अलिबाग नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी

उबाठा गटाचे स्वतंत्र निवडणूक लढविण्याचे संकेत


अलिबाग : अलिबाग नगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची घोषणा शेकाप नेते शेकाप नेते जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केली होती; परंतु आता आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे स्पष्ट चित्र आहे. अलिबागमधील प्रमुख घटक पक्ष असलेला शेतकरी कामगार पक्ष एकही जागा सोडण्यास तयार नसल्याने शिवसेना या आघाडीतून बाहेर पडल्यात जमा आहे.


अलिबाग शहरातील २० जागांपैकी शेकापने दान जागा महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला दिल्या आहेत. काँग्रेसने या जागांवर अभय महामुणकर आणि समीर ठाकूर यांना उमेदवारी जाहीर करीत ते प्रचारालाही लागले आहेत. शिवसेनेने शेकापकडे तीन जागांची मागणी केली होती; परंतु अद्यापपर्यंत एकही जागा देण्याची तयारी शेकापने दाखविलेली नाही. मागील अलिबाग नगरपालिका निवडणुकीत शेकापचे सर्व १७ जागांवर उमेदवार निवडून आले होते. आता नवीन नगरपालिकेत २० जागा असणार आहेत. त्यातील तीन जागा आपल्यालाच मिळाव्यात, अशी शिवसेना ठाकरे गटाची अपेक्षा आहे; परंतु कुठली जागा द्यायची, असा पेच शेकापसमोर आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली होती. जर शेकापने आमचा विचार केला नाही, तर स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तीन दिवस उरलेले असतानाही शेकापकडून प्रतिसाद मिळत नसल्याने तीन ते चार जागा लढविण्याचा निर्णय शिवसेनेने घेतल्याची माहिती जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी ‘दैनिक प्रहार’शी बोलताना दिली.

Comments
Add Comment

NMIA : नवी मुंबई विमानतळामुळे महामुंबईतील कनेक्टिव्हिटी झाली मजबूत

नवी मुंबई विमानतळ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे (NMIA) केवळ हवाई वाहतुकीच्या क्षेत्रातच नव्हे, तर

Bharat Gogawale : १५ ऑगस्टला रायगडमध्ये मीच झेंडा फडकवणार!

- मंत्री भरत गोगावले; येत्या २४ तासांत पालकमंत्री म्हणून घोषणा होणार असल्याचा दावा मुंबई : महायुती सरकारमध्ये

Majha Dusrikade Hay Suru : 'माझं दुसरीकडं हाय सुरू' गाण्यावर रील करणारे ST महामंडळाचे कर्मचारी ३ दिवसांच्या निलंबनानंतर पुन्हा सेवेत, सेवेत येताच केला नवा Video

पनवेल : राज्य परिवहन विभागाच्या गणवेशात वैयक्तिक प्रसिद्धीसाठी रील / शॉर्ट व्हिडीओ करण्यास बंदी आहे. या बंदीचे

Maha Rojgar Melava : पनवेलमध्ये ‘महारोजगारमेळावा २०२६’ला हजारोंचाउत्स्फूर्त प्रतिसाद; ६४ कंपन्यांचासहभाग; २५०२ उमेदवारांनी घेतला लाभ

पनवेल : रोजगाराच्या शोधात असलेल्या आणि स्वतःच्या पायावर उभे राहू इच्छिणाऱ्या हजारो युवक-युवतींसाठी पनवेलमध्ये

MLA Prashant Thakur : आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कामोठे येथे समाजोपयोगी वस्तूंचे वाटप

पनवेल : भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त

Cyber Crime : रायगड पोलिसांची सायबर टोळीवर मोठी कारवाई; ३५ कोटींच्या गैरव्यवहाराचा भंडाफोड

रायगड  : डिजिटल अरेस्ट, शेअर मार्केटमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष आणि विविध ऑनलाइन माध्यमांतून नागरिकांची