कडाक्याच्या थंडीत पुणे पालिकेची शेकोटीवर बंदी! प्रदुषण नियंत्रणासाठी घेतला निर्णय




पुणे: राज्यभरात मागील आठवड्यांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. यामुळे शरीराला ऊब मिळावी म्हणून अनेकजण शेकोटी पेटवत आहेत. मात्र थंडीच्या दिवसात पुणे पालिकेने शेकोटी न पेटवण्याचा निर्णय घेतल्याने शहरातील नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. वायू प्रदूषण होत असल्यामुले पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शेकोटी न पेटवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कुणी शेकोटी पेटताना दिसल्यास संबंधित व्यक्तींवर दंडात्मक कारवाई होईल, असा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.




पुणे पालिकेच्या निर्णयाबाबत सविस्तर


"पुणे शहरातील अनेक गृहनिर्माण संस्था, व्यावसायिक संकुले तसेच निवासी परिघांमध्ये रात्रीच्या वेळी सुरक्षा कर्मचारी थंडीपासून बचाव करण्यासाठी उघड्यावर शेकोट्या पेटवताना लाकूड, कचरा किंवा कोळसा जाळतात. यामधून निर्माण होणाऱ्या धूरामुळे पुणे शहरातील हवा प्रदूषण वाढत आहे. हवा प्रदूषणामुळे केवळ वातावरणामध्ये बदल होत नसून याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर देखील होत आहे. शेकोट्या पेटवल्यामुळे धूर, कार्बन मोनोऑक्साइड आणि अन्य हानिकारक वायूंच उत्सर्जन होऊन श्वसनावर परिणाम होतो. ज्यामुळे दमा, अस्थमा आणि इतर श्वसन रोगांचा धोका वाढत आहे."



"केंद्र
आणि राज्य शासनाने हवा प्रदूषणाला नियंत्रित करण्यासाठी विविध कायदे आणि नियम बनवले आहेत. जसे कि 'हवा (प्रदूषण नियंत्रण) अधिनियम, १९८१' अंतर्गत भाग ४ कलम १९ (५), 'घनकचरा व्यवस्थापन नियम, २०१६' कलम १५ (छ) आणि पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय यांचेकडील राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमच्या २०२२ च्या मार्गदर्शक तत्वांनुसार उघड्यावर कोळसा किंवा जैविक पदार्थ (प्लास्टिक / रबर) आणि इतर कचरा जाळण्यास मनाई केली आहे."




"यामुळे पुणे शहरातील सोसायटीच्या परिसरात किंवा रस्त्यावर मनपा कर्मचारी किंवा मनपा ठेकेदाराकडील नियुक्त कंत्राटी कामगारांना शेकोटी पेटवून उघड्यावर कोळसा / प्लास्टिक / रबर आणि इतर कचरा जाळून धूर निर्माण केल्याचे आढळल्यास पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत दंडात्मक कारवाई केली जाईल. या पार्श्वभूमीवर कोणत्याही गृहनिर्माण संकुलातील वॉचमन, फाई कामगार आणि इतर कामगार व्यक्तींनी या नियमांचे उल्लंघन करू नये असा आदेश पालिका आयुक्तांनी दिला आहे.




Comments
Add Comment

पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी

मुंबई: नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भाविकांच्या श्रद्धेचा महासागर उसळणार असून, त्या महासागराला सुरक्षित,

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर जमीन

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री. अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी या गड किल्ल्यांवर जाण्यास बंदी; वन विभागाचा आदेश जारी

पुणे : अनेकजण नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ३१ डिसेंबरच्या रात्री गडकिल्ल्यावर जाणे पसंत करतात. या पार्श्वभूमीवर

मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून सरकारचे खास पाऊल

मुंबई: आपल्या देशाने लोकशाही पध्दती स्विकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक

'एसटी सोबत, स्वस्त सफर'! सुट्ट्यांसाठी एसटी महामंडळाची खास ऑफर, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्टांसाठी तुमच्याकडे परवडणारा प्लॅन नाही म्हणून तुम्ही घरी बसून आहात का? तर ही

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास