Cyber Crime : रायगड पोलिसांची सायबर टोळीवर मोठी कारवाई; ३५ कोटींच्या गैरव्यवहाराचा भंडाफोड

रायगड  : डिजिटल अरेस्ट, शेअर मार्केटमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष आणि विविध ऑनलाइन माध्यमांतून नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर टोळीविरोधात रायगड पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे ३५ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात २३ गुन्हे उघडकीस आले असून टोळीच्या मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे.(Raigad News)



तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यात वाढत्या डिजिटल व्यवहारांचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगारांनी 'म्यूल बँक खाती' वापरून फसवणुकीची रक्कम विविध खात्यांमध्ये वळविली. आर्थिक मोबदल्याच्या बदल्यात काही व्यक्तींनी स्वतःची बँक खाती गुन्हेगारांच्या ताब्यात दिली होती. या खात्यांच्या माध्यमातून देशभरातील सायबर फसवणुकीची रक्कम जमा करून तिची अफरातफर केली जात असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले.(Cybercrime)



या प्रकरणाचा रायगड पोलिसांकडून गेल्या काही दिवसांपासून सखोल तपास सुरू होता. तपासादरम्यान अनेक म्यूल खातेधारकांची भूमिका संशयास्पद आढळून आल्यानंतर पोलिसांनी साखळी पद्धतीने कारवाई करत सायबर पोलीस ठाण्यासह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल केले.(Marathi News)



सायबर पोलीस ठाण्यात ११ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून श्रीवर्धन, अलिबाग, रोहा, नागोठणे, कर्जत, रसायनी, माणगाव, खोपोली, पोयनाड, पेण आणि कोलाड या पोलीस ठाण्यांमध्येही संबंधित गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


या कारवाईमुळे सायबर गुन्हेगारीच्या संघटित साखळीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. या रॅकेटमधील इतर आरोपींचा शोध सुरू असून प्रकरणाचा पुढील तपास रायगड पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment

Ritu Tawde : मुंबईच्या महापौरांनी केली जुहू समुद्र किनाऱ्याची पाहणी; स्वच्छता मोहिमेचा प्रत्यक्ष घेतला आढावा

मुंबई : उंच लाटांमुळे जुहू समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर वाहून येणाऱ्या कचऱ्याबाबत वारंवार नागरी तक्रारी

FIH Hockey World Cup : रोमहर्षक लढतीत भारताचा पाकिस्तानवर ५-३ ने विजय; पुरुष हॉकी विश्वचषकाच्या क्रॉसओव्हर फेरीत धडक!

हॉकी वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगलेला हायव्होल्टेज सामना अत्यंत रोमांचक ठरला. या

MBBS Admission Scam : MBBS प्रवेशाच्या आमिषाने १.१३ कोटींची फसवणूक; आरोपी महिलेला मुंबईतील विमानतळावर अटक

मुंबई : मुंबई किंवा पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी एका दुबईस्थित भारतीय उद्योगपती

Assistant Engineer accepting a bribe : मुंबई महापालिकेत खळबळ; २० हजारांची लाच घेताना 'अ' वॉर्डचा सहायक अभियंता एसीबीच्या जाळ्यात

MUMBAI : मुंबई महानगरपालिकेत (BMC) भ्रष्टाचाराविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे.

BWF World Championships : लक्ष्य सेनला पराभवाचा धक्का; उन्नती हुडाचेही आव्हान संपुष्टात

नवी दिल्ली : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पराभवाला सामोरे

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात २० ऑगस्टला पाऊस बरसणार; ४ जिल्ह्यांना हवामान खात्याचा यलो अलर्ट

मुंबई : सध्या राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी असला तरी २० ऑगस्ट रोजी अनेक भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान