Fujiyama Solar IPO Day 3 फुजियामा पॉवर आयपीओचा अखेर! कंपनीच्या सबस्क्रिप्शन मध्ये फ्लॉप शो? शेवटच्या दिवशी २.१४ पटीने सबस्क्रिप्शन

मोहित सोमण:आज अखेर फुजियामा पॉवर सिस्टिम लिमिटेड (Fujiyama Power System Limited) म्हणजेच फुजियामा सोलार आयपीओला सबस्क्राईब करण्याचा शेवटचा दिवस होता. आज तिसऱ्या दिवशी आयपीओला एकूण २.१४ पटीने सबस्क्राईब केला गेला आहे. त्यामुळे १३ ते १७ नोव्हेंबर या कालावधीतील ८२८ कोटी बूक व्हॅल्यु असलेल्या आयपीओला एकूण एकूण २.१५ पटीने सबस्क्रिप्शन म्हणजेच बिडिंग प्राप्त झाले आहे. दुसऱ्या दिवशी कंपनीच्या आयपीओला ४०% बिडिंग (बोली) मिळाली होती. एकूण २५४८६८४२ शेअर उपलब्ध असताना ५४८१७६२० पटीने बिडिंग शेअर्समध्ये प्राप्त झाले आहे. २१६ ते २२८ रूपये प्रति शेअर प्राईज बँड निश्चित करण्यात आला होता. एकूण आयपीओसाठी ३.६३ कोटी शेअर पब्लिक इशूसाठी उपलब्ध केले गेले होते. त्यापैकी १.२६ शेअर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी (Retail Investors), १.८० कोटी शेअर पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (QIB), ०.५४% वाटा विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) उपलब्ध होता. एकूण शेअरपैकी २६३१५७८९ शेअरचा वाटा फ्रेश इशूसाठी उपलब्ध होता तर ऑफर फॉर सेल (OFS) साठी १ रूपये दर्शनी मूल्य (Face Value) असलेल्या २२८ कोटी मूल्यांकनाचे शेअर (१ कोटी) विक्रीसाठी उपलब्ध होते.


आयपीओने आयपीओपूर्वीच २४६.९० कोटी अँकर गुंतवणूकदारांकडून उभारले होते. किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १४८२० रूपयांची गुंतवणूक (६५ शेअर) अनिवार्य करण्यात आली होती. पात्र गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप (Allotment) १८ नोव्हेंबरपर्यंत होईल तसेच २० नोव्हेंबरला कंपनी बाजारात सूचीबद्ध (Listed) होणार आहे. पवन कुमार गर्ग, योगेश दुवा, सुनिल कुमार हे कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत.


२०१७ मध्ये स्थापन झालेली फुजियामा पॉवर सिस्टम्स लिमिटेड रूफटॉप सोलर उद्योगात उत्पादनात गुंतलेली आहे. सौर ऊर्जा सोलूशन पुरवणारी कंपनी ऑन-ग्रिड, ऑफ-ग्रिड आणि हायब्रिड सोलर सिस्टीमचा या सुविधाही पुरवते. पर्यायी ओईएम (Original Equipment Manufacturers OEMs) OEM वरील ग्राहकांचा अवलंब कमी करण्यासाठी कंपनीने ५२२ हून अधिक SKU चा विस्तृत उत्पादन पोर्टफोलिओ डिझाइन केला आहे, ज्यामध्ये सोलर इन्व्हर्टर, पॅनेल आणि बॅटरी यांचा समावेश आहे.


कंपनीवला ७२५ हून अधिक वितरक व ५५४६ डीलर्स आणि १,१०० विशेष फ्रँचायझीं दुकानांसह विस्तृत वितरण नेटवर्कद्वारे ग्राहकांना सेवा देते. ग्राहकांच्या गरजा समजून घेण्यासाठी आणि कस्टमाइज्ड सोलर सिस्टीम पुरवण्यासाठी कंपनी प्रयत्न करते. याव्यतिरिक्त कंपनी सोलर PCU, ऑफ-ग्रिड, ऑन-ग्रिड आणि हायब्रिड इन्व्हर्टर, सोलर पॅनेल, PWM चार्जर, इतर बॅटरी चार्जर, लिथियम-आयन आणि ट्यूबलर बॅटरी, ऑनलाइन आणि ऑफलाइन UPS सिस्टम, सोलर मॅनेजमेंट युनिट्स आणि चार्ज कंट्रोलर्ससह विस्तृत उत्पादन श्रेणी ऑफर करते.कंपनीच्या चार उत्पादन सुविधा ग्रेटर नोएडा, उत्तर प्रदेश, परवाणू, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि दादरी, उत्तर प्रदेश येथे कार्यरत आहेत.


कंपनीला यापूर्वी आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर ६७% कोटी महसूलात वाढ झाली असून कंपनीने करोत्तर नफ्यात इयर ऑन इयर बेसिसवर २४५% वाढ नोंदवली होती. जून तिमाहीत कंपनीच्या उत्पन्नात मात्र घसरण झाली. मार्च तिमाहीतील तुलनेत या तिमाहीत कंपनीच्या उत्पन्नात ५९७.७९ कोटींवर घट झाली आहे तर कंपनीच्या ईबीटा (EBITDA) गेल्या तिमाहीतील २४८.५२ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत १०५.८९ कोटीवर घसरण झाली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतील मिळणाऱ्या निधीचा वापर कंपनी रतलाम मध्यप्रदेश या ठिकाणी नवा प्रकल्प उभारणीसाठी, थकबाकी चुकती करण्यासाठी, अँडव्हान्स पैसे देण्यासाठी, व इतर दैनंदिन कामकाजासाठी करण्यात येणार आहे. कंपनीच्या मुळ प्राईज बँड किंमतीपेक्षा आज ग्रे बाजारात कंपनीच्या शेअर्समध्ये ०.४४% वाढ झाली आहे. त्यामुळे एकंदर कल पाहता कंपनीचा शेअर ६५ रूपये प्रिमियमसह सूचीबद्ध होऊ शकतो.

Comments
Add Comment

Pune Crime News : भरदिवसा थरकाप उडवणारा खून; तरुणाला कोयत्याने मारहाण करून दगडाने ठेचलं अन्...

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, येथील कायदा आणि

७७१२ कोटींच्या ECMS योजनेला सरकारचा ग्रीन सिग्नल जम्मू काश्मीरातही मोठी गुंतवणूक होणार

प्रतिनिधी: केंद्र सरकारने केलेल्या नव्या घोषणेनुसार, सरकारने ७७१२ कोटींच्या ईसीएमएस (Electronic Compenent Manufacturing Scheme ECMS) योजनेला

ICRA Report: दुसऱ्या तिमाहीत जीडीपीत ७.८% वरून ७% किरकोळ घसरण होणार - अहवाल

प्रतिनिधी: भारतीय अर्थव्यवस्थेविषयी एक महत्वपूर्ण अहवाल आयसीआरए (Investment Information and Credit Ratings Agency of India) संस्थेने प्रदर्शित

Sheikh Hasina Verdict : हसीना यांना शिक्षा तर ढाकामध्ये 'हिंसेचा भडका'! लोक रस्त्यावर उतरले; पहा राजधानीतील 'तणावाचा VIDEO'

बांगलादेशच्या राजकारणात सध्या ऐतिहासिक आणि अनेकदिशात्मक राजकीय चढ-उतार दिसून येत आहेत. देशाच्या माजी

Balu Forge Q2Results: बाळू फोर्जचा तिमाही निकाल जाहीर कंपनीच्या निव्वळ नफ्यात ३५.५०% वाढ महसूलातही मोठी वाढ

मोहित सोमण: बाळू फोर्ज कंपनीने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. कंपनीने आपल्या एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या

Stock Market Closing Bell: बँक शेअर्सची कमाल तर मिड स्मॉल कॅप शेअरहोल्डर मालामाल ! सेन्सेक्स ३८८.१७ व निफ्टी १०३.४० अंकांनी उसळला ! 'या' कारणांमुळे

मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेरच्या सत्रात समाधानकारक झाली आहे. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स