'भाजप काँग्रेसचा सर्वाधिक आमदारांचा विक्रम मोडणार'

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर, देशभरात भाजपच्या आमदारांची संख्या वाढली आहे. भाजपला मिळालेल्या आमदारांची ही आतापर्यंतची मोठी संख्या आहे. देशभरातील विविध राज्यांमध्ये विधानसभेच्या जागा जिंकून भाजपने आपले स्थान सातत्याने मजबूत केले आहे. पक्षाचे नेते अमित मालवीय यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये भाजपच्या चढत्या आलेखाबद्दल माहिती दिली. पुढील दोन वर्षांत भाजपच्या देशभरातील आमदारांची एकूण संख्या १८०० च्या पुढे जाण्याची शक्यता आहे, असा विश्वास अमित मालवीय यांनी व्यक्त केला.

देशात इंदिरा गांधींची लाट होती त्या काळात १९८५ मध्ये काँग्रेसने २०१८ आमदारांचा टप्पा गाठला होता. ही देशातल्या काँग्रेस आमदारांची सर्वोच्च संख्या होती. हा विक्रम एक दिवस भारतीय जनता पार्टी नक्की मोडीत काढेल, असाही विश्वास अमित मालवीय यांनी व्यक्त केला.



 

भाजप आमदारांची संख्या कशी वाढली ?

भारतीय जनता पार्टीच्या आमदारांच्या संख्येत २०१४ पासून वाढ होत आहे. या संदर्भातली आकडेवारी भाजपच्यावतीने जाहीर करण्यात आली आहे. भाजप आमदारांची संख्या २०१४ मध्ये १,०३५ होती. नंतर २०१५ मध्ये ९९७, २०१६ मध्ये १,०५३ आणि २०१७ मध्ये १,३६५ अशी लक्षणीय वाढ झाली. त्यानंतर २०१८ मध्ये ही संख्या १,१८४, २०१९ मध्ये १,१६० आणि २०२० मध्ये १,२०७ झाली. यानंतर २०२१ मध्ये १,२७८ आमदार, २०२२ मध्ये १,२८९, २०२३ मध्ये १,४४१, २०२४ मध्ये १,५८८ आणि आता २०२५ मध्ये १,६५४ आमदारांसह वाढीचा कल कायम आहे
Comments
Add Comment

'Kumbh Bhakti Sangam' : नाशिकमध्ये शुक्रवारपासून कुंभ भक्ती संगम, मुख्यमंत्री करणार उद्घाटन

नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे आयोजित तीन दिवसीय ‘कुंभ भक्ती संगम’ची तयारी पूर्ण झाली

Helpline : नेपाळच्या पुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या नातलगांसाठी हेल्पलाईन

मुंबई : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात बुधवारी सकाळी भोटे कोशी नदीला अचानक आलेल्या भीषण पुरामुळे किमान ५०० प्रवासी

Beed Crime : आष्टीत एकाच रात्री तीन अल्पवयीन मुलींचे बालविवाह; १२ जणांविरुद्ध गुन्हा

बीड : कायद्याची भीती न बाळगता आष्टी तालुक्यातील कानडी बुद्रुक येथे एकाच रात्री तब्बल तीन अल्पवयीन मुलींचे

MPSC paper leak : पेपरफुटी प्रकरणात सहा जणांना अटक, २ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी; एमपीएससीच्या तीन अधिकाऱ्यांचाही समावेश

मुंबई : अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली संपूर्ण

Nepal's flood situation : नेपाळमधील पूरस्थितीवर पंतप्रधान मोदींची बालेन्द्र शाह यांच्याशी चर्चा, भारताकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

नवी दिल्ली : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

UP : उत्तरप्रदेशमध्ये आई-वडिलांशी दुर्व्यवहार करणारी मुले संपत्तीतून बेदखल होणार

लखनऊ : उत्तर प्रदेश (UP) सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे