महापौर भाजपचाच होईल, नरेंद्र पवार यांचे स्पष्ट विधान

मुंबई : राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांनंतर महापालिका निवडणुकांचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे, तर दुसरीकडे, कल्याण-डोंबिवली महापालिकेतील सत्ता संघर्ष अधिक तीव्र होत आहे. भाजप आणि शिवसेनेत महापौर पदावर वर्चस्व मिळवण्यासाठी जोरदार स्पर्धा सुरु आहे. याचदरम्यान, भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी एक विधान करून शिंदे गटाला डिवचले आहे.


भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेत महापौर भाजपचाच होईल,असे ठामपणे सांगितले. पवार म्हणाले, "आमचं संघटन मजबूत आहे आणि युती झाली तरीही महापौर भाजपचाच होईल. आम्ही जास्त नगरसेवक निवडून आणू आणि आमच्या संघटनेची ताकद निश्चितच महापौर पद मिळवून देईल." युतीच्या संभाव्य घटकांनी एकत्र लढल्यास महायुतीचा महापौर असणार, तर भाजप एकट्याने लढल्यासही त्यांची संघटना त्यांना विजय मिळवून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


नरेंद्र पवार यांनी भाजपमध्ये होणाऱ्या पक्ष प्रवेशांवरही भाष्य केलं. त्यानुसार, भाजपचा प्रभाव वाढत आहे कारण केंद्र आणि राज्यात सत्ताधारी पक्ष आहे. "डोंबिवलीत आमचे संघटन बळकट आहे. त्यामुळे इतर पक्षांच्या नाराज कार्यकर्त्यांना आमच्या पक्षात सामील होण्याची संधी मिळते," असे पवार म्हणाले. माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांची भाजपमध्ये दाखल होण्याची प्रक्रिया चालू असल्याचे पवार यांनी सांगितले. त्यानुसार, "शिवसेना, मनसे, काँग्रेस आणि अन्य पक्षांचे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत कारण त्यांना इतर पक्षांमध्ये आदर आणि कामाची संधी मिळत नाही."


महायुतीतील अंतर्गत पक्षांतरावर पवार यांनी सांगितले की, "आमच्या पक्षाचे नाराज कार्यकर्ते शिवसेनेत जातात, तर शिवसेनेचे कार्यकर्ते आमच्याकडे येतात. हे सर्व एकाच घरातले सदस्य आहेत. महायुतीतील दोन पक्षांतील गतीचं हे स्वरूप आहे आणि यामुळे आमची ताकद वाढली आहे." त्याचबरोबर, युती होईल न होईल, विकास निधी आणि सत्तास्थापनासाठी या दोन्ही पक्षांचे एकत्रित काम सुरू राहील, असे पवार यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

भाजपमधील वाढत्या इनकमिंगमुळे शिवसेनेत अस्वस्थता, एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना

मुंबई : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्ष मोर्चेबांधणी करत आहेत. या

देशातील २७२ मान्यवरांचे खुले पत्र, पत्रातून राहुल गांधींचा जाहीर निषेध

नवी दिल्ली : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेसची निवडणुकीतील पराभवाची रेषा सातत्याने खाली उतरते आहे.

सम्राट चौधरींना 'मोठा माणूस' म्हणून संबोधून भाजपने खेळली नवी खेळी

बिहार : बिहार निवडणुकीत सम्राट चौधरी यांच्यावर लावण्यात आलेल्या असंख्य आरोपांनंतरही भाजपने त्यांच्यावर

'पिट्या भाई'ने कमळ घेतले हाती! अभिनेता रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश

पुणे: 'मुळशी पॅटर्न' चित्रपट फेम पिट्या भाई म्हणजेच अभिनेता रमेश परदेशीने आता कमळ हाती घेतले आहे. काही

एनडीए बिहारमध्ये पास, दिल्ली आणि महाराष्ट्रात 'स्थानिक'च्या परीक्षेसाठी सज्ज

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने २४३ पैकी २०२ जागांवर विजय मिळवत सत्ता कायम राखली. एनडीए बिहार

महायुतीत कुरबुरी ? एकनाथ शिंदेंनी दिली 'ही' प्रतिक्रिया

मुंबई : राज्यात महायुतीत मिठाचा खडा पडतो की, काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस