तीन दिवसांत 28 काळवीटांचा मृत्यू; कर्नाटक प्राणीसंग्रहालयावर संशयाचे सावट

कर्नाटक : बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर राणी चेन्नम्मा प्राणीसंग्रहालयात गेल्या तीन दिवसांत तब्बल 28 काळवीटांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. प्राणिसंग्रहालयात १३ नोव्हेंबरला ८ आणि १५ नोव्हेंबरला आणखी 20 काळवीटांची मृत्यू नोंद झाली आहे. अचानक वाढलेल्या मृत्युमुळे वन विभाग सतर्क झाल्याचे माहितीवरून समजते. वरिष्ठ अधिकारी तत्काळ घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे.


कर्नाटकचे वनमंत्री ईश्वर खांद्रे यांनी या घटनेवर गंभीर चिंता व्यक्त करून तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. प्राथमिक अहवालात काळवीटांमध्ये संसर्गजन्य आजाराची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यानुसार प्राणीसंग्रहालयातील इतर प्राण्यांना धोका होऊ नये म्हणून सर्व प्रतिबंधात्मक उपाय करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


याशिवाय दूषित पाणी-अन्न किंवा मांजरींसारख्या पाळीव प्राण्यांमुळे आजार पसरला का, हेही तपासले जाणार आहे. यासाठी तज्ज्ञ समिती गठित करण्याचे आदेश देत वनमंत्र्यांनी भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, तसेच कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचेही स्पष्ट केले आहे.


कित्तूर राणी चेन्नम्मा किंवा भूतरामनहट्टी प्राणीसंग्रहालय1989 मध्ये स्थापन झाले असून बेळगाव शहरापासून सुमारे 12 किलोमीटरवर राष्ट्रीय महामार्ग 4 जवळ 31.68 हेक्टर जागेत वसले आहे. विभागीय वन अधिकारी एन.ई. क्रांती यांनी सांगितले की मृत्यू जिवाणू संसर्गामुळे झाले असून, बंगळुरूच्या बन्नेरघट्टा पशुवैद्यकीय विज्ञान संस्थेतील तज्ज्ञांची टीम तपासासाठी येणार आहे.

Comments
Add Comment

दहशतवादी उमरच्या घरात होता बॉम्ब निर्मितीचा कारखाना

फरिदाबाद : दिल्ली कार स्फोट आणि दहशतवादी उमर यांच्याबाबत नवनवी माहिती हाती येऊ लागली आहे. स्फोट घडवणाऱ्या

गांधीनगर रेल्वेस्थानकाचा पुनर्विकास आधुनिक सुविधांनी होणार सज्ज

सीमा पवार गांधीनगर : जयपूरमधील गांधीनगर रेल्वेस्थानक लवकरच आधुनिक सुविधांनी सज्ज होणार आहे.‘अमृत भारत स्टेशन

पती संभाळ करत असला तरी आई मुलाकडून पालनपोषण खर्च मागू शकते

केरळ उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय तिरुवनंतपुरम  : पती जिवंत असेल आणि पत्नीचा सांभाळ करत असला तरीही आई

डेस्क, मीटिंग रूम आणि चॅट… ऑफिस अफेअर्समध्ये भारत आघाडीवर

नवी दिल्ली  : भारत ऑफिस रोमॅन्समध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. एशली मॅडिसन आणि युगोव्हच्या सर्व्हेनुसार ४०

राजस्थानच्या गौरवशाली इतिहासाची गाथा सांगणार जयपूर विधानसभेतील डिजिटल संग्रहालय

जयपूर : संपूर्ण विधानसभेचे कामकाज पेपरलेस करण्यासाठी आता डिजीटल पद्धतीचा वापर जयपूर विधानसभेत होणार आहे.

प्रयागराजमध्ये यमुना नदीच्या किनाऱ्यावर बनवणार पब्लिक प्लाझा पार्क

प्रयागराज : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने महाकुंभ २०२५च्या पार्श्वभूमीवर प्रयागराज येथे यमुना