Tuesday, November 18, 2025

स्वर्गीय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या दिवशीच सर्वसामान्यांना दिलासा मिळणार! २५ तारखेला नवी मुंबई विमानतळ सुरू होणार 'ही' आहे माहिती

स्वर्गीय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या दिवशीच सर्वसामान्यांना दिलासा मिळणार! २५ तारखेला नवी मुंबई विमानतळ सुरू होणार 'ही' आहे माहिती

नवी मुंबई: स्वर्गीय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या दिवशी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) कार्यरत होणार आहे. विशेषतः भारतातील प्रथम नवीन ग्रीनफील्ड विमानतळ या कारणामुळे प्रसिद्धीस आलेले विमानतळ नाताळचा दिवस सोडून २५ डिसेंबर पासून व्यावसायिक कामकाज सुरू करणार आहे आणि माहितीनुसार दररोज विमानतळावर २३ वेळा विमाने उड्डाणे करतील अशी घोषणा मंगळवारी करण्यात आली. कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीत स्पष्ट केले आहे. माहितीनुसार, पहिल्या महिन्यात, नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट (NMIA) सकाळी ८ ते रात्री ८ दरम्यान या १२ तासांसाठी दररोज २३ वेळा उड्डाणे होतील असे प्रसिद्धीपत्रकात कंपनीने स्पष्ट केले. या कालावधीत, विमानतळ प्रति तास १० वेळा उड्डाणे करेल.माहितीनुसार, विमानतळावरील पहिली उडणारे फ्लाइट बेंगळुरूहून इंडिगो ६E४६० असणार आहे. ते सकाळी ८:०० वाजता विमानतळावर उतरणार आहे. त्यानंतर इंडिगो 6E882 सकाळी ८.४० वाजता हैदराबादसाठी रवाना होणार आहे ज्यात जे नवीन विमानतळावरून पहिली आउटबाउंड सेवा सुरू होईल. प्रसिद्धीपत्रकात म्हटल्याप्रमाणे, सुरुवातीच्या लाँच कालावधीत प्रवाशांना इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस आणि अकासा एअर द्वारे चालवल्या जाणाऱ्या सेवांचा फायदा होईल जे मुंबईला १६ प्रमुख देशांतर्गत स्थळांशी जोडतील,असे निवेदनात विमानतळाने म्हटले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, फेब्रुवारी २२०५ पासून, विमानतळ २४ तास सुरू करण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेशाच्या (Mumbai Metropolitical Region MMR) च्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी ३४ विमाने भविष्यात सुरु होऊ शकतात. सुरक्षा एजन्सी आणि एअरलाइन भागीदारांसह सर्व भागधारकांच्या सहकार्याने व्यापक ऑपरेशनल रेडीनेस आणि एअरपोर्ट ट्रान्सफर (ORAT) चाचण्या सध्या विमानतळ प्रशासन घेत आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ ऑक्टोबर रोजी एनएमआयएचे उद्घाटन केले होते. या नव्या विमानतळामुळे मुंबई महानगर प्रदेशाच्या (एमएमआर) वाढत्या विमान वाहतूक गरजांना पूर्ण करण्यासाठी या विमानाचा निश्चितच फायदा होणार आहे. त्यामुळे मुंबईतील असलेल्या दोन विमानतळावरील तणाव कमी होऊन नवी मुंबई व आसपास उपनगरात राहत असलेल्या प्रवाशांचीही गैरसोय होणार नाही.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रायव्हेट लिमिटेड (एनएमआयएएल) हे ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या विकास बांधकाम, ऑपरेशन आणि देखभालीसाठी स्थापन केलेली एक विशेष कंपनी आहे.एनएमआयएएल ही अदानी एअरपोर्ट्स होल्डिंग्ज लिमिटेड (AAHL) ची उपकंपनी असलेल्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (MIAL) मधील सार्वजनिक खाजगी भागीदारी (Public Private Partnership PPP) असून माहितीनुसार ७४ टक्के हिस्सा हा योजनेचा असणार आहे तर शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र लिमिटेडचे (सिडको) उर्वरित २६ टक्के हिस्सा अथवा भागभांडवल (Stake) आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >