मुंबईत निवडणुकीची चाहूल; राज्य सरकारचा पुनर्विकासाला चालना देणारा मोठा निर्णय

मुंबई : मुंबईतील बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच राज्य सरकारने नागरिकांना थेट लाभ देणारा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. मुंबईच्या पुनर्विकास प्रक्रियेत अडकलेल्या भाडेकरूंना दीर्घकाळापासून भेडसावत असलेली नोंदणी शुल्काची अडचण दूर करण्यासाठी ही योजना महत्वाची ठरणार आहे.


महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडियावर शासन आदेशाची प्रत शेअर करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली घेतलेला हा निर्णय जाहीर केला.


राज्य शासनाने जारी केलेल्या नवीन निर्देशांनुसार, मुंबई महापालिका क्षेत्रातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासात भाडेकरूंना मिळणाऱ्या नवीन घरांवर नोंदणी शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले आहे.


भाडेकरूंना ४०० ते ६०० चौरस फूटपर्यंत मिळणाऱ्या जागेवर नोंदणी फी आकारली जाणार नाही.


बांधकाम क्षेत्र २०० चौरस फूटांनी वाढले, तरीही शुल्क माफी लागू राहील.


महसूल विभागाने यासाठी औपचारिक परिपत्रक जारी केले असून मूल्य निर्धारणात कोणताही बदल होऊ नये, अशी स्पष्ट सूचना दिली आहे.





मुंबईत अनेक इमारती धोकादायक अवस्थेत असून पुनर्विकासाची प्रक्रिया वर्षानुवर्षे लांबते. अनेक वेळा नोंदणी शुल्काचा भार पेलता न आल्याने भाडेकरू पुनर्विकासात अडथळा ठरत होते.


नव्या धोरणामुळेभाडेकरूंच्या खिशावरचा ताण कमी होणार आहे. भाडेकरूंना आर्थिक दिलासा मिळेल, पुनर्विकास व्यवहार अधिक पारदर्शक होईल आणि बांधकाम प्रकल्पांना आवश्यक गती मिळेल. यामुळे शहराचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.


मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येत असताना, शहरातील सर्वसामान्य नागरिकांना थेट लाभ देणारा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. पुनर्विकासाच्या अडथळ्यांमुळे त्रस्त असलेल्या हजारो भाडेकरूंना हा निर्णय दिलासा देणारा ठरणार आहे.

Comments
Add Comment

भिवंडीतील ट्रॅफिकवर कायमस्वरूपी तोडगा; १० एकर जागेवर विशेष व्यवस्था, मंत्री मेघा बोर्डीकर यांची घोषणा

नागपूर : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा मुंबईपर्यंतचा विस्तार आणि ठाणे-भिवंडी परिसरातील

मुंबईतील गोरेगावमध्ये भटक्या कुत्र्यांच्या टोळीने तोडले महिलांच्या गालांचे लचके

मुंबई : भटक्या कुत्र्यांच्या टोळीने महिलांच्या गालांचे लचके तोडल्याची धक्कादायक घटना मुंबईतील गोरेगावमध्ये

काळा घोडा परिसराचे सुशोभीकरण, महापालिका आयुक्तांनी घेतला आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक वारसा आणि पुरातन वास्तू असलेला परिसर म्हणून काळा घोडा

विलेपार्ल्यात महायुतीचा जोर, उबाठा आणि काँग्रेसच्या उमेदवारांसमोर आव्हान

चित्र पालिकेचे विलेपार्ले विधानसभा  मुंबई (सचिन धानजी) : उत्तर मध्य मुंबईतील विलेपार्ले विधानसभा क्षेत्रात

मुंबई पागडीमुक्त करण्यासाठी स्वतंत्र नियमावली

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्वाची घोषणा मुंबई : मुंबई शहराला पागडीमुक्त करण्यासाठी तसेच पागडी

पारंपरिक कोल्हापुरी कौशल्याला प्राडाची आधुनिक साथ

मुंबई : भारतीय पारंपरिक चर्मकला कोल्हापुरी चपलांचा वारसा जगभर पोहोचवण्यासाठी जागतिक ब्रॅन्ड प्राडा, लिडकॉम (संत