कुठे काका विरुद्ध पुतण्या, तर कुठे दादा, भावजयी रणांगणात

नगर परिषद निवडणुकीत ‘घर घर की कहानी’ गाजणार


मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्याने सगळीकडे लगबग सुरू आहे. सोमवारी २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख होती. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. बऱ्याच ठिकाणी एकाच घरातील उमेदवार आमने-सामने आले आहेत. काही ठिकाणी काका-पुतणे तर काही ठिकाणी सख्या जावांनी एकमेकींच्या विरोधात अर्ज भरले आहेत.



अखेरच्या दिवशी सिंधुदुर्गात इच्छुकांची धावपळ


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ले नगरपरिषद तर कणकवली नगरपंचायतीची निवडणूक रणधूमाळी आता ऐन रंगात आली आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी सर्वच इच्छूकांची धावपळ उडाली होती. वेंगुर्ले नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी ३ तर नगरसेवक पदासाठी २२ उमेदवारी अर्ज दाखल झाले. शेवटच्या दिवसापर्यंत थेट नगराध्यक्ष पदासाठी एकूण ८ तर २० नगरसेवक पदासाठी ११३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सावंतवाडी नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदाकरिता ११ आणि नगरसेवक पदाकरिता ११४ असे मिळून एकूण १२५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. मालवण नगरपरिषदेतील नगराध्यक्षपदासाठी ६ तर नगरसेवक पदासाठी ७६ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. कणकवली नगरपंचायत निवडणूकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर १७ नगरसेवक पदासाठी एकूण ५६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.



शिराळा येथे काका विरुद्ध पुतणे लढत


सांगलीतील शिराळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडणुकीत काका विरुद्ध पुतणे अशी थेट लढत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार मानसिंगराव नाईक आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार शिवाजीराव नाईक यांनी युती केली आहे. राष्ट्रवादीच्या या युतीकडून शिराळा नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून अभिजीत विजयसिंह नाईक यांनी अर्ज दाखल केला आहे. भाजप आमदार सत्यजित देशमुख, भाजप जिल्हा अध्यक्ष सम्राट महाडिक व शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी पृथ्वीसिंग भगतसिंग नाईक यांना उमेदवारी मिळाली असून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता शिराळ्यात काका अभिजीत विजयसिंह नाईक विरूद्ध पुतण्या पृथ्वीसिंग भगतसिंग नाईक अशी लढत पहायला मिळणार आहे.



संगमनेरमध्ये आमदारांची प्रतिष्ठा पणाला


संगमनेर नगरपालिकेतही अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे यांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महायुतीचे आमदार अमोल खताळ यांच्या भावजयी सुवर्णा खताळ यांनी महायुतीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या निवडणुकीत आमदार सत्यजित तांबे आणि आमदार अमोल खताळ यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.



रायगडच्या उरणमध्ये मनसे महाविकास आघाडीत


उरण नगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि मनसेची युती झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, ठाकरेंची सेना, काँग्रेस आणि मनसेची उरण नगरपालिकेसाठी आघाडी झाली आहे. प्रचाराच्या पोस्टरवर महाविकास आघाडीच्या नेत्यासोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही फोटो आहे. एकट्या भाजप विरुद्ध महाविकास आघाडी आणि मनसे उरण नगरपालिकेच्या मैदानात उतरली आहे. उरण नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीतील घटक पक्षाला सोबत न घेता भाजप स्वतंत्र लढणार आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या भावना घाणेकर नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढणार आहेत.



कागलमध्ये कट्टर विरोधक एकत्र


राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे समरजित घाटगे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ कट्टर विरोधक कागल नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत टोकाचा संघर्ष केलेल्या या दोन नेत्यांमध्ये समेट घडविण्यात भाजपाच्या राज्यातील प्रमुख नेत्यांने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे समरजित घाटगे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून निवडणूक न लढता राजर्षी शाहू आघाडी मार्फत निवडणूक लढवणार आहेत. नगराध्यक्ष पदासाठी एकूण २८ तर नगरसेवक पदासाठी २१४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

Comments
Add Comment

पालघर नगरपरिषद निवडणुकीत आघाडीत बिघाडी !

महायुतीमध्येही पडली उभी फूट पालघर (प्रतिनिधी) : पालघर जिल्ह्यात होणाऱ्या तीन नगरपरिषदेसह एका नगरपंचायत

लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेस ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ

मुंबई - मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील महिलांची ई-केवायसी प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू असताना, अलिकडे

अनगरमध्ये भाजपचा एकहाती विजय! १७ पैकी १७ उमेदवार बिनविरोध निवडून

अनगर : मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीमध्ये स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. भाजपने सर्व

भारत-चीन संबंधांमध्ये सकारात्मक बदल; लष्करप्रमुखांनी दिली महत्वाची माहिती

नवी दिल्ली : भारत-चीन सीमावर्ती तणावाबाबत गेले काही महिने सकारात्मक घडामोडी घडत असल्याचे लष्करप्रमुख जनरल

'भाजप काँग्रेसचा सर्वाधिक आमदारांचा विक्रम मोडणार'

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर, देशभरात भाजपच्या आमदारांची संख्या वाढली आहे.

Pune Crime News : भरदिवसा थरकाप उडवणारा खून; तरुणाला कोयत्याने मारहाण करून दगडाने ठेचलं अन्...

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, येथील कायदा आणि