ठाणे रुग्णालयाच्या पाडकामात आढळली शेकडो वर्षे दडलेली शिल्पकला

कोरीव प्रतिमा असलेल्या प्राचीन शिल्पांनी सर्वसामान्यांत उत्सुकता


ठाणे : इतिहासाच्या पाऊलखुणा आजही जुन्या ठाण्याचे अस्तित्व दाखवून देत आहेत. शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वेगाने झेपावत असताना, अनेक वारशाच्या खुणा काळाच्या पडद्याआड जात आहेत. शहरीकरणाच्या ओघातच प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या पाडकामात पगडी घातलेल्या संताची कोरीव प्रतिमा असलेले प्राचीन दगड सापडल्याने ठाणेकरांमधली उत्सुकता प्रचंड वाढली आहे. पाडकामात प्राचीन संत, शिष्य व नर्तिका यांचे कोरीव दगड आढळले आहेत. नवीन आधुनिक मनोरुग्णालय उभारण्याच्या कामात अनेक जुन्या इमारती हटविण्यात येत आहेत. याच प्रक्रियेत अनेक वर्षे बंद अवस्थेत असलेल्या एका बंगल्याचे पाडकाम सुरू होते. त्या पाडकामादरम्यान हा सुंदर कोरीव कलेचा नमुना प्रकाशात आला आणि कामगारांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या.


सुमारे अडीज ते ३ फूट उंच आणि सव्वा ते दीड फूट रुंद असलेल्या या दगडावर अत्यंत सूक्ष्मतेने केलेली शिल्पकला दिसून येते. डोक्यावर पगडी घातलेले संत, त्यांच्या शेजारी उभा असलेला शिष्य आणि बाजूला उभी असलेली नर्तिका अशा तिन्ही प्रतिमा अतिशय प्राचीन कलाशैलीत साकारलेल्या आहेत. प्राथमिक अंदाजानुसार हा दगड भरपूर जुना असण्याची शक्यता आहे. या परिसराच्या इतिहासाशी संबंधित कोणतीही नोंद रुग्णालय प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याने, या दगडाचा नेमका उगम, काळ आणि सांस्कृतिक संदर्भ जाणून घेण्यासाठी अभ्यास करण्याची मागणी जोर धरत आहे. ठाणेकरांच्या मते, अशा मौल्यवान कलावस्तू आजच्या विकासाच्या काळात सापडणे ही दुर्मीळ संधी असून, या ठेव्याचे तात्काळ जतन करणे अत्यावश्यक आहे. रुग्णालय परिसरात यापूर्वीही ब्रिटिशकालीन मुखवट्यांचे दगड बांधकाम पडताना दिसून आले. या जागेत अजूनही अनेक ऐतिहासिक अवशेष दडलेले असण्याची शक्यता अधिक बळावली आहे. शहराचा विकास आणि इतिहासाचा वारसा या दोन गोष्टींची सांगड घालून जुन्या वस्तुंचे जतन करावे अशी मागणी जोर धरते आहे.

Comments
Add Comment

श्रीलंका टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर

मुंबई : वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघ अखेरीस मोठ्या विश्रांतीनंतर मैदानावर उतरणार आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक

महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही

भारताचे द. आफ्रिकेसमोर १७६धावांचे लक्ष्य, हार्दिक पांड्याचे धमाकेदार अर्धशतक

कटक (वृत्तसंस्था) : कटकच्या मैदानात सध्या हार्दिक पांड्याच्या बॅटने आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली.

विठुनामाच्या जयघोषाने मुंबापुरी दुमदुमणार

मुंबई : वारकरी संप्रदायाच्या वैचारिक ऐश्वर्याचे दर्शन मुंबईकरांना घडावे यासाठी गेली २६ वर्ष सुरू असणारा

थ्री इडियट्सचा सिक्वेल २०२६ मध्ये येणार, सिनेप्रेमींची वाढली उत्सुकता

मुंबई : तब्बल १५ वर्षांनंतर बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि आयकॉनिक चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘थ्री

IPL 2026 Auction: टॉप 5 गटात 34 खेळाडूंवर लागणार बोली

IPL 2026 मिनी लिलावासाठी एकूण 350 खेळाडूंची नावं निश्चित करण्यात आलेली आहे . टॉप खेळाडूंसाठी पाच गट करण्यात आले आहेत.