करार अखेर संपन्न यूट्यूब टीव्हीमध्ये डिस्ने कंटेट पुन्हा पूर्ववत होणार
प्रतिनिधी: आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, शुल्काच्या वादामुळे लाखो सबस्क्राइबर्सना यूएस इलेक्शन डे प्रोग्रामिंग आणि प्रमुख लाईव्ह स्पोर्ट्स इव्हेंट्समध्ये प्रवेश मिळाला नव्हता तो मार्ग आता सुकर झाला आहे कारण त्यानंतर गुगलच्या यूट्यूब आणि वॉल्ट डिस्नेने शुक्रवारी संयुक्त निवेदनात स्पष्ट केले आहे त्यांनी डिस्नेच्या (Disney) मालकीच्या नेटवर्क्सना यूट्यूब टीव्हीवर पुन्हा परतण्यासाठी नुकताच करार केला आहे. तसेच डिस्नेकडून व युट्यूब कंपन्यांनी स्वतंत्र निवेदनात म्हटले आहे की एबीसी, ईएसपीएन, एफएक्स आणि नॅशनल जिओग्राफिकसह डिस्ने चॅनेलची संपूर्ण लाइन-अप शुक्रवारपासून यूट्यूब पुनः टीव्हीवर प्रसारित येईल. त्यामुळे सबस्क्रिप्शन वादावर आता दोन्ही कंपन्यांनी तीढा सोडवला आहे.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार याव्यतिरिक्त, ईएसपीएन अनलिमिटेडमधील सामग्रीसह ईएसपीएनची संपूर्ण लाइन-अप, २०२६ च्या अखेरीस बेस-प्लॅन सबस्क्राइबर्सना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय उपलब्ध असेल, असे युट्यूबने म्हटले आहे.
कॅरेज फी किंवा ब्रॉडकास्ट आणि केबल नेटवर्क फी साठी वितरकांनी (Distributor) दिलेल्या प्रति सबस्क्राइब दरांविषयक कंपनीशी वाद घातल्याने हे प्रसारण बंद झाले होते. ३० ऑक्टोबरला अमेरिकेतील सर्वात मोठ्या पे-टीव्ही सेवांपैकी एकावर डिस्नेचे चॅनेल बंद पाडले गेले होते. मात्र आता वॉल्ट डिस्नेने कराराच्या आर्थिक अटींबद्दलच्या प्रश्नाचे उत्तर अद्याप प्रसारमाध्यमांना दिलेली नाही. यूट्यूबने सांगितले की ते कराराच्या अटी उघड करत नाही त्यामुळे यातील काही गोष्टी अद्याप गुलदस्त्यातच आहेत. युएसमधील एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, डिस्नेने प्रमुख वितरकांनी अस्तित्वात असलेल्या दरांइतकेच दर मागितले आहेत ज्यामध्ये ईएसपीएनसाठी दरमहा सुमारे $१० प्रति ग्राहक समाविष्ट आहे.
पे-टीव्ही प्लॅटफॉर्म म्हणून यूट्यूब टीव्हीची जलद वाढ, गुगलच्या सहकार्याने विविध मीडिया कंपन्यांशी वाटाघाटी करण्यासाठी अधिक फायदा देऊन चांगल्या कंटेंटसाठी अँग्रीगेटर म्हणून काम करते असे असताना पारंपारिक वितरकांपेक्षा कमी दरात युट्यूब टीव्ही काम करते. सध्या ही सेवा मोठ्या मीडिया कंपन्यांशी वाटाघाटी आणि कॅरेज वादात अडकली आहे वॉल्ट डिस्नेचे सीईओ बॉब इगर यांनी गुरुवारी सांगितले आहे की,त्यांच्या कंपनीने इतर मोठ्या वितरकांनी आधीच मान्य केलेल्या कराराच्या बरोबरीचा किंवा त्यापेक्षा चांगला करार प्रस्तावित केला आहे.
यापूर्वी वॉल्ट डिस्नेने म्हटले की YouTube टीव्ही कमी दरांसह प्राधान्य देण्याची मागणी करत आहे आणि Hulu + Live TV आणि Fubo सारख्या डिस्नेच्या स्वतःच्या सेवांसह इतर भागीदारांनी स्वीकारलेल्या अटी नाकारत आहे.प्रभावित डिस्ने नेटवर्कमध्ये FX, National Geographic, Nat Geo Wild, Disney Channel आणि ABC News Live यांचा समावेश होता.YouTube टीव्हीने म्हटले होते की जर डिस्ने नेटवर्क दीर्घ कालावधीसाठी प्लॅटफॉर्मवर अनुपलब्ध राहिले तर ते त्यांच्या पे-टीव्ही सबस्क्राइबर्सना $२० क्रेडिट देईल.