कामगार प्रतिनिधित्वात ५५.४% वाढ, महिला कामगारांच्या प्रतिनिधित्वातही मोठी वाढ

बेरोजगारीत कुठलाही बदल नाही - सरकारी सर्वेक्षण


मोहित सोमण: नुकत्याच नव्या जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर महिन्यात लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट (LFPR) चार महिन्यात वाढतच राहिला असून ऑक्टोबर महिन्यात ५५.४% पातळीवर पोहोचला आहे. सप्टेंबर महिन्यात हा दर ५४.२% होता तत्पूर्वी ऑगस्ट महिन्यात हा दर ५५.०% व जुलै महिन्यात ५४.९% व जून महिन्यात ५४.२% होता. वय वर्षे १५ किंवा त्याहून अधिक वयाचे कामगारांच्या प्रतिनिधित्व असलेल्या मनुष्यबळाचा सर्वेक्षण वेळोवेळी करण्यात येते. सांख्यिकी व अंमलबजावणी मंत्रालय व नॅशनल स्टॅटिस्टिक ऑफिस यांच्या संयुक्त विद्यमाने हा पीएलएफएस (Periodic Labour Force Survey PLFS) करण्यात येतो. तर महिला कामगारांच्या बाबत प्रतिनिधित्व पाहिल्यास अहवालातील माहितीनुसार, मे महिन्यानंतर प्रथमच ऑक्टोबर महिन्यात प्रतिनिधित्व (Participation) ३४.२% पातळीवर वाढले आहे.


अहवालातील माहितीनुसार, एकूणच वर्कर पॉप्युलेशन रेशो (WPR) हा जून महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत वाढतच आहे. ऑक्टोबर महिन्यात हा आकडा ५२.५% पोहोचला आहे.बेरोजगारीची आकडेवारीही अहवालाने जाहीर केली. या आकडेवारीत म्हटले आहे की ऑक्टोबर महिन्यात बेरोजगारी दरात कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही. त्यामुळे हा दर ऑक्टोबर महिन्यात ५.२% पातळीवर कायम राहिला आहे. तर महिला कामगारांच्या बाबत हा बेरोजगारी दर सप्टेंबर महिन्यातील ५.५% तुलनेत ऑक्टोबर महिन्यात ५.४% पातळीवर घसरण झाली आहे.


ऑक्टोबरमध्ये एकूण पॉप्युलेशन रेशो (WPR) लोकसंख्येमध्ये नोकरदार व्यक्तींचा वाटा हा ५२.४% वरून ५२.५% पर्यंत वाढला आहे. प्रामुख्याने मुख्यतः ग्रामीण भागात महिला कामगारांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे झाला असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले.

Comments
Add Comment

इंग्लंडचा इटलीवर २४ धावांनी विजय

नवी दिल्ली  : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या सुपर ८ मध्येप्रवेश करणारा इंग्लंड हा चौथा संघ ठरला आहे. क गटातून

 Gold And Silver Rate : सोने..... लाखांवर, चांदी....लाखांच्या उंबरठ्यावर; गुंतवणूकदारांचे लक्ष जागतिक घडामोडींवर

मुंबई : जागतिक बाजारातील हालचाली आणि अमेरिकेतील आर्थिक परिस्थितीचा प्रभाव देशांतर्गत सराफा बाजारावर स्पष्टपणे

२०२६ मध्ये पदवीधरांसाठी मोठी संधी; रिझर्व्ह बँकेत ६५० सहाय्यक पदांची भरती जाहीर

बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू मुंबई : बँकिंग

पुणे–कोल्हापूर प्रवासाला वेग; राष्ट्रीय महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात

पुणे : पुणे आणि कोल्हापूर दरम्यानचा रस्तेप्रवास लवकरच अधिक जलद आणि सुलभ होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अफगाणिस्तानने संयुक्त अरब अमीरातला दाखविले आसमान

ओमरझाईचे चार बळी, इब्राहिम झद्रानच्या अर्धशतकी खेळीने मिळाला विजय नवी दिल्ली : मुख्य गोलंदाज अझमतुल्ला

टी-२० मध्ये रशीद खानचा ७०० बळींचा वर्ल्ड रेकॉर्ड!

ऐतिहासिक पराक्रम करणारा जगातील पहिला गोलंदाज मुंबई  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये सोमवारी पहिला सामना अफगाणिस्तान