ऐतिहासिक करार ! 'या' गोष्टींमुळे तेल व गॅस शेअर जबरदस्त उसळले !

मोहित सोमण: आज सकाळच्या सत्रात ऑईल व गॅस शेअर्समध्ये वाढ झाली आहे. प्रामुख्याने केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी भारतीय तेल कंपन्यांचा युएस बरोबर झालेल्या कराराबाबत माहिती दिल्यानंतर गुंतवणूकदारांनी तेल व गॅस शेअर्समध्ये गुंतवणूक वाढवल्याने तेल व गॅस श्रेत्रीय समभागात (Stocks) मध्ये मोठी वाढ झाली आहे. सकाळी सुरूवातीला ओएनजीसी, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, बीपीसीएल (भारत पेट्रोलियम), हिंदुस्थान पेट्रोलियम,ऑईल इंडिया, एमआरपीएल शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. भारताने युएसबरोबर 'एनर्जी सिक्युरिटी' करिता स्वाक्षरी केली आहे अशी माहिती पुरी यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये दिली आहे. 'ऐतिहासिक करार! भारतीयांना परवडणाऱ्या दरात नैसर्गिक गॅस व एलपीजीचा पुरवठा व्हावा यासाठी हा करार केल्याचे पुरी यांनी स्पष्ट केले. एक वर्षाचा हा करार असणार आहे.


नव्या करारातील माहितीनुसार, सार्वजानिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी (PSU Oil Companies) यांनी २.२ एमटीवीए इतक्या एलपीजी गॅसची आयात करण्याचे ठरवले असल्याचे घोषित केले. भारतात विविध देशांकडून एलपीजी गॅसची निर्यात होते. त्यामुळे आपल्या आयातीत विविधीकरण (Diversification) केल्यास त्यांचा किंमतीबाबतही भारताला फायदा होईल असे सरकारचे म्हणणे आहे.


याविषयी एक्सवर नेमक्या शब्दात बोलताना पुरी म्हणाले आहेत की,' एक ऐतिहासिक पहिला! जगातील सर्वात मोठ्या आणि वेगाने वाढणाऱ्या एलपीजी बाजारपेठांपैकी एक अमेरिकेसाठी खुली झाली आहे. भारतातील लोकांना एलपीजीचा सुरक्षित, परवडणारा पुरवठा करण्याच्या आमच्या प्रयत्नात, आम्ही आमच्या एलपीजी सोर्सिंगमध्ये विविधता आणत आहोत. एका महत्त्वपूर्ण विकासात, भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी सुमारे २.२ एमटीपीए एलपीजी आयात करण्यासाठी १ वर्षाचा करार यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.


जगातील सर्वात मोठ्या आणि वेगाने वाढणाऱ्या एलपीजी बाजारपेठांपैकी एक म्हणून भारताचे स्थान अधोरेखित करताना, पुरी म्हणाले की हा नवीन करार एलपीजी सोर्सिंगमध्ये विविधता आणण्याच्या देशाच्या प्रयत्नांमध्ये एक महत्त्वाचा टप्पा आहे.'


त्यांनी नमूद केले की भारतीय बाजारपेठेसाठी अमेरिकन एलपीजीचा समावेश असलेला हा पहिलाच संरचित (Restructure) दीर्घकालीन करार असेल. पुरी यांनी स्पष्ट केले की ही खरेदी जागतिक एलपीजी व्यापारासाठी एक प्रमुख किंमत निर्देशांक असलेल्या माउंट बेल्व्ह्यूशी बेंचमार्क करण्यात आली आहे. त्यांनी पुढे सांगितले की, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) यांच्या पथकांनी अलीकडच्या काही महिन्यांत प्रमुख अमेरिकन उत्पादकांशी चर्चा करण्यासाठी अमेरिकेला भेट दिली होती आता ती यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. आंतरराष्ट्रीय किमतीच्या धक्क्यांपासून ग्राहकांना वाचवण्यासाठी, भारत सरकारने वर्षभरात ४०००० कोटींहून अधिक भार सहन केला. त्यांनी असेही सांगितले की नवीन यूएस आयात करार देशातील लोकांसाठी विश्वासार्ह आणि परवडणारा ऊर्जा पुरवठा सुरक्षित करण्यासाठी सरकारच्या चालू प्रयत्नांना बळकटी देतो.'


सरकारकडून विशेषतः प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी परवडणारा एलपीजी सुनिश्चित करण्यासाठी पुरी यांना भाष्य केले आहे. त्यांच्या मते, गेल्या वर्षी जागतिक स्तरावर एलपीजीच्या किमती ६०% अधिक वाढल्या असतानाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला ग्राहकांना प्रति सिलेंडर फक्त ५००-५५० रूपये दराप्रमाणे गॅस सिलिंडर वाटप मंजूर केले होते.


सकाळच्या सत्रात या पीएसयु शेअर्समध्ये १ ते २% पातळीवर वाढ झाली. एनएसईत गेल्या आठवड्याभरात कंपनीच्या शेअर्समध्ये ०.५७% वाढ झाली असून तर महिन्यातही ०.९७% परतावा या शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला आहे.

Comments
Add Comment

पुनावाला फिनकॉर्पवर आयकर विभागाची कारवाई! १६.३९ लाखांचा दंड आकारला कंपनी म्हणते,'आमच्यावर....

मोहित सोमण: पुनावाला फिनकॉर्प लिमिटेड (Poonawala Fincorp Limited) एनबीएफसी कंपनीला आयकर विभागाकडून १६३९७५० लाख रूपये दंड

Tata Motors TMPV Share: कंपनी सूचीबद्ध झाल्यानंतर शेअरची सर्वात वाईट कामगिरी! थेट ७.२७% कोसळला 'या' ४ कारणांमुळे

मोहित सोमण:आज टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकलचा शेअर मोठ्या अंकांनी कोसळला. बाजाराच्या सुरूवातीलाच टाटा मोटर्स

स्टेट बँकेने रचला नवा इतिहास: आज बाजार भांडवल ९ ट्रिलियन पार केले, ठरली पहिली पीएसयु बँक 'यासाठी'

मोहित सोमण: आज एसबीआयने (State Bank of India SBI) मोठी ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच बँकेच्या

बिहारमध्ये नव्या सरकारच्या हालचालींना वेग; २२ नोव्हेंबरपूर्वी शपथविधीची शक्यता

पटना : बिहारमध्ये नवं सरकार येत्या २२ नोव्हेंबरपूर्वी स्थापन होईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री आणि एलजेपीचे

मदिना जवळ बस-टँकर अपघातात ४२ भारतीयांचा मृत्यू

मक्का मदिना : मदिना जवळ उमराह यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस आणि डिझेल टँकर यांची भीषण धडक होऊन ४२ भारतीयांचा मृत्यू

Corporate Action Today: आज 'या' कंपन्यांच्या लाभांशासाठी एक्स डेट व या 'या कंपन्यांसाठी राईट इश्यूसाठी अंतिम मुदत जाणून घ्या १० शेअर्सची लिस्ट

मोहित सोमण: काही कंपन्यानी लाभांश देण्यासाठी आपली एक्स डेट संचालक मंडळाच्या बैठकीनंतर घोषित केली होती. एक्सचेंज