहिल्या टप्प्यातील करारांवरील प्रगतीमुळे भारतीय शेअर बाजार वधारला, ज्यामुळे एकूण बाजारातील भावना वाढल्या. जागतिक संकेत देखील मजबूत राहिले, ज्याचे नेतृत्व चांगल्या कमाईनंतर तंत्रज्ञान-चालित नफ्यामुळे झाले. नवीन FII आवक आणि ऑटो, फायनान्शियल्स आणि आयटी सारख्या लार्ज-कॅप क्षेत्रांमध्ये ताकद यामुळे उत्साही ट्रेंडला पाठिंबा मिळाला. जवळच्या काळातील दृष्टिकोन सकारात्मक राहिला आहे, जरी गुंतवणूकदारांनी अमेरिकेच्या महत्त्वाच्या आर्थिक डेटाच्या आधी सावधगिरी बाळगली पाहिजे जे अल्पकालीन अस्थिरता निर्माण करू शकतात.' असे जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत.

Comments
Add Comment

सायबर फसवणुकींचे नवे डावपेच: सर्वसामान्यांवर वाढता धोका त्यापासून कसे वाचाल फेडेक्सने काय म्हटले? वाचा ....

मुंबई: सायबर गुन्हे आपल्याला कल्पनाही येणार नाही, इतक्या वेगाने बदलत चालले आहेत आणि घोटाळेबाज आता अत्यंत

Tamhini Ghat : २० दिवसांपूर्वीची नवी 'थार' ५०० फूट दरीत! कोकणात निघालेल्या ४ मित्रांवर काळाचा घाला; दोन दिवसांनी घटना उघडकीस

रायगड : पुण्यावरून कोकणात पर्यटनासाठी निघालेल्या चार मित्रांवर रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात भीषण अपघात

इतिहासातील सर्वात मोठा 'गफला' - मेटा व्हॉट्सॲपच्या निष्काळजीपणामुळे ३.५ अब्ज लोकांची अत्यंत खाजगी माहिती लीक?

प्रतिनिधी: ऑस्ट्रियातील युनिव्हर्सिटी ऑफ व्हिएन्ना येथील संशोधकांनी शोधून काढलेल्या निष्कर्षात धक्कादायक

धक्कादायक प्रकार, पुण्यात १६ जेष्ठ नागरिकांना उघड्यावर टाकले

पुणे : पुण्यातील सामाजिक सुरक्षेच्या यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना समोर आली आहे. शहरातील १६

बँक खातेदारांसाठी मोठी बातमी - आता कॅपिटल गेन खाते खाजगी बँकातही काढता येणार 'हे' असतील नवे नियम

प्रतिनिधी: बँक खातेदारांसाठी एक महत्वाची अपडेट पुढे आली आहे. आता कॅपिटल गेन खात्यासाठी सरकारी पीएसयु बँकांमध्ये

आकडेवारीच समोर - परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या भारतातील गुंतवणूकीत १४ महिन्यातील नवा उच्चांक प्रस्थापित

प्रतिनिधी: भारतीय शेअर बाजारात टेक्निकल व फंडामेंटलदृष्ट्या मोठ्या प्रमाणात तेजी दिसत आहे. युएस बाजारात