मुलुंड पूर्व आणि पश्चिममधील नाने पाडा नाल्यावरील पुलांची पुनर्बांधणी

मुंबई : पूर्व उपनगरातील मुलुंड पश्चिममधील नानेपाडा नाल्यावरील पूल पाडून त्याठिकाणी नव्याने पुनर्विकास केला जाणार आहे. नानेपाडा नाल्यावरील पश्चिम दिशेकडील एसएल रोडवरील पूल आणि मुलुंड पूर्वमधील शिव मंदिराजवळील पूल हे जुने झाल्याने ते पाडून नव्याने बांधली जाणार आहे. या पुलांच्या पुनर्विकासासाठी महापालिकेच्यावतीने कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे. यासाठी तब्बल १० कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. पूर्व उपनगरातील सर्व पुलांच्या नियमित तपासणीसाठी नेमण्यात आलेल्या स्ट्रक्ट्रॉनिक्स कन्सल्टींग इंजिनिअर्स यांच्या निरिक्षण अहवालानुसार 'टी' विभागातील नानेपाडा नाल्यावरील एसएल रोडवरील पूल, शिव मंदिराजवळील पूल, हे जीर्ण अवस्थेत असल्याने ते पाडून त्याठिकाणी नव्याने पुनर्बांधणी करणे आवश्यक आहे. "पुलाची स्थिती नाजूक आहे आणि जीर्ण अवस्थेत आहे. पुलावरील वाहनांची वाहतूक तात्काळ बंद करण्याची आणि पुनर्बाधणीसाठी विचार करण्याची शिफारस केली जाते."


मुलुंड पश्चिम एस एल मार्ग येथील नानेपाडा नाल्यावरील पूल (रामगड तबेलाजवळ)
पुलांची लांबी : १५.६७ मीटर
पुलांची रुंदी : १४.०० मीटर


नाल्यावरील पुलाची खोली २.८६५ मीटर
स्पॅनची संख्या : १
पिलरची संख्या : २
सुपरस्ट्रक्चर : आरसीसी गर्डर आणि स्लॅब


मुलुंड, पूर्व नानेपाडा नाल्यावरील शिव मंदिराजवळील पूल (रामगड तबेलाजवळ)
पुलांची लांबी : ११.०० मीटर
पुलांची रुंदी : १६.४५७ मीटर


नाल्यावरील पुलाची खोली २.३५५ मीटर
स्पॅनची संख्या : १
पिलरची संख्या : २
सुपरस्ट्रक्चर : आरसीसी गर्डर आणि स्लॅब

Comments
Add Comment

राज्यातील शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत कर्जमाफी!

परदेशी कमिटीचा अंतिम अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार मुंबई : कर्जमाफीबाबत राज्यातील

माहिम मोरी रोड शाळेच्या पुनर्विकासाच्या भूमिपुजनाचा लवकरच वाढणार नारळ

तब्बल सात वर्षांपासून बंद करण्यात आली शाळा, दोन वर्षांपासून आहे जमिनदोस्त मुंबई (विशेष प्रतिनिधी): माहिममधील

वांद्रे तलाव बनले बकाल, तलावात शेवाळयुक्त दुर्गंधी पाणी आणि कचरा

तलावाभोवतीचे सुरक्षा कठडे तुटलेले जॉगिंग ट्रॅकवरील लाद्या उखडलेल्या मुंबई (सचिन धानजी): मुंबई महानगरपालिकेने

दहिसर पूर्वमधील नव्याने बनवलेल्या यशवंतराव तावडे मार्ग खोदला

नव्याने जलवाहिनी टाकण्यासाठी काँक्रिट केलेला रस्ता खोदण्याचा प्रताप नवीन केलेला रस्ता खोदायला दिला जाणार

मालाडकरांना छोटा 'केइएम' ची आरोग्य सुविधा, नागरी आरोग्य प्रशिक्षण केंद्राचे लोकार्पण

मुंबई (विशेष प्रतिनिधी): पश्चिम उपनगरात नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मालाड मालवणी

माजी लोकसभाध्यक्षांना 'ब्रह्मभूषण' पुरस्कार जाहीर

मुंबई : माजी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांना 'ब्रह्मभूषण’ २०२५ पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा