Delhi Crime : धक्कादायक! चालत्या गाडीत विवाहित प्रेयसीची क्रूर हत्या; थेट शीर कापले, मृतदेह नाल्यात फेकला अन्...

दिल्ली : नोएडामध्ये घडलेल्या एका भीषण हत्याकांडाने संपूर्ण परिसर तसेच पोलीस प्रशासनाला हादरवून सोडले आहे. स्थानिक नाल्यात एका महिलेसोबत झालेली अत्यंत क्रूर वागणूक दिसून आली तिचा मुंडकाविहीन मृतदेह पोलिसांना आढळून आला. महिलेच्या कुटुंबीयांनी आई हरवल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदवली होती. तक्रारीनंतर सुरू झालेल्या तपासात पोलिसांना धक्कादायक माहिती मिळू लागली. तपासात स्पष्ट झाले की मृत महिला आणि संशयित आरोपी दोघेही एकाच कंपनीत काम करत होते. दोघांचेही स्वतंत्रपणे लग्न झालेले होते, तरीसुद्धा त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. या नात्यातून वाढत गेलेल्या तणावामुळे आरोपीने टोकाचे पाऊल उचलले. पोलिसांच्या तपासानुसार, आरोपीने चालत्या गाडीत महिलेची हत्या केली आणि नंतर मृतदेह नाल्यात फेकून दिला. प्राथमिक तपासात असेही दिसून आले की कंपनीत काम करत असताना आरोपीला काही त्रास जाणवू लागला होता, ज्यातून त्याने ही हत्या करण्याचा निर्णय घेतल्याची शक्यता तपासली जात आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.


नोएडामध्ये प्रेयसीची क्रूर हत्या करण्यामागचं कारण ?


नोएडामध्ये घडलेल्या क्रूर हत्याकांडात आरोपी मोनू सोलंकी याचे नाव समोर आले आहे. मोनू याला पाच मुले आहेत, त्यातील दोन मुली या प्रेयसीच्या आहेत.
पोलिसांच्या तपासात असे स्पष्ट झाले की, मृत महिलेचे पूर्वी दोन विवाह झाले होते, आणि तिचे दोन्ही पतींनी तिला सोडून दिले होते. मोनूने तिच्याशी लग्न केले होते, मात्र नंतर दोघांमध्ये संबंध गडबडले. तपासात समोर आले आहे की मृत महिलेने मोनू याला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली, तसेच मुलींकडून अनैतिक कृत्य करून घेण्याची धमकी दिली. यामुळे मोनूने आपल्या प्रेयसीची हत्या करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांच्या माहितीनुसार, मोनूने ही हत्या ५ नोव्हेंबर रोजी एका चालत्या बसमध्ये केली. या घटनेने परिसरात भितीचे वातावरण निर्माण केले आहे आणि पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

मोनू सोलंकीने बसमध्ये अंधार करून प्रेयसीचा मृतदेह...


नोएडामध्ये घडलेल्या भयानक हत्याकांडात आरोपी मोनू सोलंकी याने आपल्या प्रेयसीचा मृतदेह एका धार्मिक संस्थेच्या बसमध्ये नेला. पोलिसांच्या माहितीनुसार, मोनूने बसमध्ये लाइट बंद करून अंधारात बस चालवली. मोनूने प्रेयसीचा मुंडक छाटून हत्या केली आणि नंतर मृतदेह एका नाल्यात फेकला. मृत महिलेच्या आईने घरात पोहोचलेली नाही याची तक्रार मुलींनी पोलिसांकडे केली. त्यानंतर मोनूचा शोध सुरू झाला. आरोपी काही दिवस घरी न दिसल्यामुळे पोलीस त्याला पकडू शकले नाहीत. अखेरीस एके दिवशी मोनू घरी आला आणि त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस तपासात मोनूने धक्कादायक खुलासे केले. त्याने सांगितले की प्रेयसी त्याला ब्लॅकमेल करत होती, त्यामुळे तो कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलले. तपासात गाझियाबादच्या सिद्धार्थ विहारजवळ आरोपीकडून महिलेची मान, दोन्ही हात, कपडे आणि धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. मोनूला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
Comments
Add Comment

गोव्यात नाईटक्लबमध्ये अग्नितांडव, २५ जणांचा मृत्यू; चौघांविरोधात FIR, मॅनेजरला अटक

पणजी : उत्तर गोव्यातील अर्पोरा येथील 'बिर्च बाय रोमियो लेन' या नाईटक्लबमध्ये रविवारी मध्यरात्रीनंतर लागलेल्या

कारवाई का करू नये ? केंद्र सरकारची 'इंडिगो'ला नोटीस

नवी दिल्ली : इंडिगो एअरलाइन्समधील ऑपरेशनल संकट दूर करण्यासाठी आणि सामान्य परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी

प्लास्टिकवर प्रक्रिया करून तरुण बनला करोडपती

कचऱ्याचे रूपांतरण संपत्तीत दिल्ली : दिल्लीतील एका तरुणाने प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एक नवीन

भारताला खुणावतेय रशियन बाजारपेठ

२०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार १०० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातले

जगभरातील बालमृत्यूच्या घटनांमध्ये भारत दुसऱ्या स्थानी

नवी दिल्ली : जगभरात जवळपास १० लाख मुले पाच वर्षांचे वय गाठण्याआधीच मृत्युमुखी पडली. कुपोषणाशी संबंधित घटक-जसे की

२००९ पासून अमेरिकेतून १८,८२२ भारतीय हद्दपार

मंत्री एस. जयशंकर यांची राज्यसभेत माहिती नवी दिल्ली : अमेरिकेने २००९ पासून एकूण १८,८२२ भारतीय नागरिकांना हद्दपार