लोकल ट्रेन मधील धक्कादायक अनुभवाबद्दल काय म्हणाली अभिनेत्री गिरीजा ओक?

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावान अभिनेत्री गिरीजा ओक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘तारे जमीन पर’, ‘शोर इन द सिटी’ आणि ‘जवान’सारख्या चित्रपटांतून तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला आहे. मात्र आता तिचा सोशल मीडियावर व्हायरल होणारा लूक, तिचा साधेपणा आणि नैसर्गिक सौंदर्य यामुळे चाहत्यांनी तिला ‘नॅशनल क्रश’ म्हणायला सुरुवात केली आहे.


गिरीजा ओकने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या आयुष्यातील काही धक्कादायक अनुभव उघड केले. ती म्हणाली, "लोकल ट्रेनमध्ये प्रवास करताना लोक तुम्हाला जाणूनबुजून धक्का देऊन, स्पर्श करुन निघून जातात... कधीकधी तर जाणूनबुझून तुमच्यावर येऊन आदळतात. हे फार विचित्र आणि धक्कादायक असलं तरीसुद्धा आता हे अगदी नॉर्मल झालंय... मलाही एका मुलाने अचानक मागून स्पर्श केला आणि नंतर तो लगेच गायब झाला. त्या क्षणी मला काहीच कळले नाही."


गिरीजा पुढे म्हणाली की, "त्यानं त्याचं बोट माझ्या पाठीवर फिरवलं, मग माझ्या मानेपासून, माझ्या पाठीपर्यंत आणि मग गर्रकन फिरला... जोपर्यंत मला कळेल की, नेमकं काय झालंय, तोपर्यंत तो मुलगा गायब झालेला... मी त्याला ओळखूच शकले नाही... ना मला त्याच्याबाबत काही माहीत होतं..."


तिच्या लहानपणीच्या शाळेतील अनुभवांबाबत गिरीजा म्हणाली, "शाळेत एक मुलगा मला सतत त्रास देत असे. त्यावेळी मी त्याला प्रतिकार करत थोबाडीत मारले. हाच अनुभव मला स्वतःसाठी उभे राहण्याचे धैर्य शिकवणारा ठरला."


गिरीजा ओकने तिच्या कुटुंबातील महिलांचा, विशेषतः तिच्या आईचा, धैर्य आणि आत्मविश्वासावर होणारा प्रभावही सांगितला. ती म्हणाली, "माझी आई आणि आजी नेहमीच छळाला प्रतिकार करत असत. त्या शांतपणे नाही, तर ठामपणे, निश्चयाने स्वतःसाठी उभे राहायच्या. मी लहान असताना त्यांना धैर्याने वागताना पाहिले आणि त्यातून मलाही प्रत्येक परिस्थितीत स्वतःसाठी उभे राहण्याची शिकवण मिळाली."


व्यावसायिक क्षेत्रात गिरीजा ओकने फार लहान वयातच ‘गोष्ट छोटी डोंगरावधी’, ‘गुलमोहर’, ‘मानिनी’ आणि ‘अडगुले मडगुले’सारख्या मराठी चित्रपटांतून पदार्पण केले. आजही तिचा अभिनय प्रेक्षकांना भावतो आणि तिच्या व्यक्तिमत्त्वाचे सौंदर्य, साधेपणा आणि धैर्य चाहत्यांना प्रेरणा देते.


गिरीजा फक्त तिच्या सौंदर्यासाठीच नव्हे, तर तिच्या जीवनातील धैर्य, संघर्ष आणि आत्मविश्वासामुळेही चाहत्यांच्या हृदयात घर करत आहे, आणि स्त्रियांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.

Comments
Add Comment

म्युझिकल नाईटमध्ये ‘वध 2’ स्टार्सची झगमगती एन्ट्री

संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांनी वाढवली म्युझिकल इव्हेंटची शोभा ‘वध 2’, ज्यात नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांची

'धुरंधर'ची बॉक्स ऑफिसवर चलती! दोन दिवसांत ५० कोटींचा टप्पा पार

आदित्य धर यांचा वादग्रस्त धुरंधर अखेर ५ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या

हिंदी 'बिग बॉस सीझन १९' चा अंतिम सोहळा! कोण कोरणार ट्रॉफिवर नाव?

तीन महिन्यांहून अधिक काळ नाट्यमय संघर्ष, युती आणि भावनिक चढ-उतारांनंतर, 'बिग बॉस १९' चा महाअंतिम सोहळा आज पार पडणार

प्रियाकां चोप्राच्या बहिणीने स्वीकारला इस्लाम धर्म ?

मुंबई : हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये चमकलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्या दोन बहि‍णीही मनोरंजनविश्वात चमकत

तेजश्री प्रधानला राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार

मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या तिची मालिका 'वीण दोघांतली ही तुटेना'मुळे चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेत ती

शिल्पा शिरोडकरचा ‘बिग बॉस १९’ फेम मराठमोळ्या प्रणीत मोरेला पाठिंबा

‘बिग बॉस’ हिंदीची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. हा कार्यक्रम शेवटच्या टप्प्याकडे आला आहे. ‘बिग बॉस’मधून अलीकडेच