उठाबशा काढायला सांगणाऱ्या शिक्षिकेला शिक्षा!

ममता यादववर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल


वसई : उठाबशा काढण्यास सांगितल्यामुळे वसईच्या एका शाळेतील मुलीचा मृत्यू झाल्याची घटना वसईत शुक्रवारी घडली होती. या प्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनंतर उठाबशा काढण्यास सांगणाऱ्या शिक्षिकेविरोधात अखेर मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तिला अटक देखील करण्यात आली आहे.


श्री हनुमत विद्या मंदिर शाळेत इयत्ता सहावीमध्ये काजल (अंशिका) गौड ही वर्षीय मुलगी शिकत होती. ८ नोव्हेंबरच्या दिवशी सकाळी शाळेत पोहोचण्यास तिला उशीर झाल्याने उठाबशा काढण्याची शिक्षा तिला दिली होती. मात्र शाळेतून घरी गेल्यानंतर तिची तब्येत खालावली. त्यामुळे तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यानच शुक्रवारी रात्री तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुंबईच्या जे जे मार्ग पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर हा गुन्हा वालिव पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता. उठाबशा काढण्यास सांगितल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला होता, तर त्याबाबतची तक्रार त्यांनी वालिव पोलीस ठाण्यात नोंदविल्यानंतर पोलिसांनी उठाबशा काढण्यास सांगितलेल्या शिक्षिका ममता यादव यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून तिला अटक केल्याची माहिती वालिव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप घुगे यांनी दिली.


काजल ही आधीच अशक्त होती. त्यातच तिला बॅगेचे ओझे खांद्यावर घेऊन १०० उठाबशा काढण्यास सांगितल्या. १०० उठाबशा काढण्याची क्षमता नसल्याची जाणीव असतानाही तिला शिक्षा दिल्याने तिची तब्येत खालावली आणि त्यातच तिचा मृत्यू झाल्याची फिर्याद तिच्या कुटुंबाने पोलिसांनी दिली आहे. तर दुसरीकडे मुलीच्या मृत्यू प्रकरणी तालुका आणि जिल्हा शिक्षण विभागातर्फे याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

उपभोग व सार्वजानिक गुंतवणूकीत झालेल्या वाढीमुळे भारताची अर्थव्यवस्था यावर्षी ६.६% दराने वाढणार-संयुक्त राष्ट्र

मुंबई:विविध अहवालातून भारतीय अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत असून जगातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था म्हणून

जन नायगन; थलापती विजयचा शेवटचा चित्रपट ९ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार नाही, कारण आले समोर...

हैद्राबाद : नुकताच विजय थलापथी याने अभिनय क्षेत्राला कायमचे रामराम ठोकून पूर्णपणे राजकारणात प्रवेश करणार

Devendra Fadnavis On Raj Thackeray : राज ठाकरे इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवाचे धनी ठरतील; फडणवीसांनी मांडलं पराभवाचं गणित, ठाकरेंच्या 'वारशा'वरही ओढले ताशेरे

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी चक्क त्यांच्या राजकीय

मोदी यांचे दुर्लक्ष ट्रम्प यांच्या जिव्हारी? मोदींनी फोन केला नाही म्हणून..... हॉवर्ड लुटनिक यांचे मोठे विधान

मोहित सोमण: सातत्याने युएस व भारत यांच्यातील द्विपक्षीय करारावर चर्चेच्या फेऱ्या सुरु होत्या. मात्र नेमक्या

धक्कादायक! चंद्रपुरात पतीकडून पत्नीची जिवंत जाळून हत्या; दरवाजाला कडी लावून फरार

चंद्रपूर : महाराष्ट्रात स्त्रियांवरील अत्याचार आणि हुंडाबळीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच,

Iran Crisis: इराणमध्ये महागाईचा वणवा! १०० शहरांत जनआक्रोशाचा भडका, ८ मुलांसह ४५ जणांचा मृत्यू

तेहरान विमानतळ आणि इंटरनेट सेवा ठप्प तेहरान : इराणमध्ये वाढत्या महागाईच्या वणव्याने आता उग्र रूप धारण केले असून,