वैभववाडीत मंत्री नितेश राणे यांचा उबाठाला मजबूत धक्का

आखवणे व भोम गावातील दोन शाखाप्रमुखांसह असंख्य कार्यकर्ते भाजपात दाखल


वैभववाडी : वैभववाडी परिसरात राजकीय हालचालींना वेग आला असून उबाठाच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत झालेल्या या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यामुळे भाजपाने वैभववाडीमध्ये आपली ताकद आणखी वाढवली आहे.


या कार्यक्रमात उबाठाचे आखवणे शाखाप्रमुख रवींद्र गुरव, भोम शाखाप्रमुख संतोष नारायण पडवळ, महिला शाखाप्रमुख संजीवनी गुरव, तसेच राजेश गुरव, संदीप पाटेकर, मंगेश गुरव, संदीप गुरव आणि अन्य अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. मंत्री नितेश राणे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले. या प्रवेशामुळे उबाठाला मोठा धक्का बसला असून भाजपासाठी हा महत्त्वाचा राजकीय विजय मानला जात आहे.


कार्यक्रमावेळी किशोर कांबळे, श्रीधर फोंडके, ज्ञानेश्वर फोंडके, सुशील कदम, उदय पांचाळ, शांतिनाथ गुरव यांच्यासह भाजपाचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या घडामोडीमुळे वैभववाडीतील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली असून आगामी काळात भाजपाची ताकद अधिक बळकट होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

Comments
Add Comment

शिवसेनेचे आमदार भाजपत घेऊन काय करू?

मुख्यमंत्री फडणवीसांचा सवाल; शिवसेना मजबूत करण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे नागपूर : “शिवसेना आमचा

विरोधी पक्षनेत्यांच्या मुद्यावर काय म्हणाले मुख्यमंत्री ?

नागपूर : ‘मनात मांडे, पदरात धोंडे’, अशी म्हण ग्रामीण भागात प्रचलित आहे. विरोधकांच्या महाविकास आघाडीला ती तंतोतंत

'महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशात अव्वल'

नागपूर : "विरोधकांना राज्य दिवाळखोर दाखवायची घाई झालेली आहे. पण, राज्याची आर्थिक स्थिती ओढाताणीची असली तरी

मनिष तिवारींनी व्हिप विरोधात सादर केले खासगी विधेयक

नवी दिल्ली : काँग्रेस खासदार मनिष तिवारींनी व्हिप अर्थात पक्षादेशाविरोधात खासगी विधेयक सादर केले आहे. हे विधेयक

इंडिगोचा मंत्री, आमदारांनाही फटका, हिवाळी अधिवेशनाला कसे राहणार हजर ?

नागपूर : इंडिगोच्या गोंधळाचा मोठा फटका राज्याच्या हिवाळी अधिवेशनालाही बसण्याची शक्यता आहे. अनेक मंत्री आणि

नागपूरमध्ये सोमवारपासून हिवाळी अधिवेशन, कोणते मुद्दे गाजणार ?

नागपूर : महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सोमवार ८ डिसेंबर २०२५ पासून सुरू होत आहे.