मुंबई (सचिन धानजी): मुंबईतील पवई तलावातील पाण्याच्या पृष्ठभागावरील जलपर्णी वनस्पती, तरंगणा-या तसेच जमिनीतून उगवलेल्या वनस्पती, टाकाऊ पदार्थ हार्वेस्टर यंत्राच्या मदतीने काढून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी मागील वर्षी नेमलेल्या कंपनीला आता आणखी एक कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली आहे. जलपर्णी काढण्यासाठी कंत्राटदाराची पावसाळयासह २४ महिन्यांकरता नेमणूक केली होती, परंतु कंत्राटदाराला दिलेले प्रमाण १७ महिन्यांतच पूर्ण करून जलपर्णी काढल्याने शिल्लक वनस्पती आणि टाकावू वस्तू काढण्यासाठी निधी वाढवून देण्यात आला आहे.
पवई तलावातील पाण्याच्या पृष्ठभागावरील जलपर्णी वनस्पती, तरंगणा-या तसेच जमिनीतून उगवलेल्या वनस्पती, टाकाऊ पदार्थ हार्वेस्टर यंत्राच्या मदतीने कार्यरत अभियंत्यांच्या निर्देशानुसार एकत्रित करुन किना-यावर आणणे आणि वाहतूक करून कंत्राटदाराने व्यवस्था केलेल्या क्षेपण भूमींवर टाकून विल्हेवाट लावणे आणि पवई तलावाची देखभाल करणे हे काम करण्यासाठी कंत्राटदार एस. के. डेव्हलपर्स यांची नियुक्ती पावसाळा धरुन एकूण ०२ वर्षाच्या कालावधीकरीता करण्यात आलेली आहे.
पवई तलावातील जलपर्णी काढण्याचे काम ०२ टप्प्यांमध्ये करण्यात येणार होते. ज्यामध्ये पहिला टप्पा हा ०६ महिन्यांचा आणि नंतरचा १८ महिन्यांचा होता. या कामामध्ये पहिल्या ०६ महिन्यांच्या कालावधी दरम्यान तलावातील जलपर्णी प्रथमतः काढणे आणि त्यानंतरच्या १८ महिन्यांच्या कालावधीकरीता तलावाची देखभाल करणे असे स्वरुप होते. यासाठी एस. के. डेव्हलपर्स यांची नेमणूक करण्यात आली. यासाठी एकूण १० कोटी ३१ लाख ६२ हजार रुपयांचे कंत्राट मंजूर केले होते. या कंपनीनेकामाच्या पहिल्या टप्प्यामध्ये तलावातून २५,७२९ मेटिक टन एवढी जलपर्णी काढली आणि ४७८०.८० मेटिक टन इतक्या परिमाणासह तलावाची देखभाल करत असल्याचा दावा केला आहे.
मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेतील २४ प्रशासकीय विभागांमध्ये जानेवारी २०२५ पासून 'मीठ - साखर अभियान २०२५' जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. ...
परंतु या तलावाचे पुनर्रज्जीव करण्यासाठी तातडीची उपाययोजना आणि देखभाल म्हणून सध्या तलावाच्या पाण्याच्या पृष्ठभागावरील वाढीव जलपर्णी व इतर वनस्पती तसेच टाकावू पदार्थ काढण्यात येणार आहे. त्यानुसार ३ हजार मेट्रीक टन जलपर्णी काढण्यात येणार आहे. पुन्हा तलावात जलपर्णी वनस्पती बेसुमार वाढत असल्याने नवीन कंत्राटदाराची नेमणूक करण्यात येणार आहे तोपर्यंत या कंपनीला वाढीव काम देण्यात येणार आहे.यासाठी १ कोटी रुपयांचा खर्च वाढला जाणार आहे. त्यामुळे १०.३१कोटी रुपयांचे कंत्राट ११.३२ कोटी रुपयांवर जावून पोहोचणार आहे.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार तलावाची देखभाल करण्याच्या कालवधी दरम्यान हार्वेस्टर यंत्राच्या मदतीने तलावातील जलपर्णी काढण्याचे काम सुरु होते. तलावात होणारा सांडपाण्याचा निचरा आणि तलाव परिसरातील कचरा व इतर टाकाऊ पदार्थ यामुळे जलपर्णी वनस्पती वाढीस अतिरिक्त चालना मिळते. यामुळे तलावातून जलपर्णी वनस्पती काढून टाकल्यानंतर त्याठिकाणी नवीन जलपर्णी वाढीस लागले. त्यामुळे जलपर्णी वनस्पती काढून टाकल्यानंतर ती वनस्पती काढण्याचे काम सातत्याने करावे लागत होते. त्यामुळे देखभाल कालावधीसाठी अंदाजित केलेले जलपर्णी वनस्पतींचे ४७८० मेट्रीक टन इतके परिमाण अपुरे पडत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.