मोहित सोमण: होंडा इंडिया पॉवर प्रॉपर्टी लिमिटेडने आपला आर्थिक तिमाही निकाल जाहीर केला आहे. कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर निव्वळ नफ्यात मोठी वाढ झाली आहे. कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यातील ८.५२ कोटींच्या तुलनेत या वर्षी सप्टेंबर तिमाहीत ११.१७ कोटींचा निव्वळ नफा (Net Profit) मिळाला आहे. थेट ३०.८०% नफ्यात वाढ झाली आहे. तसेच कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात (Revenue from Operations) इयर ऑन इयर बेसिसवर कंपनीला मागील वर्षाच्या तिमाहीतील १८७०९ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत १८५०९ कोटींचा महसूल मिळाला आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या इक्विटी शेअर भांडवलात (Equity Share Capital) इयर ऑन इयर बेसिसवर कुठलाही बदल झालेला नाही. ते १०१४ कोटींवर स्थिर आहे. तसेच कंपनीच्या ईपीएस (Earning per share EPS) मध्ये गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ८.४२ तुलनेत या तिमाहीत ११.०१ रूपयांवर वाढ मिळाली आहे.