प्रतिनिधी: गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात सायबर सिक्युरिटीवर वेळोवेळी तज्ञांनी चिंता व्यक्त केली होती. नैतिकदृष्ट्याही आयटीसह एआय तंत्रज्ञानातील युजरचेच नाही तर एकूण व्यवसायिक कंपन्यांच्या कामकाजातील सायबर सुरक्षाही महत्वाची आहे. आर्थिक व सामाजिक दृष्ट्या एआयचा गैरवापर सुरु असताना आता रूब्रिक झिरो लॅब्स (Rubrik Zero Labs) कडून नवा अहवाल सादर केला आहे. त्यामध्ये महत्वाचे निरीक्षण म्हणजे ९०% भारतीय कंपन्या पुढील १२ महिन्यात डिजिटल आयडिंटी मॅनेजमेंट, आयटी इन्फ्रास्ट्रक्चर, व इतर तांत्रिक प्रकिया सुरक्षित आहेत हे सुनिश्चित करण्यासाठी नवे सायबर सिक्युरिटी एक्स्पर्ट भरती करू शकतात.
मोठ्या प्रमाणात दैनंदिन कामकाजात एआयचा (Artificial Intelligence) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नुसतेच ए आय नाही तर एआय एजंटचा वापर वाढल्याने केवळ तांत्रिक दृष्ट्या नाही तर मानवी दृष्टिकोनातून वैयक्तिक ओळख जगाच्या दृष्टीक्षेपात येत आहे. रिपोर्टमधील महत्वाचे निरीक्षण म्हणजे यावेळी कंपन्या पुढील १२ महिन्यात सीआयओ (Chief Information Officer), सीआयएसओ (Chief Information Security Officer CISO) यांची भरती मोठ्या प्रमाणात कंपन्या करू शकतात. कारण यामुळे मोठ्या प्रमाणात कंपनीवर वैयक्तिक सिक्युरिटीसह कंपन्यांच्या माहितीचे संरक्षण करणे हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
अहवालावर आपले भाष्य करताना,'हल्लेखोर आता वारंवार मानवी आणि गैर-मानवी ओळखींना (Indentity) लक्ष्य करत आहेत. हा महत्त्वाचा प्रणाली आणि डेटा मिळवण्याचा सर्वात जलद मार्ग आहे, जो भारतीय सायबर संरक्षणाचा चेहरामोहरा मूलभूतपणे बदलत आहे' असे रुब्रिकचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक आणि अभियांत्रिकी प्रमुख आशिष गुप्ता यांनी निवेदनात म्हटले आहे.
वेकफिल्ड रिसर्च (Wakefield Research) संस्थेने हा सर्व्ह घोषित करण्यात आला आहे. भारतासह युएस, युरोप, जपान, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर अशा विभागात हा रिसर्च करण्यात आला आहे.