मांडवा जेट्टी ते अलिबाग मार्गावर वाहतूक बंदी

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडून अधिसूचना जारी


अलिबाग (प्रतिनिधी) : मांडवा जेट्टी ते अलिबाग मार्गावरील अपघात कमी होण्यासाठी तसेच स्थानिक नागरिक,विद्यार्थी व पर्यटक यांचा प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टीकोनातून तसेच अपघाताचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून मांडवा जेट्टी ते अलिबाग या मार्गावर दररोज सकाळी ८ ते दु. १२ वा.पर्यंत तसेच सायं.४ ते रात्री ८वा.पर्यंत या अधिसूचनेच्या दिनांकापासून ते पुढील आदेश होईपर्यंत जड अवजड वाहनांकरिता (दुध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस, औषधे, ऑक्सीजन, भाजीपाला, पाणी इत्यादी जिवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना वगळून) जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी वाहतूकबंदी अधिसूचना जारी केली आहे.
रायगड जिल्हा हा पर्यटक जिल्हा असल्याने अलिबाग, मांडवा, किहिम, आक्षी, नागाव येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक आपापली वाहने घेऊन येत असतात. पर्यटकांची वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. मांडवा जेट्टी ते अलिबाग हा रस्ता अरुंद असून, या मार्गावर मोठ्या प्रमाणात डंपर व ट्रक मातीची/खडीची वाहतूक करणारी वाहने व सिमेंट कॉन्क्रीटीकरणाकरीता सिमेंट मिक्सर, इतर सामनांची वाहतूक करणारे अवजड वाहने जात येत असतात. त्यातच मांडवा जेट्टी येथे जलप्रवासी वाहतूक बोटी तसेच रो-रो सेवा सुरु असल्याने त्यामधून देखील मुंबई येथून पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वाहने येतात. त्यामुळे मांडवा जेट्टी हा रस्ता अरुंद असल्यामूळे वाहतूक कोंडी होऊन या मार्गावर नेहमी किरकोळ, गंभीर व प्राणांतिक अपघात होत असून, या अपघातांमध्ये वाढ होत आहे. तसेच दर शनिवार व रविवार या दिवशी मुंबई येथून पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, विद्यार्थी तसेच पर्यटकांना प्रवासाकरीता जास्तीचा वेळ लागतो. तसेच आजारी रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका या वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडल्याने रुग्णाच्या जिवितास धोका संभवू शकतो. ही वाहतूक बंदी अधिसूचना ही दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस, औषधे, ऑक्सीजन, भाजीपाला, पाणी इत्यादी जिवनावश्यक वस्तू वाहन नेणारी वाहने, पोलीस वाहने, फायर ब्रिगेड वाहने रुग्णवाहीका यांना लागू राहणार नाही.

Comments
Add Comment

राज्यातील २२ मनपात राज ठाकरेंच्या मनसेला भोपळा

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुकांचे निकाल लागले. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार,

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई (प्रतिनिधी) : ज्या काँग्रेसपायी उबाठा गटाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत

भाजपच्या विजयानंतर ‘रसमलाई’चा ट्रेंड

मुंबई : महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुक निकालात भाजपने सर्वाधिक जागा जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

माजी महापौर आणि माजी उपमहापौरांनी गड राखले

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी चार महापौर आणि तीन उपमहापौर निवडणूक रिंगणात

महापौरसाठी पाच उमेदवारांच्या नावाची चर्चा

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या निकालांनी मुंबईचे राजकीय चित्र पूर्णपणे बदलून टाकले आहे. भारतीय जनता पक्षाने या

राज्यभरात एमआयएमने जिंकल्या तब्बल १२५ जागा

मुंबई (प्रतिनिधी) : "मुंबईत हिंदूंचा जन्मदर १.३ टक्के तर मुस्लिमांचा जन्मदर २.६ टक्के म्हणजे दुप्पट आहे. त्यामुळे