नागपूर : नेत्यांच्या निवडणुकीत कार्यकत्यांनी जीवाचे रान केल्यानंतर आता कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्याची नाराजी अनेक जण व्यक्त करत आहे. सोमवार, १७ नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता .
इच्छुक उमेदवारांना चर्चेत गुंतवून शेवटपर्यंत रस्सीखेच करून अखेर जिल्ह्यात जवळपास महायुती तुटली आणि मविआघाडीत बिघाडी झाली. महायुतीत शिवसेनेने सर्व नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार घोषित केले. भाजपकडून संबंधितांना तशा सूचना दिल्या गेल्या. राष्ट्रवादी अजित पवार गटाचा अपेक्षाभंग झाला. राष्ट्रवादीने शेवट पर्यंत प्रतीक्षा केली. ठाकरे गटाला कुठेही स्कोप मिळाला नाही. परिणामी, आता सर्वच पक्ष एकमेकांविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत, असे चित्र जवळजवळ स्पष्ट आहे.
नेत्यांच्या निवडणुकीत कार्यकत्यांनी जीवाचे रान केल्यानंतर आता कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्याची नाराजी अनेक जण करत आहेत. सोमवार, १७ नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता फार फार तर नगराध्यक्षपदाचे उमेदवार अधिकृत होतील. नगरसेवकाबद्दल अद्यापही साशंकताच आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत विजय मिळावा, यासाठी मताचे एकत्रित समीकरण करून बड्या नेत्यांनी त्यांची राजकीय जमीन सुपीक केली. आता कार्यकर्त्यांची वेळ आल्यानंतर तुम्ही तुमचे पाहून घ्या, आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत, अशी भूमिका घेत सर्वच राजकीय पक्षांनी शेवटपर्यंत कार्यकर्त्यांना रखडवत ठेवल्याचे दिसून येत आहे. त्यातही अनेक पक्षांनी आपलीच हवा असल्याचा दावा करीत नेत्यांच्याही पुढे २ पावले टाकून विजय पक्का! असे चित्र निर्माण केल, त्यामुळे आता सर्वच नेते हतबल दिसत आहे.
भारतीय जनता पक्ष
भाजपचे जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत यांच्याशी अनेकदा संपर्क करण्यात आला. महायुतीबाबत काय, यावर त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र, सातत्याने संपर्कानंतरही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
शिवसेना
आमचे सर्व उमेदवार ठरले आहेत. २७ नगराध्यक्षपदाचे तसेच नगरसेवकपदांचे उमेदवारही तयार आहेत. संबंधितांना एबी फॉर्मही दिले. पक्षनेतृत्वाला याची माहिती दिली, यादीतील उमेदवारांची नावे सोमवारी जाहीर करू.
-आ. कृपाल तुमाने, संपर्कप्रमुख, रामटेक लोकसभा
राष्ट्रवादी काँग्रेस
महायुतीसाठी प्रयत्न केले, चर्चाही केली. मौद्यात शिवसेना शिंदे गटासोबत काही जागांवर निर्णय झाला आहे. भाजपकडून प्रतिसाद मिळत नाही. चर्चा सुरूच आहे. परंतु इच्छुकांचा आग्रह वाढला आहे.
-डॉ. राजाभाऊ टांकसाळे, जिल्हाध्यक्ष, राकाँ अजित पवार गट
शिवसेना उबाठा
८८ महाविकास आघाडीबाबत चर्चा सुरू आहे. जागावाटपावर चर्चा केली जात आहे. काँग्रेस किती जागा सोडेल, त्याबाबत जाणून घेतले जात आहे. जागेचा तिढा सुटू शकेल.
-उत्तम कापसे, जिल्हाप्रमुख, (ठाकरे गट)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
८८ पक्षाने स्थानिक पातळीवर अधिकार दिले आहेत, स्थानिक नेते त्यांना आवश्यक ते निर्णय घेऊ शकतात, पक्षनेतृत्वाने तशा सूचना केल्या आहेत. प्रत्यक्ष परिणामाची जाण त्यांना असते.
-अश्विन बैस, जिल्हाध्यक्ष
राष्ट्रवादी शरद पवार गट
८८ राष्ट्रवादीला आपाठी हवी होती, तशी चर्चाही केली. परंतु समाधान न झाल्याने इतर समविचारी पक्षाला सोबत घेतले. उमेदवारांची चाचपणी सुरू आहे.
- प्रवीण कुटे पाटील, जिल्हाध्यक्ष