Stock Market Opening Bell: 'घसरणयुक्त तेजी' शेअर बाजारात विचित्र कौल! आयटीतील जोरावर तेजी, सेन्सेक्स २९.२४ अंकाने निफ्टीत मात्र ८.०५ अंकाने घसरला

मोहित सोमण: आज सकाळी शेअर बाजारात संमिश्रित घसरणीकडे कल दिसून आला. प्री ओपनिंग सत्रात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात किरकोळ घसरण दिसत आहे. प्री ओपनिंग सेन्सेक्स २९.२४ अंकाने घसरला असून व निफ्टीत मात्र ८.०५ अंकाने घसरला होता. बाजारात सुरूवात होताच सेन्सेक्स १४.२२ अंकाने वधारला असून व निफ्टी मात्र ७.१० अंकांने घसरला आहे त्यामुळे शेअर बाजार विचित्र अथवा 'सपाट' घसरणीकडे असल्याने आजही गुंतवणूकदार युएस फेड दर कपातीसह भारतातील आगामी पीएमआय आकडेवारीची वाट पाहू शकतात. अंतिमतः ते सावधगिरी बाळगतील अशी चिन्हे दिसत आहेत. मात्र अखेरच्या बँक निर्देशांकात वाढ अपेक्षित असल्याने आज बाजारात सपोर्ट लेवल मिळेल का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


सकाळच्या सत्रातील सुरुवातीला निफ्टी व्यापक निर्देशांकातील सर्वाधिक वाढ मिडकॅप सिलेक्ट (०.२७%), मिडकॅप ५० (०.१८%), मिडकॅप १०० (०.१६%) निर्देशांकात झाली असून सर्वाधिक घसरण मात्र स्मॉलकॅप ५० (०.०५%), स्मॉलकॅप २५० (०.१६%), व स्मॉलकॅप ५० (०.०५%) निर्देशांकात घसरण झाली आहे. सकाळच्या सत्रात निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक वाढ मात्र आयटी (१.१७%), ऑटो (०.१४%), कंज्यूमर ड्युरेबल्स (०.०५%), मिड स्मॉल आयटी टेलिकॉम (०.९६%) निर्देशांकात वाढ झाली आहे.


विशेषतः भारतासह जगभरात आयटी सेल ऑफ झाले असतानाही भारतातील बड्या आयटी कंपनीच्या मजबूत निकालांमुळे आयटी शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. काल युएस व आशियाई बाजारात मोठ्या प्रमाणात सेल ऑफ झाले आहे. प्रामुख्याने एआय व आयटी शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात सेल ऑफ झाले. आर्थिक कमकुवत कामगिरीने सध्या गुंतवणूकदार आपली तंत्रज्ञान शेअर्समध्ये असलेल्या गुंतवणूकीत कपात करत आहेत. जपानचा बेंचमार्क निक्केई २२५ निर्देशांक ०.५% वाढला, तर टॉपिक्स निर्देशांक ०.५५% वाढला. तंत्रज्ञान क्षेत्राने सुरुवातीच्या व्यवहारात निक्केई २२५ निर्देशांक खाली आला. दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक ०.६७% घसरला. दक्षिण कोरियातील निर्देशांकात हेवीवेट असलेले सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स आणि एसके हिनिक्स अनुक्रमे २.२५% आणि २.४६% इतक्या मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. मात्र भारतीय बाजारातील परिस्थिती बदलली आहे.काल सॅमसंग इंडियाच्या तिमाही निकालात मोठी सुधारणा झाली आहे. महसूलात ११% वाढ झाली आहे. भारतातील इतर कंपन्यांपैकी अँपल इंडिया, मायक्रोसॉफ्ट इंडियातील निकाल मजबूत आले असले तरी जगभरातील आयटी कंपनीच्या निकालात घसरण झाली आहे हाच परिणाम आज मोठ्या प्रमाणात शेअर बाजारात जाणवू शकतो. तसेच हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक ०.१९% वाढला होता तर मुख्य भूमी सीएसआय ३०० ०.४% वर चढला. तथापि, चीनी टेक कंपनी शाओमीचे हाँगकाँगमध्ये सूचीबद्ध शेअर्स मात्र, कंपनीने मंगळवारी २०२६ मध्ये स्मार्टफोनच्या किमती वाढण्याचा इशारा दिल्यानंतर एआय मागणीला पूर्ण करण्यासाठी मेमरी चिप्सच्या वाढत्या किमतींमुळे ४% पेक्षा जास्त घसरण झाली होती.


आज भारतीय बाजारातील मिडकॅप व लार्जकॅपमध्ये झालेल्या घसरणीचा परिणाम स्मॉलकॅपमध्ये झालेल्या हालचालींमुळे अधोरेखित होऊ शकतो. सुरूवातीच्या कलात गिफ्ट निफ्टी (०.०४%), हेंगसेंग (०.४१%), कोसपी (०.८३%) बाजारात सर्वाधिक घसरण झाली असून स्ट्रेट टाईम्स (०.१२%), जकार्ता कंपोझिट (०.६५%) निर्देशांकात वाढ झाली आहे. काल युएस बाजारातील सेल ऑफ झाल्याने तिन्ही बाजारात घसरण झाली होती ज्यामध्ये डाऊ जोन्स (०.०३%), एस अँड पी ५०० (०.८३%), नासडाक (१.१७%) निर्देशांकाचा समावेश आहे.


सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ इंटलेक्ट डिझाईन (३.८३%), लेंटट व्ह्यू (३.७५%), इन्ड्यूरन्स टेक (२.८६%), विशाल मेगामार्ट (२.८५%), जे एम फायनांशियल (२.७९%),नेटवेब टेक्नॉलॉजी (२.५६%), इन्फोसिस (१.५५%) निर्देशांकात वाढ झाली असून सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण आयनॉक्स इंडिया (५.८०%),केईसी इंटरनॅशनल (५.३०%), वारी एनर्जीज (४.३४%), एचबीएल इंजिनिअरिंग (४.३३%), गोदरेज अँग्रोवेट (२.४६%), सारेगामा इंडिया (२.१२%), लरूस लॅब्स (२.०३%), सिटी युनियन बँक (१.९०%), गोदावरी पॉवर (१.८१%), जीएमडीसी (१.६७%), चोला फायनांशियल (१.५१%) निर्देशांकात झाली आहे.

Comments
Add Comment

मोठी बातमी: एमएसएमई आणि स्टार्टअप कर्ज वितरणासाठी सिडबी आणि बँक ऑफ बडोदामध्ये सामंजस्य करार

मुंबई: लघुउद्योग, एमएसएमई आणि स्टार्टअप्सना प्रोत्साहन देऊन वित्तपुरवठा करून अर्थसहाय्य करणाऱ्या स्मॉल

Satbara Utara : ऐतिहासिक निर्णय! ६० लाख कुटुंबांना मोठा दिलासा; भूखंड विनाशुल्क नियमित करण्याचे राज्य सरकारचे निर्देश, ३ कोटी नागरिकांना थेट लाभ

मुंबई : राज्यातील नागरिकांसाठी एक ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वाचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. तुकडेबंदी

१४० कोटी भारतीयांसाठी युट्यूबची मोठी घोषणा आता व्यवसायिक शिक्षण युट्यूबवर शक्य

प्रतिनिधी: लहानांपासून थोरांपर्यंत मोठ्या प्रमाणात व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूबचा वापर होतो. टीव्हीपेक्षा

Nashik Malegaon Crime News : सूडापोटी 'सैतानी कृत्य'! ३ वर्षीय चिमुरडीचं लैंगिक शोषण करून डोकं दगडाने ठेचून...गांभीर्याने तपास सुरू

मालेगाव : नाशिक (Nashik News) जिल्ह्यातील मालेगाव तालुका सध्या एका हादरवून टाकणाऱ्या आणि अमानुष घटनेने स्तब्ध झाला आहे.

Ahilyanagar News : बिबट्याच्या भीतीने शाळांच्या वेळेत तातडीने बदल! अहिल्यानगर-पुण्यातील तालुक्यांत पहिली ते चौथीसाठी वेगळी, तर माध्यमिकसाठी वेगळी वेळ जाहीर

अहिल्यानगर : अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यांतील काही तालुक्यांमध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे स्थानिक

फडणवीसांचा मोठा निर्णय! मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच ५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : मागील काही महिन्यांपासून मोठ्या संख्येने राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. गेल्याच