मुंबई: दुनियेच्या आड दडलेलं एक गूढ लवकरच उलगडणार, अशी भावना ‘आफ्टर ओ.एल.सी’ या चित्रपटाचा ट्रेलर पाहून वाटू लागले आहे. बरेच दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘आफ्टर ओ.एल.सी’ चित्रपटाचा ट्रेलर समोर आला आहे. मैत्री, विश्वासघात, आणि लपलेल्या रहस्यांच्या गुंत्यातून बाहेर पडताना हा चित्रपट कोणतं रहस्य मागे सोडणार याची उत्कंठा ट्रेलरवरून स्पष्ट होते. हा चित्रपट कन्नड आणि मराठी या दोन्ही सिनेसृष्टीला जोडणारा धागा आहे. कारण यातील निर्माते आणि काही कलाकार हे कन्नड आणि मराठी या दोन्ही सिनेसृष्टीतील दिग्गज आहेत.
दिग्दर्शक सडागारा राघवेंद्र दिग्दर्शित ‘आफ्टर ओ.एल.सी’ हा चित्रपट २८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता कवीश शेट्टी, मेघा शेट्टी, शिवानी सुर्वे, विराट मडके, प्रसाद खांडेकर, अश्विनी चवरे, शलाका पवार, रुक्मिणी सुतार या कलाकारांची फौज पाहायला मिळते. या चित्रपटाची कथा नक्षलवादी पार्श्वभूमीवर आधारित आहे. ट्रेलरमधील दृश्य पाहता चित्रपटातील लोकेशन्स नक्षलवादी भागांत शूट झाल्याचे समजते. ट्रेलरमधील लक्षणीय बाब म्हणजे संगीत. ‘आफ्टर ओ.एल.सी’मध्ये मराठी गीतकार क्षितिज पटवर्धन आणि मंदार चोळकर यांनी गीतकार म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. तर गायक अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, रोहित राऊत, आनंदी जोशी, आर्या आंबेकर, अभय जोधपुरकर यांनी पार्श्वगायनाची धुरा सांभाळली आहे.
अमेरिका: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या गाझा शांतता योजनेला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून मंजुरी मिळाली आहे. अमेरिकेने तयार ...
कन्नड सिनेसृष्टीतील दिग्दर्शक सडागारा राघवेंद्र यांनी हा चित्रपट मराठी आणि कन्नड भाषेत दिग्दर्शित केला आहे. तर या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा दिपक राणे, विजयकुमार शेट्टी हवाराल, रमेश कोठारी आणि विजया प्रकाश यांनी सांभाळली असून ‘दिपक राणे फिल्म्स’ आणि ‘इंडियन फिल्म फॅक्टरी’ अंतर्गत निर्मिती केली आहे. येत्या २८ नोव्हेंबरला ‘आफ्टर ओ.एल.सी’ हा सिनेमा जगभरात मराठी, हिंदी आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.