मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेरच्या सत्रात समाधानकारक झाली आहे. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स ३८८.१७ अंकांने वधारत ८४९५०.९५ पातळीवर व निफ्टी १०३.४० अंकाने वाढत २६०१३.४५ पातळीवर स्थिरावला आहे. आठवड्यातील सुरूवातीला रॅली झाल्याने गुंतवणूकदारांच्या आत्मविश्वासात वाढ झाली आहे. विशेषतः आज बँक निर्देशांक आज दिवसभरात वरचढ ठरला असून या व्यतिरिक्त झालेल्या रॅलीत मिड व स्मॉल कॅप शेअरने मोठी वाढ नोंदवली आहे. बाजाराच्या विश्लेषकांनी बाजारातील सकारात्मकता अधोरेखित केल्याने व युएस बाजारातील कमकुवत आकडेवारीचा फायदा परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारकडून वाढलेल्या गुंतवणूकीत परावर्तित झाल्याने भारतीय शेअर बाजारात झाला.
दुसरीकडे आगामी युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीवरील अनिश्चितता असल्याने भारतीय बाजारातही रेपो दरात कपात होण्याचे संकेत डिसेंबर महिन्यात मिळत असल्याने बँक निर्देशांकात वाढ होताना दिसते. दुसरीकडे आजच्या बहुतांश तिमाही निकालात कंपन्यानी केलेल्या चांगल्या कामगिरीचा फायदा आज गुंतवणूकदारांना झाला आहे. विशेषत भारत व युएसमधील संभाव्य व्यापार करारावर भाकीत सुरु असल्याचा फायदाही आज बाजारात झाला. आगामी दिवसात ५०% असलेल्या टॅरिफमध्ये कपात होईल या आशेने या आठवड्यातील तेजीचे संकेत राहण्याची शक्यता असली तरी अंतिमतः परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची या आठवड्यातील गुंतवणूक महत्वाची भूमिका पार पाडेल.
निफ्टी व्यापक निर्देशांकात आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ मिडकॅप ५० (०.८४%), मिडकॅप १०० (०.७३%), मिड कॅप १५० (०.६८%), मिडकॅप १०० (०.७३%) निर्देशांकात झाली असून निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक वाढ ऑटो (०.८५%), पीएसयु बँक (१.०९%), ऑटो (०.८५%), कंज्यूमर ड्युरेबल्स (०.८३%) निर्देशांकात झाली आहे. आज दिवसभरात प्रामुख्याने मधल्या सत्रात बाजार थंड झाले असले तरी अखेरच्या सत्रात पुन्हा बाजाराने रिबाऊंड केल्याने बाजार हिरव्या रंगात बंद झाला आहे. आशियाई बाजारातील चीन व जपान यांचे व्यापार, पर्यटन या मुद्यावर द्वंद्व सुरू झाल्याने सकाळच्या सत्रात आशियाई बाजारात संमिश्र परिस्थिती होती आज अखेरच्या सत्रातही ती कायम राहिली. सर्वाधिक गिफ्ट निफ्टी (०.३४%), कोसपी (१.९०%), सेट कंपोझिट (०.८४%), जकार्ता कंपोझिट (०.५५%) निर्देशांकात झाली असून सर्वाधिक घसरण शांघाई कंपोझिट (०.४६%), निकेयी २२५ (०.२३%), हेगंसेंग (०.८३%) निर्देशांकात झाली आहे. युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात डाऊ जोन्स (०.१२%), नासडाक (०.०६%) निर्देशांकात वाढ झाली असून घसरण मात्र एस अँड पी ५०० (०.०५%) निर्देशांकात झाली आहे.
आज दिवसभरात सर्वाधिक वाढ नारायणा (१४.५३%),एमआरपीएल (६.०८%), महाराष्ट्र स्कूटर (६.३७%), ज्युब्लिअंट इनग्रेव्ह (५.१६%), हुडको (५.१२%), अलेंबिक फार्मा (४.९६%), इंडिया सिमेंट (४.९१%), सिमेन्स (४.८१%), टीआरआयएल (४.७६%), पीबी फिनटेक (४.४३%), सम्मान कॅपिटल (४.२३%) निर्देशांकात झाली आहे.
आज दिवसभरात सर्वाधिक घसरण टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल (४.७३%), सॅजिलिटी (४.५०%), बजाज होल्डिंग्स (३.५५%), वालोर इस्टेट (३.४९%), एमफसीस (३.०१%), सुप्रीम इंडस्ट्रीज (२.२७%), अदानी एंटरप्राईजेस (२.१८%), उषा मार्टिन (२.१०%), लेटंट व्ह्यू (२.००%), विजया डायग्नोस्टिक्स (१.९८%) निर्देशांकात झाली आहे.
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'बाजाराने आपला सकारात्मक वेग कायम ठेवला आहे, तो २६००० पातळीच्या प्रमुख मानसिक पातळीजवळ आहे, कारण गुंतवणूकदारांना पुढील वाढीच्या हालचालीसाठी एक मजबूत उत्प्रेरक (Catalyst) अपेक्षित आहे. संभाव्य व्यापार करार हा एक महत्त्वाचा ट्रिगर आहे ज्यावर सहभागी बारकाईने लक्ष ठेवून आहेत. सध्या रिस्क टू रिवार्ड गुणोत्तर मोठ्या प्रमाणात अनुकूल आहे, मिडकॅप्सकडून अपेक्षेपेक्षा जास्त Q2 कमाईमुळे ते बळकट झाले आहे, ज्यामुळे वाढीच्या पुनरुज्जीवनावर विश्वास वाढला आहे आणि संभाव्य भविष्यातील कमाईच्या सुधारणांकडे लक्ष वेधले आहे.'