डिंकाचे प्रोटीन लाडू

सुग्रास सुगरण : गायत्री डोंगरे


साहित्य :


डिंक (गोंद) - अर्धा कप , खारीक पावडर - अर्धा कप,  बदाम - पाव कप,  काजू - पाव कप, अक्रोड - पाव कप, भोपळ्याच्या बिया - २ टेबलस्पून,  तीळ (पांढरे) - २ टेबलस्पून. खोबऱ्याचा किस - २ टेबलस्पून, वेलची पावडर - अर्धा टीस्पून, साजूक तूप - ३-४ टेबलस्पून यात कोणतीही साखर किंवा गूळ नाही. गोडी पूर्णपणे खारीक (ड्राय डेट पावडर) मधून येते.


कृती :


डिंक भाजून घ्या. कढईत १ टीस्पून तूप गरम करा. डिंक घालून तो फुलून पॉपकॉर्नसारखा फुगेपर्यंत भाजा. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये जाडसर पूड करा.बदाम, काजू, अक्रोड, भोपळ्याच्या बिया, तीळ, खोबरे कमी आचेवर वेगवेगळे भाजून घ्या. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये खूप बारीक न करता हलका जाडसर क्रश करा. सर्व साहित्य एकत्र करा. एका मोठ्या भांड्यात डिंक पावडर, खारीक पावडर, ड्रायफ्रूट क्रश, वेलची पावडर एकत्र मिसळा. कढईत साजूक तूप कोमट गरम करून थोडं-थोडं मिश्रणात घालून लाडू वळा. लाडू व्यवस्थित चिकटण्यासाठी साधारण ३-४ टेबलस्पून तूप पुरसे. लाडू १०-१५ मिनिटं ठेवले की घट्ट होतात आणि छान स्वाद येतो.


टिप्स (खास!)


खारीक पावडर गोडी देणारी असल्याने साखर + गूळ लागणार नाही.
मुलांसाठी ड्रायफ्रूट्स थोडे बारीक वाटून वापरा.
जास्त प्रोटीन हवं असल्यास २ टेबलस्पून भुईमूग पावडर किंवा प्रोटीन पावडर मिसळू शकता.

Comments
Add Comment

Majhi Kanya Bhagyashree Yojana : ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेचे फायदे ऐकूनही तुम्ही चकीत व्हाल

Majhi Kanya Bhagyashree Yojana : राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या जन्मदरात वाढ करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून

Ramai Awas Yojana : घर बांधायला पैसे नाहीत ? मग काळजी कशाला ? 'रमाई आवास' घरकुल योजना आहे ना !

Ramai Awas Yojana : राज्य सरकारने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ‘रमाई आवास (घरकुल) गृहनिर्माण योजना’ सुरू केली

Luck : चंगळता !

आमचे एक स्नेही आहेत. अगदी खेड्यात बालपण गेलेले असताना स्वकर्तृत्वाने शिक्षण घेतले, शिष्यवृत्त्यांवर शिकून

Lazy Pallu : उन्हाळ्यात वाढली ‘लेझी पल्लू’ची क्रेझ

एकेकाळी साडीचा पदर अगदी चापून-चोपून, नीट प्लेट्स घालून पिनअप करणं हीच एलिगंट फॅशन मानली जायची. पण बदलत्या

Kajuli biswas : संघर्ष आणि नि:स्वार्थ सेवेची कहाणी : काजुली विश्वास

पश्चिम बंगालच्या काजुली विश्वास यांनी गरिबी, उपासमार, बेघरपणा आणि आपल्याच लोकांची उपेक्षा सहन केली, पण या

Abhilasha Barak : मेजर अभिलाषा बराक यांना 'मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर' पुरस्कार

भारतीय लष्करातील धडाडीच्या महिला अधिकारी मेजर अभिलाषा बराक यांनी आपल्या कर्तृत्वाने जागतिक पातळीवर देशाचे नाव