गुवाहाटी कसोटीपूर्वी भारतावर दबाव; दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या तपासणीने वाढली चर्चा

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला पहिला सामना भारताने गमावला. दक्षिण आफ्रिकेने मालिकेत १ - ० अशी आघाडी घेतली आहे. यामुळे गुवाहाटी येथील कसोटी सामना भारतासाठी ‘करो किंवा मरो’ अशा स्वरुपाचा आहे. या पार्श्वभूमीवर कोलकातातील एक वेगळीच घटना चर्चेचा विषय ठरली आहे.



दक्षिण आफ्रिकन खेळाडूंची रात्री वैद्यकीय तपासणी


पहिला कसोटी सामना संपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघातील काही प्रमुख खेळाडूंनी रात्री उशीरा कोलकातातील वुड्सलँड्स रुग्णालयात तपासणीसाठी हजेरी लावल्याची माहिती समोर आली आहे. अचानक झालेल्या या आरोग्य तपासणीमुळे क्रिकेटविश्वात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे, याच रुग्णालयात भारतीय फलंदाज शुभमन गिलदेखील दाखल होता आणि काल सकाळी त्याला डिस्चार्ज देण्यात आला.



नियमित तपासणी की इतर कारण ?


भारतीय हवामानात मॅच खेळल्यानंतर किंवा सततच्या प्रवासानंतर खेळाडूंची नियमित वैद्यकीय तपासणी केली जाते. त्यामुळे हे फक्त रुटीन चेकअप असण्याची शक्यता आहे. मात्र, आफ्रिकन खेळाडू रुग्णालयात का आले होते याचे अधिकृत कारण अद्याप समजलेले नाही. वैद्यकीय तपासणीनंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ गुवाहाटीला रवाना होणार असल्याचे कळते.


भारतीय संघ सध्या कोलकात्यातच सरावात व्यस्त आहे. पुढील सामन्यासाठी पर्यायी संघरचना तपासली जात आहे. शुभमन गिल अद्याप पूर्ण तंदुरुस्त नसल्याने साई सुदर्शन आणि देवदत्त पडीक्कल या दोघांकडे प्रशिक्षक गौतम गंभीर विशेष लक्ष देताना दिसत आहेत. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत भारत पुन्हा एकदा डावखुऱ्या फलंदाजांच्या संख्येवर भर देणार का, याबाबत उत्सुकता आहे.

Comments
Add Comment

आयपीएलचा संपूर्ण लिलाव कधी, कुठे आणि केव्हा? जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : आयपीएलचा लिलाव आता फक्त काही तासांवर येऊन ठेपला आहे. या लिलावासाठी आयपीएलच्या चाहत्यांमध्ये

बुमराह परतणार पण अक्षर पटेल नाही खेळणार, टीम इंडिया चिंतेत

धरमशाला : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली. धरमशाला

फक्त ९५ चेंडूत १७१ धावा करणारा वैभव आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकणार नाही

मुंबई : भारताच्या वैभव सूर्यवंशीने १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत यूएई विरुद्ध ९५ चेंडूत १७१ धावा केल्या. ही

धरमशाला टी ट्वेंटी सामन्यात भारताचा विजय, मालिकेत घेतली आघाडी

धरमशाला : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली. धरमशाला

फुटबॉलच्या २०३४च्या विश्वचषकासाठी 'प्रोजेक्ट महादेवा' मधून गुणवान खेळाडू मिळतील : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जागतिक फुटबॉलपट्टू लिओनेल मेस्सी यांच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवा'चा

भारत जिंकला, टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर पाकिस्तानने टेकले गुडघे!

दुबई : १९ वर्षांखालील आशिया कप २०२५ स्पर्धेत भारतीय युवा संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आपला दबदबा