मोहित सोमण: सकाळच्या सत्राची पुनरावृत्ती आज अखेरच्या सत्रात झाली असली तरी शेवटच्या सत्रात किंबहुना आयटी शेअरमधील रिबाऊंड अधिक जबरदस्त पातळीवर झाल्याने आज शेअर बाजारातील इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात वाढ झाली आहे. सेन्सेक्स ५१३.४५ व निफ्टी १४२.६० अंकांने उसळला आहे. त्यामुळे सेन्सेक्स ८५१८६.४७ व निफ्टी २६०५२.६५ पातळीवर स्थिरावला आहे. आज आयटी शेअर्समध्ये (२.९७%) जवळपास ३% वाढ झाल्याने आज बाजारातील रॅली आणखी वाढली असून बँक निर्देशांकातही समाधानकारक वाढ झाल्याने बाजारात आज सपोर्ट लेवल मिळण्यास मदत झाली आहे. मोठ्या दिग्गज शेअर्समध्येही आज बहुतांश प्रमाणात वाढ कायम राहिली असली तरी स्मॉलकॅप मध्ये आज काहीशी घसरण झाल्याने बाजारात किरकोळ नुकसान झाले. बड्या आयटी शेअर्सच्या जबरदस्त तिमाही कामगिरी आधारे शेअर्समध्ये वाढ झाली असून आगामी दर कपातीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष केंद्रित झाल्याने बँक निर्देशांकात वाढ पहायला मिळत आहे.
अखेरच्या सत्रात निफ्टी व्यापक निर्देशांकात सर्वाधिक वाढ मिडकॅप सिलेक्ट (०.६०%), निफ्टी १०० (०.४६%), निफ्टी २०० (०.४१%) निर्देशांकात झाली असून सर्वाधिक घसरण मात्र मायक्रोकॅप २५० (०.१७%),स्मॉलकॅप ५० (०.२९%), स्मॉलकॅप २५० (०.४२%) निर्देशांकात झाली आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात वाढ बँक निर्देशांकासह पीएसयु बँक (१.१६%), आयटी (२.९७%), हेल्थकेअर (०.४८%), कंज्यूमर ड्युरेबल्स (०.४१%), मिड स्मॉल आयटी टेलिकॉम (२.०८%) निर्देशांकात झाली आहे. अखेरच्या सत्रात आशियाई बाजारातील संमिश्रित कल कायम राहिला आहे. गिफ्ट निफ्टी (०.५९%)सह स्ट्रेट टाईम्स (०.०१%), सेट कंपोझिट (०.१७%), जकार्ता कंपोझिट (०.५३%) निर्देशांकात वाढ झाली आहे. तर घसरण तैवान वेटेड (०.६६%), कोसपी (०.६१%), हेंगसेंग (०.३१%) निर्देशांकात झाली आहे. युएस बाजारातील सुरूवातीच्या कलातही एस अँड पी ५० (०.८३%), नासडाक (१.१७%) बाजारात घसरण झाली असून डाऊ जोन्स (०.१९%) निर्देशांकात वाढ झाली आहे.
अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ जेपी पॉवर (१४.९१%), एल अँड टी टेक्नॉलॉजी (८.९७%), लिंडे इंडिया (६.६९%),लेटंट व्ह्यू (५.१८%), इंटलेक्ट डिझाईन (५.०१%), इन्ड्युरन्स टेक्नॉलॉजी (४.६५%) समभागात झाली असून आज सर्वाधिक घसरण सम्मान कॅपिटल (१२.७%),केईसी इंटरनॅशनल (९.१३%), एचबीएल इंजिनिअरिंग (९.०७%),जीएमडीसी (५.१७%), आयनॉक्स इंडिया (४.०७%), गोदावरी पॉवर (३.५१%),वारी एनर्जीज (३.२८%) समभागात झाली.
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना अशिका इन्स्टिट्युशनल इक्विटीजने म्हटले आहे की,'सावध जागतिक संकेतांमुळे कमकुवत सुरुवात झाल्यानंतर बेंचमार्क निफ्टीने स्थिर पुनर्प्राप्ती केल्याने बुधवारी भारतीय शेअर बाजार वधारले. निर्देशांक सुरुवातीला नकारात्मक क्षेत्रात घसरला परंतु २५८५० पातळीच्या समर्थन क्षेत्राजवळ जोरदार खरेदीचा रस दिसून आला. तिथून, तेजीने वेग घेतला, ज्यामुळे निफ्टीला तांत्रिक आणि मानसिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण २६००० पातळीचा टप्पा पुन्हा मिळवण्यास आणि चाचणी करण्यास प्रवृत्त केले. क्षेत्रीय गती आयटी समभागांनी वर्चस्व गाजवले, ज्यामुळे दिवसाची प्रगती व्यापक-आधारित तेजीसह झाली. एलटीआयएम, इन्फोसिस, एचसीएलटेक, टीसीएस आणि पर्सिस्टंट सिस्टम्स सारख्या शेअर्स फोकसमध्ये होते, ज्यामुळे या क्षेत्रासाठी मजबूत वाढ झाली. सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि आरोग्य सेवा निर्देशांकाने देखील बाजाराच्या वरच्या दिशेने वाटचाल करण्यास अर्थपूर्ण योगदान दिले, ज्यामुळे पुनर्प्राप्तीला व्याप्ती मिळाली. निफ्टी २६००० पातळीच्या पातळीभोवती फिरत असताना, बाजारातील सहभागी आगामी जागतिक ट्रिगर्सकडे लक्ष देत आहेत. येत्या सत्रांमध्ये अमेरिकेतील प्रमुख आर्थिक डेटा आणि भारत-अमेरिका व्यापार करारावरील स्पष्टता भावनांना चालना देईल अशी अपेक्षा आहे.'
आजच्या बाजारातील बँक निफ्टीवर विश्लेषण करताना एलकेपी सिक्युरिटीजचे तांत्रिक विश्लेषक वत्सल भुवा म्हणाले आहेत की,' बँक निफ्टीने बुधवारीच्या सत्रात ताशी चार्टवर २०-ईएमएच्या जवळ जोरदार खरेदी केली, ज्यामुळे तेजीची मजबूत पकड आणि अंतर्निहित ताकद दिसून आली. जरी आरएसआय (Relative Strength Index RSI) ७० पातळीच्या वर किंचित जास्त खरेदी झाला असला तरी, निर्देशांक नफा बुकिंग किंवा तात्काळ सुधारणा होण्याची चिन्हे दिसत नाहीत. डेरिव्हेटिव्ह्जच्या आघाडीवर, ५९००० आणि ५८५०० स्ट्राइकवर लक्षणीय पुट रायटिंग मजबूत तेजीची भावना दर्शवते, ५८५०० स्थापित करते. १०-दिवसांच्या ईएमएसह स्थितीत्मक आधार म्हणून आणि ५९००० तात्काळ आधार (Immdiate Support) म्हणून दर्शवतो जोपर्यंत निर्देशांक ५८००० च्या वर टिकतो तोपर्यंत, खरेदी-ऑन-डिप धोरण राखले पाहिजे, तर ५९५०० आणि ६०००० संभाव्य प्रतिकार (Potential Resistance) पातळी राहतील.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांच्या उत्साहवर्धक टिप्पण्यांनंतर भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दलच्या नव्या आशावादावर राष्ट्रीय निर्देशांकांनी जोरदार पुनरुज्जीवन केले. मोठ्या कॅप कंपन्यांनी या वाढीचे नेतृत्व केले, व्यापक बाजारपेठेला मागे टाकले. अमेरिकेतील मऊ कामगार डेटा आणि चलनाच्या टेलविंड्समुळे फेडकडून दर कपातीच्या पुनरुज्जीवित आशेवर आयटी क्षेत्राने गर्दी केली, तर विलीनीकरणाशी संबंधित बातम्या आणि मूलभूत तत्त्वांमध्ये सुधारणा झाल्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी वाढ केली. पुढील धोरणात्मक संकेतांसाठी आता उद्याच्या FOMC मिनिटांकडे लक्ष लागले आहे.'