खारघर किनारा मार्ग प्रकल्पामुळे भविष्यात नवी मुंबईकरांचा प्रवास सुलभ

नवी मुंबई  : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्पामुळे भविष्यात रस्ते मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होणार आहे. त्यामुळे वाहतुकीच्या नियोजनासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहे. नवी मुंबईतील अत्यंत महत्त्वाचा खारघर किनारा प्रस्तावित मार्गिकाच्या प्रकल्पाच्या निर्माणास वन विभागाच्या परवानग्या मिळाल्यानंतर २०२६ मध्ये सुरुवात होण्याची शक्यता आहे. राज्यातील महत्त्वकांक्षी प्रकल्पापैकी असलेल्या या प्रकल्पामुळे खारघर, नेरुळ आणि बेलापूर भागातील वाहतूक सुलभ होणार आहे. हा प्रकल्प २०२९ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


तसेच शीव-पनवेल मार्गावरही मोठ्याप्रमाणात वाहनांचा भार असतो. वाहतूक कोंडीमुळे सुटका मिळावी यासाठी खारघर किनारी प्रकल्प सिडकोच्या माध्यमातून निर्माण केला जाणार आहे. हा मार्ग ९.६८ किमी लांबीचा आणि ३० मीटर रुंदीचा असेल. मार्ग खारघर आणि नेरुळ भागाला जोडला जाणार आहे.


खारघरमधील जलमार्ग सेक्टर १६ पासून खारघर रेल्वे स्थानकाजवळील पीएमएवाय गृहनिर्माण योजनेर्पंत तसेच नेरुळमधील भूमिगत मार्गापर्यंत हा प्रकल्प विस्तारित केला जाणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला हा मार्ग जोडला जाणार आहे. या प्रकल्पामुळे शीव पनवेल मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. २०२६ मध्ये सुरुवातीच्या काही महिन्यांत या प्रकल्पाच्या निर्माणास सुरुवात होणार असून २०२९ मध्य प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे.


नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. विमानतळाच्या निर्मितीमुळे भविष्यात रस्ते मार्गावरही वाहनांचा भार वाढणार आहे. त्यामुळे या विमानतळाला जोडण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पामुळे नवी मुंबईतील प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. हा मार्ग सहा वाहिन्यांचा असेल. त्यामुळे भविष्यातील या मार्गावरील प्रवास वेगवान असेल. ९.६८ किमी लांबीचा असून त्यापैकी ६.६९ किमीची मार्गिका पूर्णपणे नव्याने बांधली जाणार आहे. तर २.९९ किमी मार्गिकाही पूर्वीच्याच मार्गिकेत दुरुस्ती करून ती या प्रकल्पाला जोडली जाणार आहे. या प्रकल्पामुळे नवी मुंबईच्या आर्थिक घडीला देखील चालना मिळणार आहे.

Comments
Add Comment

मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकाऱ्यांनी घेतली मतदान नियमावलीची माहिती अन् अनुभवले ईव्हीएम यंत्राचे प्रात्यक्षिक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरूवार, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार

लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील दीड कोटी महिलांना ई-केवायसी करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत

‘हक़’च्या यशानंतर यामी गौतम धरचं मन जिंकणारं वक्तव्य

या वर्षी दमदार अभिनय आणि मोठ्या पडद्यावर लक्षात राहणाऱ्या क्षणांनी भरलेल्या सिनेमांमध्ये एक नाव सातत्याने

मुखवट्यामागील गडद रहस्य ‘केस नं. ७३’

प्रत्येक चेहऱ्यावर एक मुखवटा असतो आणि या मुखवट्यामागे असतात सुखदुःखाच्या असंख्य मानवी भावभावना.. ज्या आपल्याला

हिंदवी पाटील आणि सुरेखा कुडची गाजवणार लावणीचा फड

लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान... उत्तम संगीत आणि नखरेल अदाकारीने सजलेली लावणी रसिकांना घायाळ केल्याशिवाय राहत

तळीरामांची मज्जाच मज्जा; अवघ्या १८ रुपयांत बिअर, जाणून घ्या कुठे मिळेल ?

व्हिएतनाम : नववर्षाच्या स्वागतासाठी देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला पार्टी,