मुंबई : बिग बॉस १५ ची विजेती आणि नागीण मालिकेतून घराघरात पोहोचलेली तेजस्वी प्रकाश आता केवळ अभिनयावर अवलंबून न राहता नव्या क्षेत्रात उतरली आहे. छोटे पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून स्वतःची वेगळी छाप सोडल्यानंतर, तेजस्वीने व्यावसायिक जगातही पाऊल टाकत स्वतःचा नवा उपक्रम सुरू केला आहे.
अलीकडेच तिने "सॅम'ज सलोन" नावाचं स्वतःचं आलिशान ब्युटी सलून उघडलं. उद्घाटनावेळी तिच्या सोशल मीडियावरून शेअर केलेल्या फोटों आणि व्हिडीओंमध्ये तिचे आई–वडील, प्रियकर करण कुंद्रा आणि इंडस्ट्रीतील तिचे अनेक मित्रमंडळी उपस्थित असल्याचे दिसत आहे. सर्वांनीच तिला तिच्या या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
व्यवसाय सुरू करण्यामागचं कारण स्पष्ट करताना तेजस्वीने कॉमेडियन भारती सिंहसोबतच्या संभाषणात सांगितलं की, तिला अभिनय जरी अत्यंत प्रिय असला तरी फक्त त्यावर अवलंबून राहणं तिला योग्य वाटत नाही. ती म्हणाली, "मला नेहमी काहीतरी नवं करायला आवडतं. जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे नवीन प्रयत्न करता, तेव्हा देवही साथ देतो."
तेजस्वीने आनंद व्यक्त करत म्हटले किकी , "आता माझा एक नवीन प्रवास सुरु झाला आहे आणि माझ्या व्यवसायाला चांगला प्रतिसादही मिळत आहे" तेजस्वी प्रकाशने स्वतः च्या मेहनतीने आणि लोकप्रियतेच्या बळावर आपले स्वप्न पूर्ण केले. अभिनयासोबत हा व्यवसाय सांभाळणे हे तिच्यासाठी एक नवीन आव्हान असणार आहे.