Monday, November 17, 2025

बांगलादेशच्या न्यायालयाचा निर्णय, शेख हसीना दोषी

बांगलादेशच्या न्यायालयाचा निर्णय, शेख हसीना दोषी

ढाका : बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधात बांगलादेश आंतरराष्ट्रीय लवाद या देशांतर्गत स्थापन केलेल्या आंतरराष्ट्रीय लवादाने निर्णय दिला आहे. जुलै महिन्यातील बंडासाठी लवादाने सर्वस्वी शेख हसीना याच दोषी असल्याचा निर्णय दिला आहे. आंदोलन करत असलेल्या निरपराध नागरिकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिल्याप्रकरणी लवादाने शेख हसीना यांना दोषी ठरवले. लवादाने पदच्युत पंतप्रधान शेख हसीना आणि तत्कालीन गृहमंत्री असदुज्जमां खान कमाल यांना दोषी ठरवून फाशीची शिक्षा ठोठावली.

लवादात पुरावा म्हणून एक ऑडिओ फाईल सादर करण्यात आली. फोनवरुन शेख हसीना गोळीबार करण्यासाठी आदेश देत असल्याचे या फाईलमधील आवाजावरुन सिद्ध होईल, असे सांगत वकिलाने लवादात ऑडिओ सादर केला. काही अधिकाऱ्यांनी लवादात साक्ष देऊन शेख हसीना यांनी कोणत्या वेळी, कशा प्रकारे, काय आदेश दिले याची सविस्तर माहिती दिली. अखेर लवादाने शेख हसीना यांना दोषी ठरवत शिक्षा दिली. शेख हसीना यांचा आदेश मानवाधिकारांचे उल्लंघन आहे, हे एक अमानवी कृत्य आहे; असेही मत लवादाने नमूद केले. मानवाधिकार आयोगाच्या अहवालाचा आधार घेत लवादाने हे मतप्रदर्शन केले.

लवादाने ४५८ पानांच्या निकालपत्राद्वारे त्यांचा निकाल दिला. या निकालाद्वारे लवादाने शेख हसीना यांना दोषी ठरवले. शेख हसीना २०२४ च्या जानेवारीपासून हुकुमशहा होण्याच्या दिशेने वाटचाल करत होत्या. त्यांनी जानेवारी २०२४ मध्ये विरोधकांना चिरडले. नंतर विद्यार्थी रस्त्यावर उतरले. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर शेख हसीना यांनी आदेश दिल्यानंतर गोळीबार झाला. यात निरपराध नागरिकांचा, विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला; ही बाब नमूद करत लवादाने शेख हसीना यांना दोषी ठरवले.

युनुस सरकारने पदच्युत पंतप्रधान शेख हसीना, तत्कालीन गृहमंत्री असदुज्जमां खान कमाल आणि माजी पोलीस महानिरीक्षक चौधरी अब्दुल्ला अल-मामून यांना आरोपी केले होते. या आरोपींविरोधात लवादापुढे सुनावणी झाली. आयत्यावेळी माजी पोलीस महानिरीक्षक चौधरी अब्दुल्ला अल-मामून यांनी शेख हसीना यांच्या विरोधात माफीचा साक्षीदार होण्याचा निर्णय घेतला. यानंतर सुनावणी झाली. काही अधिकाऱ्यांनी आधीच लवादात साक्ष देऊन शेख हसीना यांनी कोणत्या वेळी, कशा प्रकारे, काय आदेश दिले याची सविस्तर माहिती दिली. या सर्व साक्षी पुराव्यांची दखल घेऊन लवादाने शेख हसीना यांना दोषी ठरवले. मुख्य न्यायाधीश मुर्तजा यांच्या अध्यक्षतेखालील लवादात न्यायाधीश मोहम्मद शफीउल आलम महमूद आणि न्यायाधीश मोहम्मद मोहितुल हक एनाम चौधरी आहेत. या तीन न्यायाधीशांच्या लवादाने शेख हसीना यांना दोषी ठरवले. शेख हसीना यांनी शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर हेलिकॉप्टरमधून बॉम्ब वर्षाव करण्याचा आदेश दिलेला असं सुद्धा लवादाने आपल्या निकालात म्हटलं आहे.

Comments
Add Comment