सात महिन्यांत ‘फुकट्यां’कडून मध्य रेल्वेची १४१ कोटींची दंड वसुली

मुंबई  : मध्य रेल्वेने २०२५-२६ मध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या २३.७६ लाख प्रवाशांकडून १४१ कोटी रुपये दंड वसूल केला. प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास घडावा यासाठी मध्य रेल्वे प्रशासन प्रयत्नशील आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ, नागपूर या विभागात अनधिकृत आणि विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत. यासाठी सातत्याने आणि सखोल तिकीट तपासणी मोहीम सुरू केली.


मध्य रेल्वेने २०२५-२६ मध्ये (एप्रिल – ऑक्टोबर २०२५) विनातिकीट प्रवाशांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले. मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकांनी २०२५-२६ मध्ये विनातिकीट, वैध तिकीटविना प्रवास करणाऱ्या २३.७६ लाख प्रवाशांना पकडले. ही संख्या २०२४-२५ मध्ये २२.०९ लाख इतकी होती. त्यात ८ टक्क्यांची वाढ झाल्याचे निदर्शनास आले. प्रशासनाला २०२५-२६ मध्ये दंडाच्या रूपात १४१.२७ कोटी रुपये विक्रमी रक्कम वसूल करण्यात यश आले. २०२४-२५ मध्ये विनातिकीट प्रवाशांकडून १२४.३६ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला होता. यामध्ये १४ टक्क्यांची वाढ झाली.


मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकांनी ऑक्टोबर २०२५ मध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या ३.७१ लाख प्रवाशांना पकडले. तर ऑक्टोबर २०२४ मध्ये ३ लाख प्रवाशांची धरपकड करण्यात आली होती. त्यात सुमारे २४ टक्क्यांची वाढ झाली. विनातिकीट प्रवाशांकडून ऑक्टोबर २०२५ मध्ये २४.८१ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.


विनातिकीट प्रवासी आणि वसूल केलेला दंड : भुसावळ विभागात ६.०७ लाख प्रकरणांमधून ५१.७४ कोटी रुपये, मुंबई विभागात ९.६३ लाख प्रकरणांमधून ४०.५९ कोटी रुपये, नागपूर विभागात २.५३ लाख प्रकरणांमधून १५.६२ कोटी रुपये, पुणे विभागात २.६७ लाख प्रकरणांमधून १५.५७ कोटी रुपये, सोलापूर विभागात १.४१ लाख प्रकरणांमधून ६.७२ कोटी रुपये आणि मध्य रेल्वे मुख्यालयात १.४५ लाख प्रकरणांमधून ११.०३ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. मध्य रेल्वेवर दररोज ८० वातानुकूलित लोकल धावतात. या लोकलमध्ये विनातिकीट प्रवाशांसंबंधी तक्रारींवर त्वरित प्रतिसाद देण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली. यासाठी व्हॉट्सॲॅप तक्रार क्रमांक ७२०८८१९९८७ उपलब्ध करण्यात आला आहे. आता वातानुकूलित लोकल तिकीट तपासणी पथक दररोज सरासरी ३६८ विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून सरासरी १.१९ लाख रुपये दंड वसूल करीत आहे.

Comments
Add Comment

गोरेगाव, सांताक्रूझ दरम्यान रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

'इंडिगो'ची सर्व उड्डाणे रद्द; प्रवाशांचे हाल, इतर विमानांचे दर दुप्पट

नवी दिल्ली : इंडिगो कंपनीने अचाकन आपल्या फ्लाईट रद्द केल्याने देशातील विविध महत्त्वाच्या विमानतळाची अवस्था बस

वरळीत शिउबाठाची दादागिरी; भाजपच्या कामगार संघटनेचा फलक लावण्यास विरोध

मुंबई : विधानसभा निवडणुकीत वरळीची जागा कशीबशी जिंकलेल्या शिउबाठाला अद्याप राजकीय स्थितीचे भान आलेले दिसत नाही.

पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आरे कॉलनी व दिंडोशी वन क्षेत्रातील रहिवाश्यांना घरे द्या'

मुंबई : आरेमध्ये तसेच दिंडोशी येथील वन क्षेत्रात गेली अनेक वर्ष वास्तव्य रहिवाशी हि देखील माणसे असून ते मुलभूत

फडणवीस सरकारची ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या दिशेने वाटचाल

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; महायुती सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त विशेष संवाद मुंबई : “पंतप्रधान नरेंद्र

डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्वीकारला महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) म्हणून डॉ. अविनाश ढाकणे यांनी