जम्मू-काश्मिरच्या नौगाम पोलीस स्टेशनमध्ये भीषण स्फोट! फरीदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांची तपासणी करताना उडाला भडका

श्रीनगर: दिल्लीच्या लाल किल्ला परिसरातील स्फोट प्रकरण ताजे असतानाच जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगरमधील नौगाम पोलीस स्टेशनमध्ये शुक्रवार, १४ नोव्हेंबरला रात्री मोठा स्फोट झाला. या स्फोटात एकूण ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून २५ लोक गंभीर जखमी झाले आहेत. मृत व्यक्तींमध्ये बहुतेक जण फॉरेन्सिक टीम, पोलीस आणि सरकारी अधिकारी होते. देशात लागोपाठ होणाऱ्या या स्फोटांमुळे आता देश हादरला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, फरीदाबादमधून दहशतवाद्यांकडून जप्त केलेल्या स्फोटकांची(अमोनियम नायट्रेट) सॅम्पल तपासणी करत असताना हा स्फोट घडला. या स्फोटाची तीव्रता एवढी जास्त होती की, पोलीस स्टेशनच्या परिसरात मानवी अंगाच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या. ज्यात फॉरेन्सिक टीमचे सदस्य, पोलीस आणि श्रीनगर प्रशासनाचे एक नायब तहसीलदार आणि दोन अधिकाऱ्यांचाही मृत्यु झाला. तसेच या स्फोटामुळे आजूबाजूच्या परिसरातील इमारतींनासुद्धा धक्का बसला आहे.


अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींवर भारतीय लष्कराच्या हॉस्पिटल आणि शेर-ए-काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (SKIMS) येथे उपचार सुरू आहेत. तर वरिष्ठ पोलीस अधिकारी नौगाम पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये इतर तपास करत असून सुरक्षा दल आणि डॉग स्कॉड या ठिकाणी दाखल झाले आहेत.


विशेष म्हणजे, नौगाम पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनीच दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने परिसरात विविध ठिकाणी चिकटवलेले पोस्टर्स प्रकरण उघडकीस आणले होते. नौगाम पोलिसांमुळेच दिल्ली स्फोटाशी संबंधित असलेल्या व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश झाला होता. दरम्यान तपास यंत्रणांनी हरियाणातील फरिदाबादमधून अंदाजे २,९०० किलो स्फोटके जप्त केली होती. तसेच अनेक दहशतवादी डॉक्टरांनाही अटक केली. यामुळे आता हे प्रकरण देशाच्या सुरक्षा दृष्टीने महत्त्वाचे आहे.

Comments
Add Comment

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी