राजस्थानचा कर्णधार सीएसकेत, तर जड्डू पुन्हा जुन्या संघात

मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील या हंगामातील सर्वात मोठी आणि बहुचर्चित ट्रेडची अखेर अधिकृत झाली आहे. राजस्थानचा कर्णधार आणि महत्त्वाचा खेळाडू संजू सॅमसन आता १८ कोटी रुपयांच्या करारासह चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणार आहे. त्याच्या बदल्यात गेली अनेक वर्षे सीएसकेचा आधारस्तंभ असलेला रवींद्र जडेजा राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात दाखल झाला आहे.


मात्र जडेजासाठी ही डील काहीशी घाट्यात असल्याचं स्पष्ट दिसत आहे. कारण चेन्नईने गट हंगामात त्याला १८ कोटींमध्ये रिटेन केलं होतं, पण राजस्थानकडून त्याला आता फक्त १४ कोटी रुपयांचा करार मिळणार आहे. पगार घटल्यानंतर तो राजस्थानचा नेतृत्वभार स्वीकारणार का?, हा प्रश्न सर्वांच्या उत्सुकतेचा विषय ठरणार आहे.


जडेजाचा राजस्थानशी जुना संबंधही खास आहे. २००८ च्या पहिल्या आयपीएल हंगामात त्याने याच फ्रेंचाईजीकडून पदार्पण केलं होतं. त्यानंतर तब्बल १२ हंगाम तो सीएसकेच्या रंगात झळकला आणि आता पुन्हा आपल्या पहिल्या संघाकडे परत येतो आहे. जडेजाने आतापर्यंत आयपीएलमध्ये २५४ सामन्यांमध्ये दमदार कामगिरी केली आहे.


दुसरीकडे, संजू सॅमसनसाठी हा मोठा टप्पा ठरणार आहे. राजस्थानचा मुख्य खेळाडू आणि कर्णधार असलेल्या संजूनं १७७ आयपीएल सामने खेळले आहेत. आता तो १८ कोटींचा करार घेऊन पहिल्यांदाच चेन्नई सुपर किंग्जच्या जर्सीत उतरतो आहे. आयपीएलमध्ये हा त्याचा तिसरा फ्रेंचाईजी अनुभव असेल. राजस्थानशिवाय तो २०१६ आणि २०१७ मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठीही खेळला होता.

Comments
Add Comment

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च